इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्रिवेंद्रम येथे उपलब्ध असणार्या बीटेक पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी खालीलप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी, उमेदवारांकडून प्रवेशअर्ज मागवण्यात येत आहेत.
बीटेक : एव्हिऑनिक्स.
विशेष सूचना : वरील पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी ४ वर्षांचा, त्यासाठी प्रत्येकी ६० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावाची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय घेऊन व चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व इंडियन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अथवा केंद्रीय शालान्त परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणारी जॉइंट एंट्रस एक्झामिनेशन-२०१५ ही प्रवेश परीक्षा दिलेली असावी.
प्रवेश पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची बारावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी व जेईई-प्रवेश पात्रता परीक्षेच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल. ही प्रवेश प्रक्रिया साधारणत: जुलै २०१५ मध्ये पूर्ण करण्यात येईल.
निवास व्यवस्था व अर्थसाहाय्य : निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्सतर्फे निवास व्यवस्था व वैद्यकीय व्यवस्था पुरवण्यात येईल. याशिवाय विद्यार्थ्यांना दर सहामाहीसाठी ३००० रु.चे अर्थसाहाय्य पुस्तके व शैक्षणिक साहाय्यापोटी देण्यात येईल.
भविष्यकालीन संधी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे वरील अभ्यासक्रम पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांचा केंद्र सरकारच्या विज्ञान विभाग वा इस्रोसारख्या संस्थांमध्ये वैज्ञानिक वा इंजिनिअर म्हणून नेमणुकीसाठी विचार केला जाऊ शकतो. या योजनेअंतर्गत त्यांची नेमणूक झाल्यास त्यांना केंद्र सकराकच्या नियमांनुसार वेतन, इतर भत्ते व फायदे देय असतात.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या www.list.ac.in अथवा http://www.iist.ac.in/admission/undergraduate या संकेतस्थळांवर भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०१५.