आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dattatraya Ambulkar Article On Foriest Mangement

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळचा अभ्यासक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळ येथे उपलब्ध असणार्‍ या वन व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत.आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीत कमी 50% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी 45% गुणांसह) उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते यंदा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले असावेत. याशिवाय अर्जदारांनी सीएटी-2013 ही व्यवस्थापन अभ्यासक्रमविषयक प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
प्रवेश पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व सीएटी-2013 मधील गुणांकाच्या आधारे समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
विशेष शिष्यवृत्ती : वरील अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या निवडक विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील कामगिरीच्या आधारे त्यांना दरमहा 5000 रु.ची विशेष शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी 900 रु.चा (राखीव गटातील उमेदवारांनी 450 रु.चा) डायरेक्टर, इंडियन इन्स्टिट्यट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या नावे असणारा व भोपाळ येते देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह इन्स्टिट्यूट कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंटच्या www.iifm.ac.in/admission अथवा www.iifm.ac.in/admission या संकेतस्थळांना भेट द्यावी.पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज डायरेक्टर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, नेहरूनगर, भोपाळ 462003 या पत्त्यावर 21 जानेवारी 2014 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
ज्या विद्यार्थ्यांना वन व्यवस्थापन क्षेत्रात विशेष पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासह आपले करिअर करायचे असेल अशांनी या अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करावा.
दिल्ली विद्यापीठाची व्यवस्थापन विषयांतर्गत पीएचडी
दिल्ली विद्यापीठांतर्गत कार्यरत असणार्‍ या फॅक्टरी ऑफ मॅनेजमेंट स्टडीजअंतर्गत दोन वर्षे कालावधीच्या व्यवस्थापन विषयांतर्गत एमबीए व पीएचडी या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : अभासक्रमनिहाय पात्रता व प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे असेल-
एमबीए अभ्यासक्रम : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी ते सर्वसाधारण गटातील असल्यास कमीत कमी 50% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांनी 45% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांनी सीएटी-2013 ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
प्रवेश प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व सीएटीमधील गुणांकाच्या आधारे त्यांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची एमबीए अभ्यासक्रमासाठी अंतिम निवड करण्यात येईल.
व्यवस्थापन विषयातील संशोधनपर पीएचडी : अर्जदार व्यवस्थापन वा संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक असावेत. त्यांचा शैक्षणिक अलेख चांगला असावा व त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादतर्फे 16 ऑक्टोबर 2013 रोजी घेण्यात आलेली कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट-2013 दिलेली असावी.
प्रवेश प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदव्युत्तर पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व कॉमन एन्ट्रंस टेस्टमधील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची व्यवस्थापन विषयातील संशोधनपर पीएचडीसाठी नोंदणी करण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अभ्यासक्रमाशी संबंधित अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास 250 रुपयांचा दी रजिस्ट्रार, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्लीच्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह दिल्ली विद्यापीठाच्या फॅक्टरी ऑफ मॅनेजमेंट स्टडीजकडे पाठवावा.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या दूरध्वनी क्र. 011-2766382 वर संपर्क साधावा. अथवा www.du.ac.in, www.fms.edu अथवा www.cat2013iimidr.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2013.
ज्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर व्यवस्थापन विषयातील एमबीए व संशोधनपर पीएचडी करायची असेल अशांनी या संधींचा लाभ घ्यावा.
एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, पुणेचे अभ्यासक्रम
एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, पुणे येथे खाली नमूद केल्याप्रमाणे असणार्‍ या विषयांमधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत.
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांतर्गत समाविष्ट विषय :
१ प्रॉडक्ट डिझाइन.
१ ग्राफिक डिझाइन.
१ ट्रान्सफॉर्मेशन डिझाइन.
१ अ‍ॅनिमेशन डिझाइन.
१ रिटेल अँड एक्झिबिशन डिझाइन.
१ फिल्म अँड व्हिडिओ डिझाइन.
१ इंटेरियर स्पेस अ‍ॅण्ड इक्विपमेंट डिझाइन.
१ युजस एक्प्रिइयन्स डिझाइनमधील पदवी अभ्यासक्रम.
युनिव्हिर्सिटी फॉर क्रिएटिव्ह आर्टस् इंग्लंडचा सहकार्याने घेण्यात येणारे अभ्यासक्रम.
१ फॅशन डिझाइनमधील बीए (ऑनर्स).
१ फॅशन प्रमोशन अँड इमॅजिंगमधील बीए ऑनर्स.
१ फॅशन डिझाइनमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम.
१ फॅशन मॅनेजमेंट अँड मार्केटिंगमधील एमबीए अभ्यासक्रम.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्जदारांनी पदवी अभ्यासक्रमासाठी बारावीची परीक्षा, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी संबंधित विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
प्रवेश पद्धती : पात्रताधारकांना एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, पुणेतर्फे घेण्यात येणारी ऑल इंडिया लेव्हल डिझाइन अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट ही प्रवेश पात्रता परीक्षा, स्टुडिओ टेस्ट व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची संबंधित अभ्यासक्रमाच्या 2014-2015 या शैक्षणिक सत्रासाठी निवड होईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, पुणेच्या दूरध्वनी क्र. 020-30693695 वर संपर्क साधावा. अथवा इन्स्टिट्यूटच्या www.mitid.edu.in ल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व तपशिलवार प्रवेश अर्ज 31 जानेवारी 2014 पर्यंत पाठवावेत.
ज्या विद्यार्थ्यांना डिझाइन वा संबंधित विषयातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल अशांसाठी हे अभासक्रम फायदेशीर ठरू शकतील.
इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्सचा अमर्त्य सेन संशोधन पुरस्कार
इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स, नवी दिल्लीतर्फे सामाजिक विज्ञान व अर्थशास्त्र विषयांतर्गत विशेष उल्लेखनीय संशोधनपर काम करणार्‍ या अमर्त्य सेन-सामाजिक संशोधन पुरस्कार-2013 या योजनेअंतर्गत खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक संशोधकांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत-
पुरस्कारांची संख्या : या योजनेअंतर्गत उपलब्ध असणार्‍ या संशोधनपर पुरस्कारांची संख्या 10 आहे.
पुरस्कार योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले विषय : अमर्त्य सेन पुरस्कार योजनेअंतर्गत अर्थशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन, समाजशास्त्र, सामाजिक कार्य, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, लोकप्रशासन, भूगोल, शैक्षणिक व्यवस्थापन, विधीविषयक हक्क, मानवीय अधिकार, इतिहास, सांस्कृतिक संदर्भ व अभ्यास यासारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक संशोधकांना सादरीकरण व मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची या पुरस्कारांसाठी अंतिम निवड करण्यात येईल.
पुरस्कारांची संख्या व रक्कम : निवड झालेल्या 10 संशोधक उमेदवारांना अमर्त्य सेन पुरस्कार स्वरूपात 10 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल. याशिवाय त्यांना इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्सतर्फे स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रही देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशील :
इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्सच्या www.icssr.org. या संकेतस्थळाला भेट द्यावी.
प्रवेशिका पाठवण्याचा पत्ता व शेवटची तारीख : तपशीलवार व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणार्‍ या प्रवेशिका दी मेंबर सेक्रेटरी, इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, अरुणा असफअली मार्ग, नवी दिल्ली या पत्त्यावर 31 डिसेंबर 2013 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवाव्यात.अर्थशास्त्र, सामाजिक विज्ञान व संबंधित विषयात विशेष उल्लेखनीय संशोधनपर काम करणार्‍ या संशोधकानी या प्रतिष्ठित पुरस्कार योजनेचा जरूर विचार करावा.