आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूनबाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज माझ्या घरामध्ये
सुगंध कशाचा येत आहे
गोड मधुर संगीत
कानात गुंजन घालीत आहे।।

शांत निळसर प्रकाशात
घर सुंदर दिसत आहे
मनाला आज माझ्या
नवीन ऊर्मी मिळत आहे।।

रेशीम वस्त्राची सळसळ
आजूबाजूला भासत आहे
अंतरात्म्यास कुणीतरी
गोड साद घालत आहे।।


लक्ष लक्ष प्रकाशात
माझ मन उजळत आहे
आज माझ्या जीवनास
पूर्ण समाधान मिळत आहे।।

माझ्या पाठीमागून
कुणीतरी येत आहे
माझं बोट धरून
पुढे पुढे नेत आहे

डोळ्यात न मावणारं सुख
हृदयातून ओसंडत आहे
खरं सांगू का सखे
मुलीच्या रूपात सूनबाई
माझ्या घरी येत आहे.