आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायजेस्टिव्ह हेल्द : निरोगीपणाचा पाया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डायजेस्टिव्ह हेल्द म्हणजेच पचनसंस्थेचे आरोग्य. किचकट आणि गुंतागुंतीची अशी यंत्रणा समजली जाते अन् जिच्या अद्भुत कार्यशक्तीने मनुष्य जीवन चालते ती पचनसंस्था.

पचनसंस्था शरीरातील महत्त्वाचा पूरक अवयव आणि त्याची संप्रेरके यांच्या समन्वयित कार्याच्या माध्यमातून आपण घेतलेल्या अन्नाचे पूर्ण रासायनिक विघटन करून त्यातून शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे पुरवण्याचे कार्य निरंतरपणे आणि स्वयंचलित पद्धतीने करते. जिभेपासून (लाळग्रंथीपासून) सुरू होणारी ही संस्था अन्ननलिका, पोट, आंत्राशय, लहान आतडे, मोठे आतडे या मुख्य अवयवांबरोबरच यकृत, प्लीहा, स्वादुपिंड या पूरक अवयवांतून स्रवणार्‍या संप्रेरके आणि रसायनांच्या मदतीने अन्नाचे पचन करण्याचे कार्य करते.
पचनसंस्थेसारख्या कार्यात आजच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अडथळे निर्माण होऊन पचनावर अन् त्यायोगे पोषकतत्त्वाच्या पूर्ततेवर विपरीत परिणाम होऊन विविध व्याधींना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातीला क्षुल्लक वाटणार्‍या अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ट, मलावरोध, गॅस्ट्रिक इन्फेक्शन या व्याधी हळूहळू अल्सर, कोलांयटिर्स, आयबीएस, लिव्हरचे व किडनीचे विकार अन् त्याहून पुढे जाऊन मधुमेह, हायपरलिपिडेमिया, स्थूलता, हृदयविकार यासारख्या घातक रोगांचे रूप धारण करतात.
आजच्या टेक्नोसेव्ही अन् फास्ट लाइफ स्टाइलमध्ये शरीराचे घड्याळ (बॉडीक्लॉक) विस्कळीत होऊन एकूणच यंत्रणेत अडथळा आणत आहे.

( 1) जेवणाच्या अनियमित वेळा अन् अनियंत्रित प्रमाण त्यात पाश्चात्त्य प्रभावामुळे फास्ट, रेडी फूड, एरेटेड ड्रिंक्स, अति तैलीय आणि मसालेदार पदार्थांचा समावेश. (2) तणावग्रस्त कार्यपद्धतीमुळे बिघडलेले शारीरिक, मानसिक विश्रांतीचे तंत्र. (3) आहाराच्या प्रमाणात शारीरिक श्रम आणि व्यायामाचा पूर्ण अभाव यामुळे जगात 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांमध्ये या व्याधी प्राथमिक स्वरूपात दिसतात.
खाल्लेल्या अन्नाचे पूर्ण पचन न होता संप्रेरकांच्या अभावामुळे आणि विघटित द्रव्यांचा पूर्ण निचरा न झाल्यामुळे पचनशक्तीवर ताण येतो आणि डायजेस्टिव्ह हेल्द डिस्टर्ब होतो. यावर जीवनशैलीत काही ठळक बदल व निश्चितच नियंत्रण मिळवता येऊ शकते. ‘अन्न हेच औषध’ या आहारशास्त्राच्या उक्तीप्रमाणे काही डाएटरी मॉडिफिकेशन्स पचनसंस्थेला पुनरुज्जीवित करण्यास उपयुक्त ठरतात.

1) आहारात सर्व पोषकतत्त्वांचा समावेश जसे तंतुमय, तृणधान्ये (मिलेट्स), कडधान्ये, हंगामी फळे व ताज्या भाज्या यांचा समावेश आतड्यांमधील गड बॅक्टेरियाला जगविण्यासाठी दही, ताक, आंबलेले पदार्थ यातून प्रोबायोटिक्सची पूर्तता.
2) आतड्यांमधील गुड बॅक्टेरियाला जगविण्यासाठी दही, ताक, आंबलेले पदार्थ यातून प्रोबायोटिक्सची पूर्तता.
3) तैलीय व स्रिग्ध पदार्थांचा योग्य प्रमाणात वापर आणि तेलबियांचा आहारात समावेश.
4) याचबरोबर काही गोष्टी बंद जसे चहा, कॉफी, तंबाखू, एरेटेड ड्रिंक्स, डबाबंद रस, अल्कोहोल, फास्ट फूड, जंक फूड, अतिसंस्कारित अन्न, मसालेदार अन् खारवलेले पदार्थ, डबाबंद पदार्थ, रेडी टू इट फूड्स.
5) आपल्याकडच्या वातावरणात पूर्णपणे पचू न शकणारे पाश्चत्त्य अन्नपदार्थ.
या तिन्ही मुद्द्यांवर विचारपूर्वक बदल करून आपण निश्चितच आपल्या शरीरातील या ऊर्जास्रोताला अजून कार्यक्षम बनवून आपली स्वत:ची कार्यक्षमताही वाढवू शकू. याबद्दल वादच नाही. आवश्यकतेनुसार औषधोपचाराबरोबर आहार नियंत्रण आणि व्यायाम म्हणजेच
दीपाली लोढा, जळगाव