आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमळाबाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची पातळी इतक्या झपाट्याने घसरेल, असे वाटले नव्हते. किरण बेदींवर विशिष्ट टीकाटिप्पणी केल्यामुळे खवळलेल्या बेदीबाई टीव्हीवर पाहणे व कुमार विश्वास यांचे त्यांना आरोप सिद्ध करण्याचे जाहीर आव्हान, हा सगळा मनोरंजनात्मक खेळ होता. एकमेकांना न्यायालयात खेचू, एवढेच बाइट देण्यापुरते आव्हान होते.

त्यात आम आदमी पार्टीनेच दोन कोटी रुपयांची मदत हवाला मार्गाने घेतल्याचा आरोप पुढे आल्याने भाजपला आयतीच संधी सापडली. भाजपने हा आरोप सोशल मीडियात व इतर मीडियात जोरदारपणे लावून धरला. त्यात खुद्द नरेंद्र मोदी उतरल्याने हा विषय अधिक चिघळला. मोदींचे दिल्लीतील रोहिणीमधील भाषण आम आदमी पक्षाची रेवडी उडवणारे होते. ‘काली रात में काले धन के कारनामे’, असे त्यांचे हळुवार व नाकातून सांगण्याच्या शैलीमुळे सोशल मीडियात मोदींची खिल्ली उडवणार्‍यांचे फावले. ज्येष्ठ पत्रकार विनोद शर्मा यांनी भाजपचा आपवरील हवालामार्फत दोन कोटी रुपये घेण्याचा आरोप भाजपला किती अडचणीत आणू शकताे, हे एका पोस्टवर नमूद केले. ते म्हणतात, ‘९०च्या दशकात जैन हवाला डायरीचा किस्सा असाच गाजला होता. त्या वेळी भाजप, काँग्रेसपासून जनता दलातील नेत्यांना हवालामार्फत कशी लाच दिली होती, याची पानेच्या पानेच मीडियात प्रसिद्ध झाली होती. आता असाच आरोप असलेल्या भाजपने आपवर टीका करताना स्वत:चे घर काचेचे आहे, हे विसरू नये.’

राजेंद्र कुंबात यांनी भाजपला विचारलेले प्रश्न नेमके टोचणारे होते. ते म्हणतात, ‘पुलिस उनकी, सीबीआई उनकी, आरबीआई उनका, ईडी उनका, इन्कम टैक्स विभाग उनका। फिर भी AAP पर ना एफआईआर ना जांच। सिर्फ प्रेस काॅन्फरेंस में आरोप।
मतलब साफ है- झूठ का पुलिंदा। हमेशा की तरह।
आर्थिक संपन्नता येऊन सेलिब्रेशन हाच जगण्याचा मंत्र झालेल्या नवश्रीमंतांच्या दिवाणखान्यात एकत्र बसून चघळायच्या गोष्टी म्हणजे रोडीज शो, बिग बॉस आणि आताचा एआयबी नॉकआऊट हा कार्यक्रम... गेल्या महिन्यात मुंबईत एका सार्वजनिक ठिकाणी बॉलीवूड कलाकारांच्या उपस्थितीत एआयबी नॉकआऊट हा कार्यक्रम पार पडला. जवळजवळ कंबरेचे सोडून डोक्याला गुंडाळावे तशी मुक्ताफळे उधळणारा हा कार्यक्रम चार हजार रुपयांचे महागडे तिकीट असूनही हाऊसफुल्ल झाला. अश्लील हावभाव, अचकट-विचकट संवाद अशा या कार्यक्रमाची ध्वनिचित्रफित यू-ट्यूबवर अपलोड केली आणि एका दिवसात त्याला लाखो हिट्स मिळाल्या.

आता हा कार्यक्रम वादाच्या भोवर्‍यात सापडला असल्याने स्वाभाविकच सोशल मीडियावर त्याचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. याच कार्यक्रमात सहभागी झालेल्या करण जोहरने ट्विट केलंय की, जर आपल्याला वाटतंय की, हे आपल्या लायकीचं नाहीये तर ते पाहू नका... प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या सोनाक्षी सिन्हाने ट्विट केलंय, की we stand by aib knockout...

फेसबुकवर विशाल बागलने पोस्ट टाकली आहे की, AIBRoast हा कार्यक्रम निव्वळ एक इन्सल्ट कॉमेडी शो आहे. त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाच्या गोष्टीशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. याच कार्यक्रमातील पॅनलवरील ‘रोडीजफेम’ रघूने म्हटल्याप्रमाणे यामध्ये शिव्या टाकणे हा कार्यक्रमाचा टीआरपी वाढवण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. या कार्यक्रमामुळे लोक अपमान सहन करायला शिकतील, असे मानणे हा शुद्ध भोळेपणा आहे. तोंडावर अपमान सहन केल्याचे पैसे आणि प्रसिद्धी दोन्ही मिळणार असतील तर अपमान करून घ्यायला कुणाचीच हरकत नसावी.