आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात डेंग्यू साथरोग पसरतोय, ५० वर्षांत ३० पट वाढला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये डेंग्यूचे प्रमाण दर वर्षी वाढत आहे व त्यामुळे मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे, त्याचे कारण रुग्णाच्या शरीरातील पिवळ्या पेशी (Pletelet) चे प्रमाण कमी होणे. हा आजार गेल्या ५० वर्षांत ३० पट वाढला आहे. डेंग्यू हा आजार डेंग्यू विषाणूपासून होतो, हा एडिस नावाच्या डासाच्या चावण्यामुळे होतो. डास चावल्यापासून ४ ते ९ दिवसांमध्ये या विषाणूंचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरुवात होताे. या तापामध्ये प्रथम डोकेदुखी सुरू होते, सर्व अंगदुखी सुरू होऊन सांधे दुखण्यास सुरुवात होते, अशक्तपणा वाढत जातो व काही दिवसातच अंगावर पुरळ येण्यास सुरुवात होते आणि आजार बळावल्यास रक्तस्राव होण्यास सुरुवात होते. हा डास साचलेल्या पाण्यात वाढतो, त्यामुळे पाणी साचू न देणे हे यावर चांगल्या प्रमाणात नियंत्रण ठरू शकते.

आजारामध्ये पिवळ्या पेशी (Pletelet) कमी होतात
या आजारात पिवळ्या पेशी कमी होतात आणि मग त्याचा शरीरावर वाईट परिमाण होतो, रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो आणि रुग्ण मृत्यू पावतो. यामध्ये आधुनिक शास्त्रामध्ये या पिवळ्या पेशी(Pletelet) चढवणे हा एक उत्तम पर्याय केला जातो. परंतु त्यात शरीर स्वत: पिवळ्या पेशी तयार कधी करतील याची शाश्वती नसते, आणि बाहेरून दिलेल्या Pletelet रुग्णाला किती उपयोगी पडतील याची शाश्वती नसते, त्याचबरोबर ताप थंडी अंगदुखी, अशक्तपणा हा दिवसेंदिवस वाढत जातो आणि रुग्णाची रोग प्रतिकारशक्ती कमी कमी होत जाते.

डेंग्यूवरील अिधक मािहतीसाठी...
दिल्लीमधील सरकारी बाह्यरुग्ण विभागामध्ये डेंग्यूवर होमिओपॅथिक या शास्त्रानुसार करण्यात आलेल्या उपचाराचा तपशील खालील लिंकवर बघू शकता.
http://www.scribd.com/doc/183184730/Dengue-fever-and-some-case-reports-from-Delhi-Govt-Homoeopathic-Dispensaries

प्रतिकारशक्ती वाढवते होिमओपॅथी
होमिओपॅथिक औषधी प्रतिकार शक्तीवर कार्य करून रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवते औषधी घेतल्यावर दोन दिवसात पिवळ्या पेशी वाढण्यास सुरुवात होते आणि हे औषध इतर औषधीबरोबर घेतले तरी त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. पिवळ्या पेशी (Pletelet) वाढण्यास सुरुवात झाली की रुग्णात सुधारणेस सुरुवात होते.

आजारासाठी प्रभावी सहाय्यक औषध
कुठल्याशी साथीच्या आजारात होमिओपॅथिक औषधी चांगल्या प्रकारे उपचारामध्ये सहायक औषधी म्हणून बघितले पाहिजे. कारण साथीच्या आजारामध्ये होमिओपॅथी शास्त्रात जिनस एपिडेमीकस या थेअरीनुसार उपचार केल्यास त्याचा साथीचा आजार नियंत्रणात आणण्यास खूप मदत होते आणि ते यापूर्वी सिद्ध झाले आहे.

जिनस एपिडेमीकस महत्त्व आणि उपयोग
जिनस एपिडेमीकस म्हणजे एकाच कारणामुळे, विशिष्ट वस्तीत राहणाऱ्या सर्व लोकांना एकाच आजाराची एका विशिष्ट काळात काही काळासाठी एकसारखीच लक्षणे आढळणे व त्याला लागू पडणारे औषधही एकच असणे होय. साथीच्या आजारामध्ये कमी-जास्त प्रमाणात पण सर्व रुग्णांमध्ये एकसारखेच लक्षणे आढळतात. सर्व रुग्णांची लक्षणे सारखीच व त्यांना लागू पडणारे औषधही सारखेच आहे.

साथीचे रोग म्हणजे काय ?
एकाच कारणामुळे (उदा. एकाच प्रकारच्या विषाणुंमुळे होणाऱ्या दूषित पाणी व अन्न यामुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना टायफाइड होणे. एकाच विशिष्ट प्रकारचा डास चावल्यामुळे त्या ठिकाणच्या वसतीमध्ये मलेरिया किंवा डेंग्यू होणे.)एका विशिष्ट वस्तीमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना एकाच आजाराची एका विशिष्ट कालावधीमध्ये काही काळासाठी एकसारखीच लक्षणे आढळणे.
जिनस एपिडेमीकसचा काय उपयोग आहे ?
हे औषध एकदा शोधले की प्रत्येक रुग्णाची इत्थंभूत माहिती घेण्याची गरज पडत नाही, त्यामुळे कमीतकमी वेळेमध्ये, कमीतकमी परिश्रमात त्या विशिष्ट वस्तीमधील सर्व रुग्णांना हे औषध पुरवले जाऊ शकते. त्या एकाच औषधाणे सर्व रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढून आजार संपूर्णपणे बरा होतो व त्या औषधाचे कसलेही, काहीही दुष्परिणामही होत नाहीत.
डॉ संजय पडोळे, डॉ विजय लोखंडे,
डॉ सचिन मुंडे, डॉ योगेश खर्चे, औरंगाबाद