आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटके विमुक्त साहित्य संमेलन जानेवारीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र शासनाच्या साहित्य अाणि सांस्कृतिक मंडळाच्या अर्थसाह्याने हाेणारे भटक्या विमुक्तांचे १० राज्यस्तरीय साहित्य संमेलन १४ अाणि १५ जानेवारी राेजी नाशिक येथे हाेत अाहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद काेंडाजी अाव्हाड यांच्याकडे तर संमेलनाध्यक्षपदी बालसाहित्यिक सुभाषचंद्र वैष्णव यांची निवड करण्यात अाली अाहे.

नाशिक येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालयात हाेणाऱ्या या संमेलनात कविसंमेलन, ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम, संमेलनात मांडायचे ठराव तसेच कार्यकर्त्यांचे मनाेगत असे विविध कार्यक्रम हाेणार अाहेत. तसेच भटके विमुक्त भूषण २०१७ अाणि भटके विमुक्त जीवन गाैरव पुरस्कारही यावेळी देण्यात येणार अाहे. महाराष्ट्रातील जुन्यांसह नवाेदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे, भटक्या विमुक्तांमधील सर्व जातींच्या सांस्कृतिक, सामाजिक, अार्थिक, शैक्षणिक, धार्मिक विषयांना प्राधान्य मिळावे या उद्देशाने हे संमेलन भरविण्यात येते.

या संमेलनाचे उद‌्घाटन प्रा. डाॅ. सुनीता पवार यांच्या हस्ते करण्यात येणार अाहे. तर कविसंमेलनाचे अध्यक्षपद प्रा. वा. ना. अांधळे परिसंवाद सत्राचे अध्यक्षपद राजाराम जाधव, दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षपदी राज्य परिवहन मंडळाच्या विधी अधिकारी अॅड. ज्याेती भारती यांची निवड करण्यात अाली अाहे.

या वेळी लेखन पुरस्कारही देण्यात येणार अाहे. त्यासाठी विमुक्त जाती, भटक्या जमातींमधील ठरावीक जातीच शासन सवलतींचा फायदा घेऊन प्रस्थापित हाेतात का? उर्वरित विस्थापित जातींचा वाली काेण? भटक्या जमातींमधील जातींमध्ये सांस्कृतिक एेक्य साधणार? अाणि भटक्या विमुक्तांनी सत्तेत येण्यासाठी काय करावे? यापैकी एका विषयावर इच्छुकांनी १५ डिसेंबरपर्यंत संकल्प साेसायटी, श्रीसंत जनार्दन स्वामीनगर, नवीन अाडगाव नाका, पंचवटी येथे अापले लेखन पाठवावे. अधिक माहितीसाठी ९२०९६२४४०५ येथे संपर्क साधावा.
बातम्या आणखी आहेत...