आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dharmendra Pratap Singh Article About Nana Patekar

बस एक फोनही काफी है !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाना पाटेकरांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा ‘प्रहार’च्या प्रदर्शनाच्या वेळची ही घटना. दिग्दर्शक म्हणून ओळख प्रस्थापित करणारा हा सिनेमा असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत नाना पाटेकरांनी खूप मेहनत घेतली होती. सिनेमाच्या प्रचाराच्या बाबतीतही ते कोणतीच जोखीम पत्करू इच्छित नव्हते. त्या वेळच्या अतिशय लोकप्रिय आणि सर्वाधिक खपाच्या ‘स्क्रीन’ या सिनेमासिकामध्ये ‘प्रहार’ची जाहिरात छापून यावी, अशी पाटेकरांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आपले आवडते पोस्टरकर्ते गुरुजी बंधूंना आकर्षक डिझाइन तयार करून द्यायला सांगितले. स्वत: ते बारकाईने बघून छपाईसाठी पाठवले. पण दुसर्‍याच क्षणी पाटेकरांनी पीआरओला सांगितले, ‘जाहिरात छापण्यापूर्वी मला एकदा ती व्यवस्थित बघायची आहे. त्यामुळे प्रेसमध्ये जाऊन छपाई झाल्यानंतर जाहिरात कशी दिसतेय, हे मला प्रत्यक्ष बघायचे आहे.’

नानाची इच्छा म्हणजे जणू फर्मानच. पीआरओने पेज इंचार्जला संपर्क करून नानाची इच्छा ऐकवली, तेव्हा त्यांनी प्रेसमध्ये येण्यासाठी आनंदाने सहमती दर्शवली. नुकत्याच खरेदी केलेल्या जीपमध्ये बसून नाना पीआरओसह नरिमन पॉइंटला प्रेसमध्ये जाण्यासाठी रवाना झाले. ताडदेव येथील पेट्रोल पंपाच्या थोडे पुढे गेल्यावर लक्षात आले की, जीपमधील पेट्रोल संपले आहे. नेमके त्याच वेळी संपामुळे शहरातले सगळे पेट्रोल पंप बंद होते. कोणालाच काही सुचेना... तेवढ्यात अचानक नाना म्हणाले, ‘काही काळजी करू नका, आपण प्रेसमध्ये नक्की जाणार.’ त्यांनी पेट्रोल पंपाच्या मालकाचा नंबर घेऊन ताबडतोब त्याला फोन लावला, ‘मी अतिशय महत्त्वाच्या कामासाठी चाललो आहे. मला पेट्रोल पाहिजे.’ नानांची आदेशवजा विनंती तो थोडीच डावलणार! त्याने आपल्या कर्मचार्‍याला काही सूचना केल्या आणि नंतर नानाला विनंती केली, ‘आपण गाडी तिथेच ठेवून जवळच्या हॉटेलमध्ये जा. तिथे चहापाणी घ्या. तोपर्यंत माझा माणूस गुपचूप पेट्रोल भरून गाडी तिथे घेऊन येईल.’ नाना त्याच्या सूचनेप्रमाणे गाडी तिथेच सोडून सहकार्‍यांसमवेत हॉटेलमध्ये जाऊन बसले. थोड्याच वेळात पेट्रोल भरून जीप हॉटेलसमोर हजर झाली आणि नाना प्रेसकडे रवाना झाले.

dpsingh@dbcorp.in