आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डाय हार्ड-5’ बॉक्स ऑफिसवर हिट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ए गुड डे टू डाय हार्ड’ या चित्रपटाने संपूर्ण जगभरात चौथ्या आठवड्यापर्यंत सुमारे 10 अब्ज 30 लाख डॉलर कमवून आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा ठेवला आहे. ‘डाय हार्ड-5’चे हे यश निश्चितच या चित्रपटातील नायक ब्रुस विलिस याच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण 1988मध्ये ‘डाय हार्ड-1’ या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. त्या वेळी या चित्रपटाने सुमारे 60 अब्ज डॉलरची कमाई केली होती. त्यानंतरचे तीन भाग ब्रुस विलिसच्या चाहत्यांना पसंत पडले नव्हते. ‘डाय हार्ड-5’ला समीक्षकांनी फारसे मनावर घेतलेले नाही. तरीही ब्रुस विलिसचे चाहते हा चित्रपट पाहायला जात आहेत, हे महत्त्वाचे. चीनमध्ये मात्र हॉलीवूड चित्रपटांचे वेगळे चित्र आहे. येथे पीटर जॅकसनच्या ‘द हॉबिट- अ‍ॅन अनएक्स्पेक्टेड जर्नी’ या चित्रपटाने गेल्या 10 दिवसांत 3 कोटी 73 लाख डॉलरचा गल्ला कमावला आहे. ‘द हॉबिट...’ डिसेंबरमध्ये चीन सोडून जगभरात प्रदर्शित झाला होता. त्यानंतर या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 70 अब्ज डॉलरची कमाई केली असून तो सुमारे एक अब्ज प्रेक्षकांनी बघितल्याचे सांगण्यात येत आहेत. ‘जँगो अनचेंज्ड’ या क्वेन्टीन टॅरेंटिनोच्या चित्रपटाने जपानमध्ये फारसे यश कमावलेले नाही. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आठ आठवडे उलटले आहेत व त्याने जगभरात 23 अब्ज डॉलरचा धंदा केला आहे.