आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dipali Lodha's Artical On Respirator Related Disease

श्वासावरच आघात करणारी व्याधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वायू, जल आणि खाद्यपदार्थांचे प्रदूषणच जबाबदार
क्रोनिक पल्मोनरी ऑब्स्ट्रॅक्टिव्ह डिसऑर्डर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर फुप्फुस आणि हृदयाच्या स्नायूंच्या कार्यक्षमतेत झालेला बिघाड व त्यामुळे श्वासोच्छ्वासात अडथळा येणे होय. वरकरणी साधी आणि नवखी दिसणारी ही व्याधी श्वासावरच आघात करते व गंभीर परिस्थितीत परिवर्तित होऊ शकते.
आधुनिक जीवनशैलीच्या अंधानुकरणात आपण जीवनाचा मूलस्रोत असलेल्या श्वासाकडेच दुर्लक्ष करतोय की काय कुणास ठाऊक? छाती भरून श्वास घेणे किंवा शरीरातील दूषित वायू पूर्णपणे बाहेर पाडणे याला केवळ श्वासच नाही, तर वायू, जल आणि खाद्यपदार्थांचे प्रदूषण जबाबदार आहे. तसेच वाढते औद्योगिकीकरण, वाहने, धूम्रपान, मद्यपानाबरोबरच शुद्ध हवेत, सूर्यप्रकाशात व्यायामाचा अभाव आणि असंतुलित, अनियमित आहार या कारणांमुळे ही व्याधी व्यक्तीवर घाला घालते.
आहाराचे नियोजन आवश्यक...
पर्यावरणातील वाढते जल व वायुप्रदूषण, ओझोनच्या स्तराची खालावलेली पातळी आणि ग्लोबल वॉर्मिंगचा अधिक त्रास मानवालाच होतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण उत्तम ठेवून फुप्फुसांच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यायाम व विश्रांतीचा योग्य समन्वय घालणे गरजेचे आहे. तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक व नैसर्गिक अन्नघटकांचा समावेश असावा.
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहारात फळे, गडद रंगाच्या भाज्या, सुकामेव्यासह प्राणायामही हवा
शरीरातील विषारी द्रव्ये, श्वसनसंस्थेतील अनावश्यक द्रव्ये बाहेर टाकण्यासाठी तीव्र गंध असलेली द्रव्ये जसे लसूण, लवंग, दालचिनी, मिरची आणि नीलगिरी, लेमनग्रास अशा अ‍ॅरोमॅटिक तेलांचा आहारात समावेश असावा. याशिवाय रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आहारात नैसर्गिक हंगामी फळे, गडद रंगाच्या भाज्या आणि सुकामेव्याचा समावेश करावा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, श्वसनसंस्थेतील स्नायूंची कार्यक्षमता वाढवण्यासाठी श्वसन नियंत्रणासह प्राणायाम करावा. त्याचप्रमाणे मोकळा सूर्यप्रकाश व शुद्ध हवेत नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे.
दिनचर्येत बदल...
दिनचर्येच्या बदलातून आहार नियोजनाद्वारे या व्याधीला प्रतिबंध करणे शक्य आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याने ब्रॉँकायटीस, न्यूमोनिया, क्रोनिक कफ यासारख्या आजारांबरोबरच फुप्फुसांचे आरोग्य व कार्यक्षमता पूर्ववत करता येऊ शकते. त्यासाठी गरज आहे ती फक्त मेडिकोज, आहारतज्ज्ञ, फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाची आणि दिनचर्येत बदल करण्याची.