आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहित्यात वेगळेपणा जपतानाच मार्केटिंगचाही मंत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संवादाचा विषय - मी पण लेखक
सहभाग:
सावी शर्मा, दिव्यप्रकाश दुबे, एल. पी. पंत, किंजल शहा, अनुज खरे , अानंद नीलकंठन
लेखक बनण्याचे प्रत्येकाचे निमित्त भिन्न असले, तरी लिहायला प्रवृत्त झाल्याची प्रेरणा एकसमान हाेती. त्या प्रेरणेमागील रहस्य उलगडताना सावी शर्मा, दिव्यप्रकाश दुबे, एल. पी. पंत, अानंद नीलकंठन या नवलेखकांनी त्यांच्या लेखनाचा प्रवासच उलगडून दाखवला. ‘सपनोंके मर जाने का डर, सबसे खतरनाक हाेता है’ या दाेन अाेळींमधून प्रत्येकाने व्यक्त हाेणे का अावश्यक अाहे, त्याचा कानमंत्रच दिला. दिव्यप्रकाश दुबे म्हणाला, ज्या माणसाला कधीच कुणी विचारत नाही, ज्याच्याकडे सामान्यपणे इतर दुनिया दुर्लक्ष करते, अशांनाच हीराे बनवून लिहिण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले. मग अशाच स्वरूपाची पात्रे निवडून मी त्यावर कथा करायला लागलाे. अामच्या काॅलनीत एक अंकल राेज सायंकाळपासून गच्चीवर बसून दारू प्यायचे. त्यांचे तसे वागणे त्यांच्या घरच्यांना पसंत नव्हते. मात्र, दारू पिताना ते अासपासच्या गच्चीवरील कुणाशीही संवाद साधताना जे बाेलायचे ते साधारणपणे ‘सब ठीक हाे जायेगा’ अशाच स्वरूपाचे असायचे. म्हणजेच कुणालाही दिलासा देणारेच शब्द ते वापरत असतील, तर अशा माणसाला हीराे करायला काय हरकत अाहे, असा विचार करून त्यांच्या व्यक्तिचित्रावरदेखील खूप कथा लिहिल्या. अशा माणसांनाच हीराे बनवून त्यांचे पुस्तक प्रकाशित हाेऊन ते खूप लाेकप्रिय झाले. त्यातून मग त्या पुस्तकाची व्हिडिअाे काॅपी करूनदेखील प्रचार केल्याचे दिव्यप्रकाश दुबे यांनी नमूद केले. तर अत्यंत नवाेदित अाणि सीएच्या अखेरच्या वर्षाला असलेल्या सावी शर्माचा अनुभव सगळ्यांपेक्षा भिन्न हाेता. सध्याच्या काळातील मुलांना ज्ञान, प्रबाेधन देण्याचा विचारदेखील करू नये. त्यांना त्यांच्या प्रॅक्टिकल लाइफमधील अनुभवांतूनच काही मांडण्याचा केलेला प्रयास भावताे, हे मला कळल्याने मग मी तसेच साहित्य लिहिण्यास प्रारंभ केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर लिहिलेल्या साहित्यातील काही काेट्स फेसबुकवरून अाणि अन्य साेशल मीडियातून सर्वदूर पाेहाेचवत गेले. ते अनेकांना अावडल्याने काहींनी ते काेट‌्स त्यांच्या डीपीवरदेखील ठेवल्याने अापसूक प्रचार हाेत गेला. अाता प्रकाशकाची शाेधाशाेध करून वेळ वाया घालवण्यापेक्षा अापणच ते प्रकाशित का करू नये, असा विचार करून मग मीच माझे साहित्य प्रकाशित केले. त्यानंतर माझ्या पुस्तकासाठी अॅमेझाॅनवर अकाउंट काढले. हळूहळू ताे वाढत जाऊन बेस्ट सेलरपर्यंत गेल्याचा अानंद वर्णनातीत असल्याचे सावी सांगताना तिच्या चेहऱ्यावरचा अानंद लपून राहिला नाही. यातूनच तिने अाधुनिक मार्केटिंगचा संदेश दिला.

तर लेखक अानंद नीलकंठन यांनी त्यांच्या साहित्यात नकारात्मक व्यक्तिरेखांना केंद्रस्थानी ठेवले. त्याबाबत त्यांचा दृष्टिकाेन असा हाेता की, काेणतीही कथा ही कुणाच्या दृष्टिकाेनातून बघितली जात अाहे, त्यावर ती कथा सांगितली जाऊ शकते. अापल्या नजरेतून राम हा देवासमान अाहे. मात्र, सीतेच्या नजरेतून बघितले तर राम हा एखाद्या सामान्य पतीसारखाच अाहे असेच तिचे मत असेल, असेही त्यांनी नमूद केले. अशाप्रकारच्या रावण अाणि दुर्याेधनासारख्या व्यक्तिरेखांना केंद्रस्थानी घेऊन त्यांच्या दृष्टिकाेनातून कथा मांडल्याने मलादेखील १८ प्रकाशकांनी नाकारल्याचेही नीलकंठन यांनी नमूद केले. मात्र, मला काहीच घाई नव्हती. त्यासाठी मार्केटिंगदेखील केले नाही. अखेरीस क्राॅसवर्डने माझी काही पुस्तके विकल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला अन‌् मग तिथून हा लेखनप्रवास सुरू झाला. हिंदी अाणि इंग्रजी फारसे चांगले येत नसतानाही मी काहीतरी लिहिले अाणि ते लाेकप्रिय झाले हेच माझ्यासाठी विशेष असल्याचे ते म्हणाले. वीस वर्षे पत्रकारिता करीत असताना खूप अनुभव घेतल्याचे एल. पी. पंत यांनी सांगितले. केदारनाथमधील प्रलयानंतर त्वरित घटनास्थळी पाेहाेचल्यानंतरचे दृश्य बघून मी हेलावून गेलाे हाेताे. मी जसं बघितलं हाेतं, ते सगळं लिहून काढलं. ते लिखाण घेऊन अनेकांना भेटलाे. पण, प्रकाशित करायला कुणीच तयार नव्हते. अखेरीस वाणी प्रकाशकाला सांगितले, ही तुम्हाला दिलेली शेवटची प्रिंट. अन्यथा मी अाता हे ब्लाॅगवर टाकून तिथेच प्रकाशित करेन. पण, मग त्यांनी प्रकाशित केले. अाता त्याच्या अावृत्त्या निघत असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रकाशकांना प्रचंड प्रमाणात मर्यादा अाहेत, हे सांगतानाच दर्जेदार साहित्याला प्रकाशक केव्हाही तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले. चांगले साहित्य तितक्याच प्रभावीपणे वाचकांपर्यंत पाेहाेचणे, तितकेच प्रभावीपणे ते सादर करणे अावश्यक असल्याचेही क्राॅसवर्डचे प्रकाशक किंजल शहा यांनी नमूद केले. त्यामुळे कुणाचेही साहित्य कुठल्या प्रकाशकाने नाकारले तरी त्यांनी निराश न हाेता अन्य पर्यायांचा विचार करावा, असेही शहा यांनी सांगून लेखकांना लिहिण्यासाठी प्राेत्साहित केले.
{शब्दांकन : धनंजय रिसाेडकर
बातम्या आणखी आहेत...