आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुरूप कॉर्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुरूप म्हणजे शरीराबाहेरील कुठलीही कृत्रिम वस्तू (फॉरीन बॉडी) शरीरात रुतून बसणे. उदा. काटा, काच,रेती, कुस (लाकडाचा) लोखंटी बर इत्यादी. शरीर अशा प्रकारची बाहेरील वस्तू कधीही स्वीकारत नाही. त्वचेद्वारे अशी बाहेरील वस्तू एका घट्ट आवरणाने पकडून ठेवली जाते व त्याला शरीरात जाण्यापासून प्रतिबंध केला जातो. कुरूप -कॉर्न ही जणू शरीराला वॉर्निंग देण्याची त्वचेची भाषा आहे. जणू त्वचा सांगत असते की ही फॉरीन बॉडी त्वरित काढून टाका. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार खोलवरचे कॉर्न काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते, परंतु हा उपचार खर्चीक तर असतोच व वेदनादायकदेखील. शस्त्रक्रियेमध्ये कुरूपासोबत काही मांसल भागदेखील काढला जातो व नंतर जखम भरण्यासाठी टाकेदेखील द्यावे लागतात. या सर्व प्रक्रियेदरम्यान रुग्णास क्वचित कामकाजापासून सुटीदेखील घ्यावी लागते. जर कुरूप एकापेक्षा अधिक असतील तर खर्च व त्रास देखील अधिकच असतो. वरवरच्या कॉर्नसाठी कॉर्नकेपचादेखील शक्यतो उपयोग होत नाही. बरेच जण घरीच कुरूप ब्लेडने कापणे, सुईने टोकरणे, गरम सळईने चटके देणे, असे त्रासदायक उपाय करतात, परंतु त्याने काही फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक होते. शिवाय कायमची दुखापत होण्याची जास्त शक्यता असते व कुरूप परत जैसे थे !


होमिओपॅथी या उपचार पद्धतीने अशी गुणकारी औषधी उपलब्ध आहेत की ज्याने हातही न लावता केवळ पोटात औषधी देऊनच कॉर्न काढले जातात. या औषधीमुळे काही दिवसातच कॉर्न आपोआप गळून पडतात. ही औषधी अत्यंत सुरक्षित व साइडइफेक्ट्स रहित असतात. त्यामुळेच लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वासाठीच उपयुक्त ठरतात. काही औषधांची नावे- ग्राफायटीस, अ‍ॅँटीमनीकृडम, नायट्रिक अ‍ॅसिड, सिलेशिया, पेट्रोलियम थुजा, रसटॉक्स इत्यादी, परंतु वरील औषधी ही तज्ज्ञ होमिओपॅथी डॉक्टरांकडूनच घ्यावीत. तज्ज्ञ डॉक्टर रुग्णाची हिस्टरी घेऊन व निरीक्षण करून योग्य औषधाची निवड करतात व त्याची पोटेन्सीदेखील ठरवतात.


स्वत:च औषध (सेल्फ मेडिकेशन) घेण्याचे ब-याचदा फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक संभवते. कुरूप न निघाल्यास होमिओपॅथीवरील विश्वासही उडतो. रुग्ण कुरूप गैरमार्गाने काढण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे औषधी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. औषधी पोटातून घ्यायची असल्यामुळे एकाचवेळी 8 ते 10 कुरूप असले तरी ते सर्वच गळून पडतात. प्रत्येकासाठी वेगळा खर्च करावा लागत नाही.