आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता शिक्षणाची : निश्चित कारण....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक गढूळ वातावरण आणि शाळेची पराभूत तुरटी यांचं नातं उलगडून दाखविणारी ही एक सुंदर कविता.... समाज, पालक, शासन जणू शाळेने मुलांना बेटासारख्या वातावरणात वाढवावं, अशी अपेक्षा करतो. ती अपेक्षा पूर्ण होत नाही याचे कारण शाळा हे समाजाचेच प्रतिबिंब असते. समाजातल्या ताणतणावांचे प्रतिबिंब शाळेत मुलांमध्ये पडते. त्या अर्थाने मुले हे कोरी पाटी नसतात. आपआपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी घेऊनच ही लहान मुले शाळेत येतात. त्या कुटुंबाचे आजूबाजूच्या पूर्वसंस्काराचे ओझे घेऊनच ते शाळेत येतात, पण शाळेतले शिक्षक आणि पालक शासनाच्या अपेक्षा मात्र त्या मुलांच्या पार्श्वभूमीला विसरून त्यांना घडवावे अशी असते. ही कविता त्या वास्तवाला सामोरी जाते. कवितेचा दुसरा धक्का हा हिंसेचा आहे. लहान मुलांना आपण अहिंसक व निरागस समजतो, परंतु आज समाजमनच इतके हिंस्त्र झाले आहे ..... लहान मुलांवर ती हिंसा इतक्या वेगाने आदळते आहे की लहान मुलांचे निरागस मन केव्हाच कोमेजून ते निबर बनले आहे. आजूबाजूच्या वातावरणात सिद्धार्थला त्याच्या वडिलांनी जसे राजवाड्यातच दु:ख बघायला मिळू नये म्हणून ठेवले होते तसे आज कोणताच पालक मुलाला ठेवू शकत नाही.

टीव्ही-कॉम्प्युटर गेम-मोबाइल गेमपासून तर घराघरातल्या भांडणापासून देशातील आंतरराष्ट्रीय भांडणांपर्यंत इतक्या विविध अंगाने हिंसा मुलांच्या मनावर आदळते आहे की मुले त्यापासून मुक्तच राहू शकत नाहीत. यातून ते निबर तर झाले आहेत पण हिंसेबद्दल एक सुप्त आकर्षण त्यांच्या मनात निर्माण झाले आहे. हिंसा त्यांना एक खेळ वाटू लागली आहे. डिस्कव्हरी चॅनलवर वाघ, हरणाचा पाठलाग करताना आपण बघतो आणि ज्याक्षणी वाघ हरणावर झेप घेतो ते आपण बघू शकत नाही तेव्हा आपण चॅनल पटकन बदलून टाकतो, पण मुले ते दृश्य विलक्षण तन्मयतेने बघतात आणि ते चॅनल बदलू देत नाहीत. त्यांना ती हिंसा एखाद्या खेळासारखी वाटते. कॉम्प्युटर गेममधील मोडणार्‍या गाड्या, पडणारी माणसे, मरणारे जीव हे मुले इतक्या सहजतेने करतात की जणू त्यांच्या हिंसा अंगवळणी पडलीय. यातून मुलांच्या मनात प्रत्यक्ष हिंसेचे एक आकर्षण तयार होते. ते साधा कोणताही खेळ हिंसेच्या मनोवृत्तीनेच खेळतात. चित्रपटातील हिंसेच्या दृश्याने त्यांना शस्त्रांचे आकर्षण वाटते. त्यांचे साधे खेळही युद्धासारखेच असतात.

कवितेत बंदुकीची चौकशी करणारी मुले ही त्यातून येतात. जिथे आमचे खेळसुद्धा युद्धासारखे खेळले जातात. जिथे आमचे समाजमन स्पर्धेसारख्या हिंसेला समर्थन देते, जिथे दंगलींचे उदात्तीकरण केले जाते, दंगलींचे समर्थन केले जाते, कुटुंबातील वातावरण तणावग्रस्त असते अशा समाजात मुले ही हिंसेचे पुजारीच असणार...हेच वास्तव ही कविता पुढे आणते.

सूर्यप्रकाश प्रकाशाचा वेग व बरेच काही.... वर्गात मुलांनी विचारलं विमानाचा वेग किती गुरुजी सुखावले, गुरुजी आनंदले (कवी - प्रशांत असनारे, अकोला)
संकलन : हेरंब कुलकर्णी