आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education Article About Dr. Babasaheb Ambedkar Research And Training Institute Pune

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे - विशेष शिष्यवृत्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिष्यवृत्तींची संख्या व तपशील : एकूण उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या 101 असून, यापैकी 30% शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या महिलांसाठी तर 3% शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.

पात्रता: अर्जदार अनुसूचित जातींपैकी असावेत. त्यांनी महाराष्ट्रातील विद्यापीठ व शिक्षण संस्थांतून पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनपर एम.फिल., पीएच.डी.साठी त्यांच्या अभ्यासक्रम कालावधीसाठी संशोधनपर शिष्यवृत्ती देण्यात येईल.
वरील शिष्यवृत्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिप स्वरूपात देण्यात येईल व त्याचे स्वरूप आणि रूपरेश राजीव गांधी नॅशनल फेलोशिपच्या धर्तीवर असेल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुणेच्या https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे
भरलेले अर्ज रजिस्टर्ड टपालाने डायरेक्टर जनरल,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट,
28, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे-411001 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2014.