आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयटी मॅनेजमेंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या दोन दशकांमध्ये व्यापार उद्योगामध्ये जी काही भरभराट होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे अनेक करिअरविषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये कामाचा व्याप राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर वाढत चालल्यामुळे हा व्याप सांभाळण्यासाठी कुशल व्यवस्थापनाची गरज भासू लागली. साहजिकच व्यवस्थापन म्हटल्यावर व्यवस्थापनासाठी एमबीएची कवाडे खुली झाली. जवळपास प्रत्येकालाच तेव्हापासून एमबीए करावंस वाटू लागलं. एमबीए हे क्षेत्र केवळ मार्केटिंग, फायनान्स किंवा एचआर पुरते मर्यादित न राहता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा गरजेचे बनू लागले आहे. जसे फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, रिटेल मॅनेजमेंट, पेट्रोलियम मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅवेल्स अ‍ॅँड टूर मॅनेजमेंट हॉस्पिटल मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, इत्यादी म्हणजेच प्रत्येक उद्योगासाठी मॅनेजमेंट महत्त्वाचे झाले. मग विद्यार्थी मित्रांनो, सध्या तर आपण स्मार्ट फोन किंवा इंटरनेट, अ‍ॅप्स, अँड्रॉइड फोन या शिवाय काहीच बोलत नाही.
आयटी मॅनेजमेंट म्हणजे संगणक, संगणक प्रणाली किंवा त्या संबंधी जे काही आहे त्या सर्व गोष्टींचा अभ्यास! ई बिझनेस किंवा ई कॉमर्स इथे शिकायला मिळू शकते. तसेच अनेक तांत्रिक गोष्टी जसे HTML, DHTML, JAVA SCRIPT, DOT NET, V. B. सारख्या गोष्टींचा अभ्यास करता येऊ शकतो. आजकाल ऑनलाइन र्लनिंग किंवा ई र्लनिंग कोर्सेस चालवले जातात. त्यासंबंधीचं मॅनेजमेंट किंवा ऑनलाइन खरेदी / विक्री, बँकिंग व्यवहार इत्यादी गोष्टी कशा अधिकाधिक उपयुक्त पद्धतीने करता येतील किंवा त्यामधील खाचखळगे या सगळ्याच गोष्टींंची माहिती या कोर्समुळे मिळू शकतं. इंटरनेटमुळे जग जरी जवळ आलं तरी इंटरनेटच्या माध्यमातून गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत चाललंय. म्हणून सायबर सेक्युरिटी सारखा विषयीही शिकवला जातो ज्यामुळे एखादे अकाउंट हॅक करणे किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये ते हॅक होऊ शकते तसे झाल्यास किंवा होऊ नये म्हणून घ्यावयाची खबरदारी याचा समावेशसुद्धा या कोर्समध्ये होतो. सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजमेंट सारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा अभ्यासही इथे होतो. यामध्ये एखाद्या विशिष्ट सॉफ्टवेअर प्रोजेक्टचे नियोजन, नियंत्रण, अंमलबजावणी आणि निरीक्षणाचा समावेश होतो, एखाद्या प्रोजेक्टचे संपूर्ण प्लानिंग, कॉस्ट टाइम एस्टिमेशन, रिस्क मॅनेजमेंट या गोष्टी प्रामुख्याने शिकायला मिळतात. सध्या तर सगळीकडे इंटरप्राइज रिसोर्स प्लानिंग अर्थात ईआरपीच्या वापर सर्रास केला जातो. फॅक्टरी किंवा प्लांटमधून हेड ऑफिसला लागणारे सर्व डिटेल्स जसे उत्पादन क्षमता, कच्चा माल, त्याची मागणी आणि पुरवठा, वस्तूंची खरेदी, त्यांचा साठा, वस्तूंचे वितरण अर्थात इनव्हेंटरी मॅनेजमेंट, इम्लिमेंटेशन अ‍ॅँड सपोर्ट सारख्या गोष्टींचा अभ्यासही इथे केला जातो. सॉफ्टवेअर प्रोजेक्ट प्लानिंगपासून ते मोबाइल कॉम्प्युटिंग तसेच ईआरपी मॅनेजमेंटपासून, ते नेटवर्क सेक्युरिटी, सायबर, क्राइम, सिक्युरिटीपर्यंत तसेच ई-र्लनिंग मेथोडोलॉजीपासून ई-गव्हर्नन्सपर्यंत व्याप्ती असणारे आयटी मॅनेजमेंट हे क्षेत्र आहे.