आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिओडेसिक डोम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही कधी जिओडेसिक डोम पाहिला नसेल तर आज तो करून पाहायचा आहे. असे डोम लहान मुलांच्यासाठी असलेल्या मैदानावर बहुदा बनवलेले असतात. या प्रयोगासाठी लागणारे साहित्य तुम्ही मोठ्या आवडीने जमा कराल. अकरा च्युइंग गम ड्रॉप्स आणि पंचवीस टूथ पीक. टूथ पीक लाकडी किंवा प्लास्टिकचे मिळाल्यास चालतील. पण च्युइंग गम मात्र तुमच्या आवडत्या फ्लेवरचे आणा. एका सपाट पृष्ठभागावर पाच काड्यांच्या साहाय्याने एक पंचकोन बनवा ज्या ठिकाणी काड्यांची टोके एकत्र येतात तेथे च्युइंग गमने काड्यांची टोके चिकटवा. सर्व टूथपीकची लांबी सारखीच आहे. च्युइंग गममध्ये आणखी दोन काड्या घुसवा. त्यांची टोके पृष्ठभागापासून वर येतील. या टोकावर आणखी एक च्युइंग गम चिकटवा. आता तयार झालेल्या पाच च्युइंग गम पॉइंट परस्पराना जोडले म्हणजे पहिल्या पातळीवर आणखी एक पंचकोन तयार होईल. या पंचकोनापासून आणखी टूथ पीक अशा पद्धतीने जोडा की सर्वात वरील बाजूस एकच च्युइंग गम व त्याला जोडणार्‍या पाच टूथ पीक. आता वरील आकृती पाहा. तुम्ही बनवलेली रचना आकृतीप्रमाणे असल्यास तुमचे काम झाले. त्रिकोणी रचनेतील परस्पराशी जोडलेले जॉइंट तासभर ही रचना अशीच ठेवा. च्युइंग गम ओलसर असतो. याऐवजी लांबी, किंवा एम सीलचा वापर केला तर जिओडेसिक डोम लवकर तयार होईल. टूथ पीकऐवजी एकसारख्या बांबूच्या काड्या, क्विक एमसील, सेलो टेप जोडकामासाठी वापरल्यास अधिक मोठा जिओडेसिक डोम तयार होईल. तुम्ही बनवलेल्या डोमवर हाताने दाब देऊन पाहा. सर्वात आधी बनवलेला पंचकोन तळाशी असूद्या. तो तुमच्या डोमचा पाया आहे. तुमच्या अपेक्षेपेक्षा अधिक दाब जिओडेसिक डोम सहन करू शकतो. याचा खर्च अगदीच कमी येत असल्याने मोठ्यात मोठे जिओडेसिक डोम बनवण्याची जगभरात स्पर्धा सुरू झाली बारा लाख व्यक्ती बसतील अशा स्टेडियमचे आच्छादन जिओडेसिक डोमने बनवलेले क्लीव्हलंडमध्ये आहे. अशा डोमचे रहस्य त्याच्या भूमितीमध्ये आहे. बनवलेला डोम पोकळ गोलासारखा असल्याने त्याचा पृष्ठभाग कमी असतो. अशा पद्धतीच्या इतर कोणत्याही आच्छादनापेक्षा याची मजबुती आणि खर्च अत्यंत कमी होतो. या जिओडेसिक डोमच्या रचनेचा शोध बकमिनिस्टर फुलरटन याने लावल्याने याला बकी बॉल असेही म्हणतात.

madwanna@hotmail.com