आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्यदल महिला इंजिनिअर्ससाठी संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागांची संख्या : एकूण उपलब्ध जागांची संख्या 19.
आवश्यक पात्रता : अर्जदार, महिला सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाइल, एरोनॉटिकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, आर्किटेक्चर, फुड टेक्नॉलॉजी, बायो-टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, मेटॅलर्जी, इन्स्टिट्यूट वा प्रॉडक्शन इंजिनिअरिंग यासारख्या विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अथवा या पात्रता परीक्षेचा अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेल्या असाव्यात. त्या शारीरिकदृष्ट्या सक्षम असाव्यात व त्याचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

वयोगट : अर्जदारांचे वय 20 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी, मुलाखत व वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.

वेतनश्रेणी व फायदे : निवड झालेल्या महिला उमेदवारांना सैन्यदलाच्या तांत्रिक विभागात लेफ्टनंट म्हणून दरमहा 21000 रु. मूळ वेतनावर नेमण्यात येईल. याशिवाय त्यांना सैन्यदलाच्या नियमांनुसार इतर भत्ते, फायदे व भविष्यकालीन बढतीच्या संधी उपलब्ध होतील.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 5 ते 11 जुलै 2014च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टोरेट जनरल ऑफ रिक्रुटिंग, एजीज ब्रँच, आयएचक्यू एमओडी (आर्मी), वेस्ट ब्लॉक-3, आर. के. पुरम, नवी दिल्ली- 110066 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2014. आहे.