आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education Article In Marathi, Maharashtra Work Science Institute Syllabus

महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेचे अभ्यासक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेमध्ये उपलब्ध असणार्‍या विशेष अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

> मास्टर ऑफ लेबर स्टडीज : दोन वर्षे कालावधीच्या या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले असावेत.

> औद्योगिक संबंध पदविका अभ्यासक्रम : या विशेष पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्‍यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. कामगार संघटनेमध्ये सक्रियपणे काम करणार्‍या निवडक सात उमेदवारांना 150 रु. दरमहा पाठ्यवृत्ती देण्यात येईल.

> निवड पद्धती : मास्टर ऑफ लेबर स्टडीज या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करणार्‍यांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षा व समूहचर्चेसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.

> अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच मिळण्यासाठी 250 रु. मनिऑर्डरने संस्थेच्या कार्यालयात पाठवावे.

> अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्थेच्या दूरध्वनी क्र. 022-24125332 वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या milsemtnl.net.inया ई-मेलवर संपर्क साधावा.

> अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील व कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज प्रबंधक, नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, दादाभाई चमारबागवाला मार्ग, परळ, मुंबई- 400012 या पत्त्यावर 16 जून 2014 पर्यंत पोहोचावेत अशा बेताने पाठवावेत.