आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मन टूल, इंदूरमधील अभ्यासक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडो-जर्मन टूल रूम, इंदूर येथे उपलब्ध असणाऱ्या खालील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

१) चार वर्षे कालावधीचा टूल अँड डाय-मेकिंगमधील विशेष पदविका अभ्यासक्रम : उपलब्ध जागा ७०.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी १० वीची परीक्षा विज्ञान व गणित हे विषय घेऊन व कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी ५०%पर्यंत शिथिलक्षम आहे.

२) दोन वर्षे कालावधीचा मशिनिस्ट विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम : उपलब्ध जागा २४.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी १० वीची परीक्षा विज्ञान व गणित हे विषय घेऊन व कमीतकमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी ४०% नी शिथिलक्षम आहे.

वयोगट : वरील दोन्ही अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांचे वय १५ ते १८ वर्षांच्या दरम्यान असावे.

निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा १२ जुलै २०१५ रोजी घेण्यात येईल.

उमेदवारांची संबंधित पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची संबंधित अभ्यासक्रमासाठी अंतिम निवड करण्यात येईल.

अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी ७५० रु.चा (राखीव गटातील उमेदवारांसाठी ३५० रु.)चा डिमांडड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ मे २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-जर्मन टूल रूम, इंदूरची जाहिरात पाहावी, दूरध्वनी क्र. ०७३१-४१०७४३ वर संपर्क साधावा. अथवा टूररूमच्या www.igtr-indore.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर, इंडो-जर्मन टूल रूम, २९१/बी-३०२/ए, सेक्टर-ई. इंडस्ट्रियल एरिया, सांवेर रोड, इंदूर ४५२०१५ (मध्य प्रदेश) या पत्त्यावर ३० जून २०१५पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.