आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, पुणे येथे प्रशिक्षणार्थी निवड पात्रता परीक्षा 2013-2014

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, पुणे येथे हवामान बदल विषयांतर्गत प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी घेण्यात येणा-या प्रवेश पात्रता-निवड परीक्षा 2013-2014 साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत.


उपलब्ध जागांची संख्या व तपशील : या योजनेअंतर्गत निवड करण्यात येणा-या उमेदवारांची संख्या 30 आहे. प्रशिक्षण योजनेचा मुख्य उद्देश हवामान बदल क्षेत्रात युवा संशोधकांची निवड करून त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह पूर्ण केलेली असावी.


मेकॅनिकल, केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अथवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधील बीटेक, बीई, एमटेक, एमई अथवा एमएस अभ्यासक्रम-


भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सांख्यिकी, गणित, हवामान बदल, खगोलशास्त्र यासारख्या विषयातील एमएस्सी, एमटेक वा एमएस अभ्यासक्रम.


विशेष सूचना : जे विद्यार्थी-उमेदवार यंदा वर नमूद केलेल्या पात्रता परीक्षांच्या अंतिम वर्षाला बसले असतील तेसुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र आहेत, मात्र त्यांनी गुणांची आवश्यक ती टक्केवारी पूर्ण केलेली असावी. याशिवाय अर्जदारांनी आयआयटी, जीएटीई, सीएसआयआर, यूजीसी, एनईटी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश पात्रता परीक्षा 2011, 2012 अथवा 2013 या शैक्षणिक वर्षांमध्ये दिलेली असावी.

- निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना त्यांची संबंधित पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व वर नमूद केलेल्या प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांक या आधारे जून 2013 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, पुणे येते मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.


- पाठ्यवेतन व फायदे : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25000 रु. पाठ्यवेतन स्वरूपात देण्यात येतील. याशिवाय त्यांना त्यांच्या अभ्यास क्षेत्रात संशोधनपर पीएचडीसुद्धा करता येऊ शकेल.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी, पुणेच्या दूरध्वनी क्र. 020-25904504 वर संपर्क साधावा. अथवा इन्स्टिट्यूटच्या http://www.tropmet.res.in किंवा www.moes.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : वरील संकेतस्थळांवर नमूद केल्यानुसार अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2013.

ज्या विद्यार्थ्यांना हवामान व संबंधित प्रगत विषयातील विशेष प्रशिक्षणासह संशोधनपर पीएचडी करून आपले करिअर करायचे असेल अशांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.