आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचारी निवड आयोगाची हिंदी भाषांतरकार निवड परीक्षा-2014

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्मचारी निवड आयोगातर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणार्‍या हिंदी भाषांतरकार व हिंदी प्राध्यापक निवड परीक्षा-2014 साठी खालीलप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी हिंदी व इंग्रजी या विषयांसह पदवी व त्यानंतर यापैकी एका विषयातील पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी व त्यांना हिंदीच्या भाषांतर, शैक्षणिक कामाचा अनुभव असायला हवा.
वयोमर्यादा : अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांचे वय 30 वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर 8 जून 2014 रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई केंद्राचा समावेश असेल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणार्‍या उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याद्वारा त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व भत्ते : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 9300-34800+4200 या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. याशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदे पण देय असतील.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून 100 रु.ची निर्धारित टपालघरांमध्ये उपलब्ध असणारी सेंट्रल रिक्रुटमेंट तिकिटे लावणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या 22 ते 28 मार्च 2014 च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.ssc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : महाराष्ट्रातील उमेदवारांनी विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्र आणि रिक्रुटमेंट तिकिटांसह असणारे अर्ज क्षेत्रीय निदेशक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, 101, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई-400020 या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2014.

पुढील स्लाइडमध्ये, कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झामिनेशन : 2014