आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्णबधिरतेकडे दुर्लक्ष नको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच 3 मार्च हा दिवस कर्णबधिरता जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो. गेल्या वर्षी म्हणजे 3 मार्च 2012 रोजी सर्वप्रथम चीनमध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला. आपल्या सभोवताली घडणा-या घटनांचे, वस्तूचे आवाज सतत ऐकत असतो. त्याचा विशिष्ट असा अर्थ असल्याने आपण त्याचा बोध घेऊ शकतो, पण जर हे आवाज आपण ऐकू शकलो नाही तर ? किंवा त्याची आपणास जाणीव झाली, पण नीटसे समजू शकले नाही तर? जेव्हा व्यक्तीच्या श्रवणक्षमतेत घट होते. तेव्हा आपल्याला इतरांचे बोललेले नीटसे समजत नाही. पुन्हा पुन्हा विचारावे लागते. हलके आवाज ऐकू येत नाही. गर्दीच्या ठिकाणी गोंधळल्यासारखे होते. प्रसंगी आपल्याला नकारात्मक दृष्टीचा सामनाही करावा लागतो. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला साथ देणा-या या निसर्गाच्या देणगीपासून वंचित होऊन हतबल होणे हा शेवटचा पर्याय असू शकत नाही.आज नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्या आधारे आपण श्रवण दोष व तत्संबंधी विकारावर मात करू शकतो आणि नव्या उमेदीने आयुष्य जगू शकतो, पण त्यासाठी गरज आहे ती योग्य मार्गदर्शन आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याची. त्यामुळे आपल्याला उपचार करता येतात. उदा. श्रवणयंत्र व त्याचा वापर याबद्दल मार्गदर्शन मिळू शकते. ऐकण्यात त्रास होणे हा एकच कर्णदोष असू शकत नाही. त्यामुळे साधारण वाटणारे लहान -सहान लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कान-नाक-घसा तज्ज्ञ व श्रवणतज्ज्ञांना भेटून त्यावर उपाययोजना करणे योग्य ठरेल.