आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओले हाऊ नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाऊस म्हटलं तर आठवतो बालपणाचा काळ आणि आज तारुण्यातला दिवस. लहानपणी पावसाळा आला की धो धो पत्र्यावरचं पन्हाळ्यातील पाणी पकडायचं, उगाच ओलं व्हायचं. घरातून मम्मी-पापा ओरडायचे, ‘ओले नका होऊ!’ मग बहाणा करून बादल्या भरतेय ना आपल्याला, असं सांगायचं. जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत ओलं होण्याची, चिंब भिजण्याची जाम मज्जा. एकदा का पाऊस थांबला की मग तुंबलेल्या पाण्यात धरण बांधायचं. चिखलाचं. गल्लीभर हिंडून सर्वांच्या अंगणात जाऊन चिखलाचे गोळे करायचे. मार खायचा, पुन्हा नाही जाणार म्हणायचं आणि तेच करायचं. किती सुखाचे क्षण होते ते! आज आठवले. कारण आज पावसानं नातं जोडलंय तारुण्याशी. मनाला मोहरून उठतोय पाऊस. घाटातून गाडी पळवताना थांबून मक्याची कणसं खाताना रिमझिम पडणार्‍या सरी आणि प्रत्येक चहाच्या टपरीवर गाडी थांबवून चहाची मज्जा लुटतानाचा पाऊस. संध्याकाळी घरी परतणार्‍या प्रत्येक थेंबातून टिपून घेतलेला पाऊस. मनात आनंद असला की निसर्गाचा आनंद द्विगुणित होतो. पण तरी आठवतेय बालपण. म्हणावंसंच वाटतं, पुन्हा परतण्यासाठी.
‘ये दौलत भी ले लो,
ये शोहरत भी ले लो,
भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो वो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी!’