Home | Magazine | Rasik | dorjee-khandu-visit-joglekar

एक भेट खांडूंशी...

सुधीर जोगळेकर, ज्येष्ठ पत्रकार | Update - Jun 02, 2011, 12:46 PM IST

'मुख्यमंत्री दालनात पाऊल ठेवलं आणि या, स्वागत असो'च्या मराठमोळया वाक्यानं दचकायलाच झालं. दोनचार वाक्यं तयार करून ठेवली असतील असं वाटून आम्ही हिन्दीत बोलायला सुरुवात करताच पुढचा धक्का खांडूंनीच दिला... म्हणाले, मराठीत बोला, मला मराठी बोलता येतं.

  • dorjee-khandu-visit-joglekar

    भारत -चीन युद्धाला पन्नास वर्षं होत आल्याचा उल्लेख निघाला होता... मोठ्या अभिमानानं ते म्हणाले होते, आता तेव्हाचा भारत राहिलेला नाही, तसंच तेव्हाचं भारतीय लष्करही राहिलेलं नाही... बदलत्या परिस्थितीची कल्पना चीनला असल्यानंच पुन्हा कुणी काही थेट कुरापत काढील अशी शक्यता आता तरी दिसत नाही...

    एप्रिलच्या चार तारखेची गोष्ट... अरुणाचलच्या सीमावर्ती भागाला भेट देण्यासाठी आम्ही काही समवयस्क-समविचारी मित्र गुवाहाटीत उतरलो होतो... गुवाहाटी विमानतळावर आमच्या स्वागतासाठी आमचा एकेकाळचा रोजमित्र दीपक फडके यायचा होता... तिसेक वर्षांनंतर दीपकची भेट होत होती, त्याच्या भूमीत... चेहरा पूर्वीसारखाच उत्साही होता, पण काहीसा रापला होता... प्रौढतेची आणि परिपक्वतेची दोन्ही चिन्हं चेहऱ्यावर नकळत दिसू लागली होती...सामान गाडीत चढवलं आणि आम्ही गुवाहाटीतल्याच युवक विकास केंद्राच्या दिशेनं झेपावलो... युवक विकास केंद्र ही अ.भा.विद्यार्थी परिषदेच्या आंतरराज्य छात्र जीवन दर्शन प्रकल्पाची गुवाहाटीतली स्थायी प्रकल्पाकृती... केंद्राच्या नावाची, वाय.व्ही.के. ही आद्याक्षरं विद्यार्थी परिषदेचे संस्थापक प्रा. य. वा. केळकर यांची ओळख सांगणारी...


    पूर्वांचलातल्या विद्यार्थ्यान्ना उर्वरित भारतात शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देताना त्यांची सोय शहरी क्षेत्रात करावी, पुढे शिकून मोठे झाल्यानंतर याच विद्या
    र्थ्यानी आपापल्या भूभागात जाऊन नोकरी-उद्योग करीत आपल्या भूप्रदेशाची सेवा करावी यासाठी विद्यार्थी परिषदेनं हाती घेतलेल्या 'मेरा घर भारत देश' प्रकल्पांतर्गत मुंबईत आलेला दीपक... त्याचं नशीब असं की त्याची सोय महाराष्ट्राचे विख्यात गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या घरी झाली आणि लेकी फुन्त्सोचा दीपक फडके कधी झाला ते आम्हालाही कळलं नाही... तेव्हा तिसरी-चौथीत शिकणारा दीपक आमच्यासमोर उभा होता. तो अरुणाचल राज्याचा इंडस्ट्रीज डायरेक्टर बनून... दीपकच्या बरोबर त्या काळात मुंबईत राहणारे आणखी पाच-पंधरा जण... त्यांच्यातला तेव्हाचा सगळयात सीनियर ताशी लामा... बी. ए., पुढे एल. एल.बी. केलेला आणि अरुणाचलात परत गेलेला.. पण मधल्या काळात ताशी अकालीच गेला होता... ताशीसारखे आणखी तिघे-चौघे अर्धवट वयात गेल्याच्या आठवणी निघाल्या आणि अरुणाचलला मिळालेल्या अनारोग्याच्या शापाचं, कमी आयुर्मानाचं वास्तव तीव्रतेनं जाणवून गेलं... पण दीपक जरी प्रत्यक्ष भेटला, तरी तालुक मिजे आणि पेमा वांगचेन मात्र फोनवरच भेटले..तान्यो गामदिकची भेट तवांगमध्ये व्हायची होती, राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यानंतर तान्यो सरकारी नोकरीत लागला होता. आणि ज्येष्ठतेच्या निकषावर सनदी सेवेत जाऊन सध्या राज्याचा एक्साइज कमिशनर बनला होता... मुख्यमंत्री दोरजी खांडू यांच्या खास विश्वासातल्या सरकारी अधिकाऱ्यामध्ये तान्योचं नाव घेतलं जात होतं... त्सांगे त्सेङ्क्षरग म्हणजे तेव्हाचा गोपाळ... तोही राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यानंतर टेंगात ए.डी.सी. बनला होता.. दीपक, तान्यो आणि गोपाल सगळेच लाल दिव्याच्या गाड्यांचे अधिकारी बनले होते... त्यांच्याच प्रयत्नानं अगदी ऐन वेळेला सांगूनही मुख्यमंत्री निवासाचे दरवाजे आमच्यासाठी खुले झाले होते... मुख्यमंत्री निवासाच्या दारावरच तान्यो हजर होता... सिक्युरिटी चेकिंग झाल्यावर पाचच मिनिटात निरोप आला भेटायला बोलावल्याचा... मुख्यमंत्री दालनात पाऊल ठेवल आणि 'या, स्वागत असो'च्या मराठमो' या वाक्यानं दचकायलाच झालं... मराठीत कोण बोललं बुवा, असा विचार करणारा आमचा प्रश्नार्थक चेहरा पाहिल्यानंतर मुख्यमंत्री खांडू म्हणाले, 'काय कसा काय झाला प्रवास... काही त्रासबिस नाही ना... दचकायलाच झालं थोडंसं, कारण एवढं स्पष्ट आणि नेमकं मराठी ऐकायला मिळेल असं आमच्या स्वप्नातही नव्हतं... शैक्षणिक सुविधा नसल्यानं आपण शिकू शकलो नाही, पण पुढल्या पिढ्यांवर ही वेळ येता कामा नये याची खांडूंना काळजी असावी... तवांगमध्येच त्यांच्या आर्थिक सहकार्यातनं आणि वैयक्तिक प्रयत्नातनं उभं राहिलेलं मंजुश्री विद्यालय आम्हाला पहायचं होतं... मंजुश्री हे अनाथ मुलांसाठी सुरू केलेलं अरुणाचलातलं पहिलं निवासी विद्यालय... ते सुरू करणारे गृहस्थ स्वत: लामा... शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका शाळेत नोकरी करीत असताना अचानकपणे हा अनाथ मुलांचा प्रश्न त्यांना सामोरा आला... मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातून मग त्यांनीच एकदोन मुलांनिशी हे विद्यालय सुरू केलं... प्रश्नाची तीव्रता ध्यानात येताच, त्यांनी तवांगचे तेव्हाचे लोकप्रतिनिधी दोरजी खांडू यांच्या कानावर ही गोष्ट घातली... मुळातच लामांविषयी आदर असल्यानं खांडूंनीही हातचं न राखता मदत केली आणि आज १७९ मुलांचं निवासी विद्यालय तवांगमध्ये उभं आहे... पण त्यांच्या त्या अभिमानानं गोंधळून जाण्याची वेळ मग आमच्यावरच यायची होती... आमच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहून म्हणाले, मी मिलिटरी इंटलिजन्समध्ये काम करीत असल्यानं कुठेही पोस्टिंग व्हायचं... 71 च्या बांगलादेश मुक्ति युद्धाच्या वेळी मी त्या भागात होतो... जे काही काम माझ्यावर सोपवण्यात आलं, ते बहुधा मी नीट केलं असावं, त्यामुळेच सुवर्णपदकानं मला गौरवण्यात आलं...

Trending