आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या बाळाचे वृषण वृषणकोशातच आहे ना?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आईच्या उदरात वृषण तिसर्‍या महिन्यात तयार होते. ते किडनीच्या पृष्ठभागाशी जोडलेले असते. पुरुष संप्रेरकाच्या परिणामामुळे 3-9 महिन्यांच्या काळात वृषण हे जांघेत मार्गक्रमण करतात. 10% बालकांत वृषण हे वरच्या बाजूला राहतात. त्यातील अध्र्या बालकांत वयाच्या 9 व्या महिन्यांपर्यंत वृषण मार्गीकृत लागतात व जांघा गाठतात. वयाच्या पहिल्या वर्षानंतरही वृषण जांघेत नसतील तर ही बाब धोक्याची घंटा आहे.
बाळ ज्यावेळी जन्माला येते तेव्हा लोक त्याचे तोंड पाहायला उत्सुक असतात, परंतु एक बालरोग शल्यचिकित्सक त्याच्या जांघेतल्या वृषण जागेवर आहेत की नाही हे पाहण्यासाठी इच्छुक असतो.

कारणे :
• पुरुष संप्रेरकांचा अभाव हे सर्वात महत्त्वाचे कारण मानले जाते.
• वृषणाच्या मार्गातील अडथळे, लहान अंडकोश
• पोटाच्या मासपेशीमध्ये वृषणाचे दबणे
• Deep & Superficial Inginal Ring चा आकार कमी होऊन वृषणावर दाब आणतात.
• पोटातील दाब कमी असणे.
• पोटाच्या मासपेशी कमकुवत असणे.
• वृषापासून जांघेपर्यंत जाणारा Fibrous Tissue चा पडदा आकुंचन न पावणे.
लक्षणे : 80% बालकांमध्ये वृषण पोटाच्या खालच्या भागाला हाताला लागतात.
20% बालकांमध्ये वृषण हे पोटाच्या आतमध्ये असतात.
रोगनिदान : बाळाला खोकला काढायला लावून किंवा रडवून पोटातील दाब वाढवला जातो व वृषण कुठे लागते का याचा शोध घेतला जातो. यामुळे हाताला न लागणारे वृषण हाताला लागायला सुरुवात होते. वृषणाच्या आकारावरून त्याच्या वाढीबद्दल कल्पना येऊ शकते. सोनाग्राफी व कलर डॉपलर करून वृषणाचा आकार त्याचा रक्तपुरवठा, त्याचे स्थान व आजूबाजूची रचना यांची संपूर्ण कल्पना येऊन जाते. दोन्ही बाजूचे वृषण वर असतील व लघवीची जागा खालच्या बाजूला असेल (Hypospadias) तर अशा बाळांचे Intersex Disorder पाहण्यासाठी रक्त तपासणे गरजेचे असते.
उपचार : वृषण कोशाचे तापमान हे पोटातील तापमानापेक्षा 4 अंश सेल्सिअसने कमी असते. ही नैसर्गिक तफावत वृषणाच्या वाढीसाठी व कार्यक्षमतेसाठी आवश्यक असते. थंड तापमानामुळे वीर्य तयार होणे व त्यातील शुक्राणू जिवंत राहणे शक्य होते. वयाच्या पहिल्या वर्षानंतर वृषण नैसर्गिक जागेत नसेल तर त्याची वाढ होत नाही. तसेच शुक्राणू तयार होण्याची क्षमता संपुष्टात येते व Histological बदल सुरू होतात. या बदलांमुळे वृषण निकामी होऊन जाते. तसेच वृषणाचा कर्करोग होण्याचा धोका संभवतो. शक्य तितक्या लवकर वृषण खाली आणणे हेच या समस्यांचे समाधान आहे. शल्यचिकित्सा करून वृषण खाली आणले जाते. शल्यचिकित्सा ही चिरा मारून किंवा दुर्बिणीद्वारे केली जाते. एकावेळी वृषण खाली आणणे शक्य नसल्यास दोन टप्प्यात शस्त्रक्रिया करावी लागते. शस्त्रक्रियेत संबंधित हर्नियाची देखील शस्त्रक्रिया केली जाते व वृषण हे वृषण कोशाला चिकटवले जाते. वृषण निकामी झाले असल्यास ते काढून टाकल्यास कर्करोगापासून संरक्षण होऊ शकते.
पाठपुरावा : दर आठवड्याला एकदा असे सहा आठवडे बालरोग शल्यचिकित्सकांना भेटणे आवश्यक असते. वेळीच रोगनिदान, अचूक कलर डॉपलर व तत्काळ शल्यचिकित्सा हा या समस्येला सोडविण्याचा रामबाण उपाय आहे. पौरुषत्व टिकवणे व कर्करोग टाळणे हीच उपचाराची उद्दिष्ट्ये आहेत.
sandeep17580@gmail.com