आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न जुळलेल्या हाडावरही यशस्वी शस्त्रक्रिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील एका 51 वर्षीय रुग्णाला फेब्रुवारी 2008 मध्ये अपघात होऊन डाव्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले होते. त्यांच्यावर अतिशय नामांकित हाडांच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करून पट्टी बसविण्यात आली होती. परंतु ही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्यामुळे पुन्हा दोनदा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या सुद्धा अयशस्वी झाल्या. 3 वर्षे होऊनही त्यांचे हाड जुळले नाही. त्यांना पायात वेदना होत व नेहमी कुबड्या घेऊन चालावे लागे. या दरम्यान त्यांचे अतोनात व्यावसायिक व मानसिक नुकसान झाले व काही लाखांचा खर्च झाला. पाय 1 इंचाने लहान झाला. अशा अवघड परिस्थितीत इलिझारोव्ह तज्ज्ञांनी (रशियन पद्धतीची शस्त्रक्रिया) त्यांच्यावर ऑक्टोबर 2011 मध्ये रशियन इलिझारोव्ह या जगातील अतिप्रगत तंत्रज्ञानाने महाराष्ट्रात शस्त्रक्रिया केली. त्यात पुण्याच्या अस्थिरोगतज्ज्ञांचेही सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेच्या दुसर्‍याच दिवसापासून तो रुग्ण पायावर पूर्ण वजन देऊन चालू लागला व त्याने आपल्या कामालासुद्धा सुरुवात केली. 7 महिन्यांमध्ये त्यांचे न जुळलेले हाड व्यवस्थित जुळले व पायाची उंची सुद्धा 1 इंचाने पूर्ववत वाढवण्यात आली.
तंत्र - रशियन इलिझारोव्ह शस्त्रक्रियेत विनाचिरफाड बाहेरूनच वायर व रिंगांची फ्रेम बसविण्यात येते. जगातील हे अत्यंत प्रगत व खात्रीपूर्वक तंत्रज्ञान आहे. या उपचाराचा खर्चही वाजवी येतो. इलिझारोव्ह पद्धतीने सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स न जुळलेली -वाकडी जुळलेली हाडे, अयशस्वी शस्त्रक्रिया, जन्मजात अथवा नंतर उद्भवलेले अपंगत्व, हाडांना लागलेली कीड, उंची वाढवणे, लहान मुलांचे अस्थिरोग, मणक्यांचे फ्रॅक्चर्स, गुडघेदुखी आदी 80 टक्के अस्थिरोगांवर उपचार करता येतात. अर्थात या इलिझारोव्ह पद्धतीचे संपूर्ण प्रशिक्षण रशियन इलिझारोव्ह सेंटर, रशिया येथे मिळते. आतापर्यंत अशा अनेक अवघड व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडलेल्या आहेत.