आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात धोका अतिसाराचा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अन्न हे जगण्यासाठी तर जगणे हे अन्नासाठी, मानवाच्या तीन प्रमुख गरजा अन्न वस्त्र निवारा जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. परंतू ते किती घ्यायचे, कसे घ्यायचे हे बघणे जरुरी आहे. कारण पोटाची काळजी घेणे हे शरिराच्या दृष्टिने खुप महत्वाचे आहे. पोट बिघडले तर बर्‍याच आजारांना निमंत्रण मिळते, त्यापैकी अतिसार हा एक आजार आहे.
अतिसार म्हणजे जुलाब होय. लहान मुलांपासून मोठय़ा माणसापर्यंत कोणालाही जुलाब होऊ शकतात. ज्या विकारामध्ये सरणाची किंवा मलविसर्जनाची क्रिया अतिप्रमाणात होते. त्यालाच अतिसार म्हणतात. तसेच ज्या विकारात ऑव युक्त मल किंवा फक्त पातळ मल अतिप्रमाणात शरिराबाहेर फेकला जातो व ज्याचे दुष्परिणाम शरिरावर तात्काळ दिसतात त्याला सुध्दा अतिसार किंवा जुलाब म्हणतात. पोटात सेवनामधून आलेले काही विषद्रव्ये व पोटातील आम बाहेर टाकावा म्हणून सुरु झालेल्या प्रक्रियेमुळे शरिरातील उपयुक्त द्रव्ये आणि आन्नातून आलेला रस व रक्तादी धातूंचा सार बाहेर टाकला जाऊ शकतो म्हणून अतिसार किंवा जुलाबमध्ये खुप अशक्तपणा येतो. पाण्यातील ताकत निघून जाते. उभे राहायला जमत नाही. चक्कर येते, शरिर एकप्रकारे शरिर रसावरच चालते आणि जर अतिसारामध्ये शरिरातील रस जर कमी झाला तर शरिराची अवस्था उसातून रस काढल्यावर चिपाटाची होते तशी होते. लहान मुलांच्या अतिसारात लगेचच काळजी घेतली नाही शरिराला योग्य रसद्रव्ये पूरविली गेली नाही तर, शरिराला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय अतिसारामुळे गुदभागाच्या अती कोमल त्वचेला सततच्या घर्षणामुळे इजा होऊ शकते व नंतर शौचाला आग होणे, वा फिशर सारखा त्रास होऊ शकतो.
अतिसार झाल्यावर अशक्तपणा नाही तर इतरही व्याधी उत्पन्न होऊ शकतात. नुसते पाण्यासारखे जुलाब होणे, ऑव सहीत जुलाब होणे, जुलाब कमी झाले तरी गुदाचा आतील भाग बाहेर येणे, असे वेगवेगळे त्रास होऊ शकतात. अतिसाराची सर्वात मोठी अडचण प्रवासात जाणवते. नवीन ठिकाणी गेल्यावर तेथील काही पदार्थ खावेच लागतात त्यामुले आणखीनच त्रास होतो. त्यामुले नको तो प्रवास आणि नको ते जेवण असे होऊन जाते, असे म्हणतात की माणसाने नेहमी अर्धपोट जेवावे, रात्री हलका व द्रवाहार घ्यावा. शिवाय अनोळखी ठीकाणी जेवण टाळावे. वेळप्रसंगी उपवास झाला तरी चालेल. मुळातच अतिसारामध्ये भूक लागत नाही, आणि अशातच पोट बिघडले तर पोटाला विर्शांती देणे हे सर्वात चांगले आहे. भूक लागली तर कोरड्या लाह्या, पिठाची लापसी, मूगाची खिचडी असा आहार घ्यावा. अतिसाराच्या प्रकारात फक्त जुलाब थांबवणारी औषधी घेण्याची चूक कधीही करु नये. याने पोटातील आव वाढतात व रोग बरा करण्याएैवजी दबवला गेल्याने अल्पावधीतच पुन्हा डोके वर काढू शकतो. अतिसारात मीठ, साखर, पाणी, ग्लुकोज पावडर ई घेणे महत्वाचे असते, त्यासोबत इलेक्ट्रॉल पावडर, नारळ पाणी घेऊ शकता. तसेच लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करुन घ्यावा.
kzunzunwala@hotmail.com