आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोट म्हणजे जादूचा पेटारा आहे, असे म्हणतात ते खरेच आहे. पोटात पचन संस्था, उत्सर्जन संस्था, पुनरुत्पादन संस्था, रक्ताभिसरण संस्था अशा महत्त्वाच्या संस्थांचे अनेक अवयव असतात. त्यातही पचन संस्थेचा पुष्कळसा भाग पोटातच असतो. आतडे हा पचन संस्थेतील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. जठरापासून गुदद्वारापर्यंत पसरलेल्या नलिकारूपी अशा या इंद्रियाची विभागणी लहान व मोठे आतडे अशी केली जाते. जठरापासून लहान आतडे सुरू होते. हे सुमारे 22 फूट लांब व दीड इंच नळीच्या आकाराचे असते. आतड्यांची ही नळी स्नायूंची बनलेली असते व नळीमध्ये आतील बाजूस मखमली आवरण असते. लहान आतड्यात अन्नाचे पचन होते. पचनानंतर रक्तामार्फत अन्नातील पोषक घटकांचे शोषणही इथेच केले जाते. स्नायूंच्या आकुंचन -प्रसरणामुळे अन्नपचनानंतर उरलेला चोथा व पाणी पुढे पुढे सरकत जाते. लहान आतड्यात आजार झाल्यास आतड्याच्या स्नायूंचा आकुंचन-प्रसरणाचा वेग वाढतो व अन्न पचन न होताच पुढे वेगाने ढकलले जाते. यालाच आपण जुलाब असे म्हणतो. लहान आतडे संपते तेथून मोठे आतडे सुरू होते. याची लांबी 5 ते 6 फूट असते, पण त्याची रुंदी जास्त असते. तेथे पाण्याचे शोषण होऊन चोथा बाहेर टाकला जातो. यालाच आपण विष्ठा असे म्हणतो.
drdixit1@rediffmail.com