आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुमेह आणि होमिओपॅथी व्यक्ती तितक्या प्रवृत्तीनुसार औषध योजना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिंता, काळजी, मानसिक ताणतणाव हे बहुतांश आजारांचे मूळ आहे. यांच्या प्रभावाखाली असणार्‍या आजारांमध्ये मधुमेहींचे प्रमाण समाजात सर्वात जास्त आहे व वाढतही आहे. स्त्री-पुरुष वा अगदी बायकांमध्येही आढळून येणारा हा मधुमेह वा प्रमेह. आपण जे अन्नघटक खातो त्याचे रुपांतर रस, रक्त आदी सप्तधातूत होते.
शरीरात अन्नाचे रुपांतर साखरेत (ग्लुकोज) होते. व ही साखर शरीर आवश्यकतेनुसार वापरते. प्रत्येक पेशीचे ते इंधन असते. हे रक्तशर्करेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्याचे काम स्वादुपिंडातील इन्शुलिन करते. शरिरात जर इन्शुलीन तयार होण्याचे प्रमाण कमी वा बंद झाले तर रक्तशर्करेत प्रमाण वाढते व लघवीत ही साखरेचे प्रमाण आढळते यालाच आपण मधुमेह असे म्हणतो रक्तात साधारणत: साखरेचे प्रमाण जेवणाआधी 70 ते 110 मि.ग्रॅ तर जेवणानंतर 110 ते 140 मि.ग्रॅ असे असते जेव्हा हे प्रमाण 180 मि.ग्रॅ च्या वर जाते तेव्हा लघवीतून साखर बाहेर पडते वेळीच मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही तर वा याकडे दुर्लक्ष केले तर शरीर मोठय़ा आजाराचे माहेरघर बनते.
मधुमेह होण्याची कारणे :-

• आनुवंशिकता :- आई, वडील यांना मधुमेह असेल तर शक्यता जास्त असते पण कुटुंबात मधुमेह नसला तरी मधुमेह कुणालाही होऊ शकतो
• स्थूलता वा वाढणारे वजन :- अनियंत्रित व अवेळी खाणे, फास्ट-जंक फूड, बेकरी पदार्थ पाव-ब्रेड याचा अतिवापर, बैठे काम व्यायामाचा अभाव यामुळे वजन वाढते व वाढणारे वजन मधुमेहाला आमंत्रण ठरते.
• स्वादुपिंडाला येणारी सूज वा कर्करोग इन्सुलिन तयार होत नाही साखर वाढते.
• अतिताण, तणाव, चिंता, काळजी, नैराश्य यामुळे शरीरावर होणारे परिणाम
मधुमेहाची लक्षणे : -
• अशक्तपणा-थकवा, अनुत्साह वा सुस्ती
• वारंवार भूक लागणे, भूक सहन न होणे.
• घशाला कोरड पडणे, तहान लागणे.
• वारंवार व रात्रीच्यावेळी जास्त प्रमाणात लघवी होणे.
• जखम लवकर न भरणे.
• तळहात-पाय याची आग होणे. मुंग्या व बधीरता येणे इ लक्षणे असू शकतात. आजार आपल्या शरीरात ठाण मांडून बसतो व दुसर्‍या इतर आजारांनाही आमंत्रित करतो.
अ) लहान वयात (ज्युव्हेनाइल टाइप) होणारा मधुमेह शक्यतो यावर इन्सुलिनचा वापर सुचविला जातो.
ब) वयस्कांमध्ये असणारा मधुमेह : 1. मधुमेहामुळे आपल्या शरिरात बरेचसे परिणाम होत असतात बहुतांश मधुमेह व हृदयविकार एकत्रितपणे सापडतात. रक्ताभिसरणात अडथळा आल्यामुळे हृदयविकाराचा झटका वा छातीत दुखणे आढळून येते. 2. मधूमेहामुळे मज्जातंतू व नसांवर परिणाम होतो. त्यालाच आपण डायबेटिक न्युरोपॅथी म्हणतो. तळपाय, तळहातात मुंग्या येणे, बधीरता वाढणे जखमा लवकर न भरणे ई. लक्षणे दिसतात. रक्तशर्करा पातळी खुपच वाढली तर हातापायाची बोटे काळीनिळी पडतात त्याला गॅंगरीन म्हणतात. मधुमेहामुळे मूत्रपिंडावरही परिणाम होतो. मूत्रपिंड अकार्यक्षम होतात व शरिरातील टाकावू पदार्थ जेके युरिया, क्रियेटीन ई बाहेर टाकले जात नाही व शरीरावर सुज येते व मूत्रमार्गात जंतूसंसर्ग (इन्फेक्शन) होतो. तसेच मधुमेहामुळे डोळ्यांवरही परिणाम होऊन दृष्टीदोष निर्माण होतात. मेंदुकडे रक्तपुरवठा कमी झाल्यास अर्धांगवायुसारखे आजाराचे प्रमाण वाढते. रक्तशर्करापातळी खूप वाढली तर रोगी बेशुध्दावस्थेतही जाऊ शकतो. नियमित तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करा म्हणजे मधुमेह तीव्र होणार नाही. आयुर्वेद नाही. आयुर्वेद व होमिओपॅथीमध्ये मधुमेहासाठी औषधे आहेत. होमिओपॅथीमध्ये व्यक्ति तितक्या प्रवृत्ती या तत्वानुसार औषधयोजना केली जाते. रुग्णाच्या स्वभाव ताण-तणाव त्याच्या आवडी निवडी पूर्व इतिहास इ लक्षात घेऊन योग्य ते औषध शोधले जाते. योग्य औषधे योग्य मात्रेत मिळाल्यास मधुमेह नियंत्रित राहिल. पण यासाठी योग्य त्या होमिओपॅथी तज्ञांचा सल्ला घ्या व निरोगी जीवन जगता येईल असा प्रयत्न केला पाहिजे.
उपचार किंवा पथ्य
• एकंदरीत आपण मधुमेहाची लक्षणे पाहिलीत मधुमेह नियंत्रित करुन मधुमेहासह नीट जगता यावे यासाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे.
• नियमित व्यायाम, रोज अर्धातास पायी चालणे. प्राणायाम व आसने यांचाही समावेश करावा.
• आहार नियंत्रण जेणेकरून वजन नियंत्रित होईल समतोल व वेळेवर आहार ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली ठरेल.
• योग्य औषधोपचार आधुनिक वैद्यकामध्ये इन्सुलिन चे इंजेक्शन वा रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी गोळ्या उपलब्ध आहेत.