आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Mridula Kulkarni's Artical On Bach Flower Medicine Best For The Woman

बॅच फ्लावर औषधी स्त्रियांसाठी उत्तम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निराशेला लवकर घालवता आले तर प्रगती शक्य
या औषधांचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मनातील नकारात्मकता जाऊन सकारात्मकता वाढते, मानवी मन आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर सतत झुलत असते, हे हेलकावे पूर्णपणे थांबवता आले नाही तरी निराशेला लवकर दूर करणे शक्य झालं तर आपली सर्वांगीण प्रगती लवकर होऊ शकते.


मानवी मन हे सागरासारखं अथांग आहे. स्व. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतील मनाचे वर्णन आपण सर्वांनीच वाचलेले आहे. जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी आपल्या मनाचे स्वास्थ्य, निरोगी अवस्था अतिशय महत्त्वाची आहे. मन निरोगी ठेवण्यासाठी राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर, संशय अशा विघातक भावनांना थारा न देता प्रेम, करुणा, शांती, चांगुलपणा, प्रामाणिकपणा, क्षमाशीलता वाढवणे महत्त्वाचे आहे.


मानसिक ताणांमुळे शरीरसंतुलन बिघडून व्याधी लागतात
मन:क्षोभामुळे उद्भवणारी चिंता, निद्रानाश, डोकेदुखी, मधुमेह, उच्च रक्तदाब ही त्याची काही ज्वलंत उदाहरणे आहेत. थोडक्यात काय मानसिक ताणांमुळे शरीराचे संतुलन बिघडते. निरनिराळ्या व्याधी उत्पन्न होतात. स्वभावाला औषध नाही या निराश, नकारात्मक विधानाला फाटा देणारी, अपवाद ठरणारी औषधे म्हणजे बॅच फ्लॉवर औषधे.


चिकित्सापद्धतीमध्ये मानवी मनाला भावनांना सर्वोच्च् स्थान
बॅच फ्लॉवर औषधे या चिकित्सापद्धतीमध्ये मानवी मनाला, भावनांना सर्वोच्च स्थान दिलेले आहे. कारण आजार बरे करण्यात आपल्या मनाचा सिंहाचा वाटा असतो. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत घरातील प्रत्येकच व्यक्ती अत्यंत ताणावाखाली वावरत असते, घरातील स्त्रीवर तर आजकाल प्रत्येकच गोष्टीचा ताण असतो, मुलांच्या शिक्षणाचा, त्यांच्या ट्युशन्स, शाळेच्या वेळा, अभ्यास इतर क्लासेस हे सर्व सांभाळणं, आपण स्वत: नोकरी करीत असल्यास कार्यालयामधील तणाव यामुळे खरं म्हणजे प्रत्येकच स्त्री कुठेतरी, कधीतरी निराश होते, थकते. विशेषत: मेनोपॉजच्या काळातील स्त्रियांना या संपूर्ण कालावधीत विविध भावनांना सामोरे जावे लागते. अशा सर्व गोष्टींमुळे तरुण मुली, महिला यांना स्थूलपणा, चेह-यावरील मुरूम, निद्रानाश, केस गळणे, पिकणे असे सर्वसामान्यपणे होणारे त्रास बघायला मिळतात. या सर्व त्रासांवर बॅच फ्लॉवर औषधे उत्तम असतात. ही औषधे म्हणजे आयुर्वेदिक, अ‍ॅलोपॅथिक, होमिओपॅथिक औषधांना पर्याय नसून त्यांना पूरक किंवा सहायक ठरणारी आहेत. पुष्पौषधीची जोड देण्याने पेशंटला बरे करण्याचा कालावधी कमी होतो.


विशिष्ट फुलांपासून तयार होणारी सौम्य स्वरूपातील नैसर्गिक औषधे
या उपचार पद्धतीत औषधेही विशिष्ट फुलांपासून तयार केली जातात, ही अतिशय सौम्य स्वरूपाची, नैसर्गिक अशी औषधे असल्याने याचे दुष्परिणाम होत नाहीत, याची सवयही लागत नाही. या उपचारांमध्ये रुग्णाच्या शारीरिक विकारापेक्षा मानसिकतेस जास्त महत्त्व दिले जाते. डॉ. बॅचनी यांनी मनाच्या नकारात्मक भावनांचे सात अवस्थांमध्ये वर्गीकरण केले आहे.
1) साशंकता
2) अनिश्चितता व अस्थिरता
3) एकटेपणा
4) आपल्या आजूबाजूच्या गोष्टींबाबत उदासीनता
5) कल्पना व त्याच्या परिणामांबाबत अतिसंवेदनशीलता
6) नैराश्य व आशाभंग
7) इतरांची अवास्तव काळजी करणे


भीती, काळजी, नैराश्य या आणि अन्य नकारात्मक त्रासदायक भावना प्रत्येक जिवंत व्यक्तीला कमी-जास्त प्रमाणात जाणवत असतातच, परंतु जेव्हा त्यांचा अतिरेक होतो त्या वेळी दैनंदिन कामकाजावर, कार्यक्षमतेवर, शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. अशावेळी बॅच फ्लॉवर औषधे मानसिकता सुखकर करतात. म्हणूनच पुष्पौषधींना मनाची संजीवनी म्हणले तर वावगे ठरणार नाही.

लेखिका या आहारतज्ज्ञ व
पुष्पौषधी तज्ज्ञ, समुपदेशक आहेत