आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Sanjay Janawale's Artical On Fear Of Phenomia, Blood Infection

न्यूमोनिया, रक्तसंसर्गाची भीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान मुलांमध्ये गंभीर प्रकारचे रोग होण्यास ‘हिमोफायलस इन्फ्लुएंझा टाइप वर्ग ब’ हे जीवाणू कारणीभूत ठरतात. या रोगात मेनिन्जायटिस (मेंदूच्या आवणावर येणारी सूज) आणि न्यूमोनिया यांचा समावेश आहे. हिब या जीवाणूमुळे हाडे, खांधे, हदय आणि रक्ताचे संसर्ग देखील होऊ शकतात. घशाला सूज आल्यामुळे श्वसनाच्या गंभीर समस्या उदभवू शकतात.


मेनिन्जाटिसमधून वाचणा-या मुलांना मज्जासंस्थेच्या दीर्घकालीन तीव्र गुंतागुंतीचा त्रास होऊ शकतो. क्वचितप्रसंगी मेंदूवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो, अशा रुग्णांना वाचादोष, श्रवण दोष, दृष्टिदोष होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर काही रुग्णाला मतिमंदतेचा त्रास होऊ शकतो तर काहींना हालचालीत त्रास होतो. उदा. स्पास्टि सिटी. मुलांमुलामधील जवळच्या संपर्कामुळे हे जीवाणू पसरतात. संसर्ग झालेले मूल जेव्हा शिंकते किंवा खोकते तेव्हा उडणा-या थेंबाद्वारे हे जीवाणू खेळणी व इतर वस्तू तोंडात घालण्यामुळे फैलतात. सर्व तान्ह्या मुलांना याचा संसर्गाचा धोका असतो. पण मुले जेव्हा शाळेत किंवा मैदानावर एकत्र असतात तेव्हा हा धोका वाढतो. याचा सर्वात जास्त धोका 5 वर्षांहून कमी वयाच्या मुलांत असतो. 4 ते 12 महिन्यांदरम्यानच्या मुलांना सर्वात जास्त धोका संभवतो.
सुदैवाने या जीवाणूंविरुद्ध सुरक्षित व परिणामकारक लस उपलब्ध आहे. लहानपणीच सर्व मुलांना ही लस दिली पाहिजे. डी. पी. टी. आणि हिपॅटायटिस बी लस देण्यावेळी ही लस देण्यात येते. जितक्या लवकर लस घेतली तितक्या अधिक प्रमाणात हिब या आजाराचा धोका तळतो. हिब या लसीचा बुस्टर जेस मूल दीड वर्षाचे झाल्यावर देण्यात येतो.


संमिश्र लस काय आहे ?
संमिश्र लस एकाहून अधिक रोगांपासून संरक्षणासाठी देण्यात येते. बाजारात उपलब्ध असलेल्या संमिश्र लसीने घटसर्प, धनुर्वात, पटर्चसिस (डांग्या खोकला) आणि हिब या जीवाणूमुळे होणा-या रोगांच्या प्रतिकारासाठी वापरता येते. या रोगांच्या संरक्षणासाठी घ्याव्या लागणा-या एकूण लसींपेक्षा संमिश्र लसीने घ्याव्या लागणा-या इंजेक्शन्सची संख्या कमी होते.