आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्वालिटी ऑफ लाइफ’ जगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एचआयव्ही हा व्हायरस जो शरीरात रोगप्रतिकारक क्षमता कमी करतो, शरीराच्या प्रतिक्षम यंत्रणेवर सीडी4 पेशींवर हल्ला करतो व तिला नष्ट करतो.
aids - acquired immuno deficiency syndrome
एचआयव्ही संक्रमित प्रतिक्षमता कालांतराने यथावकाश कमी होत गेल्यावर अनेक रोग होण्याची एड्स ही स्थिती आहे.
एचआयव्ही व एआयडीएस हे भिन्न कसे आहेत?
एचआयव्ही हे व्हायरसचे नाव आहे, एड्स ही व्हायरसमुळे होणारी स्थिती आहे. एचआयव्ही एड्समध्ये रूपांतरित होण्यास बहुदा 8-10 वर्षे लागतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला एड्स असतो- तेव्हा शरीराची अगदी सामान्य संक्रमणाचा प्रतिकार करण्याची क्षमता कमी होते. ती व्यक्ती वरचेवर आजारी पडू लागते व अशक्त होते. त्या व्यक्तीला साध्या सर्दी पडशासारख्या किरकोळ आजारापासून ते क्षय, अतिसार, बुरशीची संक्रमणे या सारखे इन्फेक्शन सहज होऊ शकतात. त्यांना संधिसाधू संक्रमणे म्हणतात. क्षय, अतिसार, बुरशीची संक्रमणे इत्यादी असलेल्या सर्व लोकांना एचआयव्ही असतोच असे नाही, हे लक्षात ठेवा.
एचआयव्ही मुख्य चार मार्गाने पसरतो
1. असुरक्षित लैंगिक संबंधांद्वारे.
2. एचआयव्ही संक्रमित रक्त व रक्तपदार्थ घेतल्याने.
3. निर्जंतुक न केलेल्या सुया / सिरिंजेस / लॅन्सेट्रस वापरल्याने.
4. एचआयव्ही संक्रमित मातेकडून तिच्या बाळाला.
एचआयव्ही कशामुळे पसरत नाही
1 हस्तांदोलन
2 आलिंगन दिल्याने,
3 एकत्र खाणे-पिणे केल्याने
4 डास चावल्याने
5 एका घरात राहिल्याने, या सर्व कारणाने एचआयव्ही पसरत नाही.
एसटीआयएसमुळे एचआयव्हीचा धोका वाढतो. लैंगिक पारेषित संक्रमणे आणि जननेंद्रिय संक्रमणे (आरटीआयएस) एचआयव्ही होण्याची शक्यता वाढवतात.
एचआयव्हीसाठी चाचणी सार्वजनिक आरोग्य केंद्रामध्ये करवून घेता येते. ही रक्ताची एक साधी चाचणी आहे आणि तिचा निकाल पूर्णपणे गोपनीय ठेवला जातो.
एचआयव्ही/एआयडीएस असलेल्या व्यक्तीसाठी एआरटी उपचार महत्त्वाचा आहे. कारणे
1 शरीरात एचआयव्ही विषाणू प्रसाराचा वेग कमी करतो.
2. एचआयव्ही विषाणू भार कमी करून संक्रमणांना रोगजंतू प्रतिबंध करतो.
3. संधिसाधू संक्रमणांच्या विकासाला प्रतिबंध.
4. एआरटी नियमितपणे होणे, आरोग्यदायी वातावरण कायम ठेवणे, सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे, पोषक आहार, व्यायाम, व्यसन न करणे हे सर्व
एड्ससह आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्याचे आवश्यक घटक आहेत.
5. एआरटी एकदा सुरू झाल्यावर व्यक्तीने औषधे नियमितपणे घेतली पाहिजेत. एआरटी डोस घेण्यात खंड पाडल्यास किंवा डोस घेणे चुकल्यास विषाणू औषधांची परिणामकता कमी होते.
कोणीही या रोगावर खोटी औषधे विकून रुग्णांच्या मनात खोटी आशा निर्माण करून hiv positive ¨fZ negative करतो, अशी जाहिरात करीत असेल तर हे खोटे आहे. पेशंटच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन पैसे कमविण्याचे कुकर्म करणे हाच या मागचा उद्देश असतो. रोगाच्या भीतीने एड्सचे रोगी
लवकर खचून जातात. जगातील प्रत्येक व्यक्ती ही कधीतरी मरणार हे निश्चित, परंतु त्यासाठी दररोज तीच काळजी लावून घेतली तर आयुष्य दु:खमय
होईल. त्यापेक्षा शांत डोक्याने उपचार समजावून घेतले तर आयुष्य दीर्घ व सुखाचे होईल. चांगल्या उत्कृष्ठ उपचारांमुळे रुग्णास निरोगी माणसासारखे आयुष्य उपभोगता येते. आयुष्यमानही वाढते. परंतु उपचार आयुष्यभर घ्यावा लागतो. थोडक्यात म्हणजे आजार पूर्ण जात नाही, परंतु ‘क्वालिटी ऑफ लाइफ’ निश्चित चांगली राहते.