आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Udaya Chaugule's Artical On Ayurved Treatment

धर्मार्थ काममोक्षांना आरोग्य मुलामत्तम्

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय परंपरेमध्ये फार पूर्वीपासून आपल्या शास्त्रकारांनी आरोग्याचे महत्त्व जाणले होते, त्यामुळे आयुष्याची उभारणी धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्विथ पुरुषार्थावरती करतानाच त्याचे मूळ किंवा त्याच्या प्राप्तीचे साधन म्हणून आरोग्य हे सांगितले आहे. प्राप्त इतिहासाचा मागोवा घेताना असे लक्षात येते की, आयुर्वेद ऋषी-मुनींनी अत्यंत प्रयत्नांनी उपलब्ध करून दिला. परंतु असंवेदनशील मनुष्याने आज त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
आयु म्हणजे जीवन व वेद म्हणजे शास्त्र किंवा ज्ञान. म्हणूनच जीवन जगण्याचे ज्ञान म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद हे फक्त चिकित्सा शास्त्र नसून जीवन पद्धती आहे. आपण जनमानसात असणारे आयुर्वेदविषयाचे ‘समज-गैरसमज’व त्यातून होणारे संभाव्य नुकसान याविषयी थोडक्यात मागोवा घेऊ . कारण अज्ञान हे सर्व समस्यांचे मूळ मानले जाते. त्यामुळे जनमानसात असणारे आयुर्वेदाविषयीचे गैरसमज थोडे-फार जरी दूर झाले तरी पुरे झाले.
जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आज समस्त जग आयुर्वेदाकडे संभाव्य असाध्य संधीसाठी (रोगासाठी) आशेने पाहात असताना, आपण भारतीय या नात्याने उपलब्ध शास्त्राची उपयोगीता समजून घेणे आवश्यक आहे. आयुर्वेद शास्त्रावरती घेतल्या जाणा-या अनेक आक्षेपांपैकी एक मुख्य आक्षेप असा घेतला जातो की, यामध्ये वापरले जाणारे धातू किंवा त्याची भस्मे ही आरोग्यास अत्यंत घातक मानली जातात. उदा. पारद, गंधक, सुवर्ण, परंतु या ठिकाणी शास्त्र आधाराद्वारे आपण समजून घेतले पाहिजे की, वैद्य शास्त्रातील कोणतेही निकष हे अनेक कसोटीवरती तपासून वापरले जातात. त्यामुळे आज शेकडो वर्षे आयुर्वेदिक औषधांमध्ये धातूंचा वापर होत असतानाही त्यांचे कोणतेही दुष्परिणाम निदर्शनास येत नाही.
कारण मूलत: अजैविक अशा धातूंचा विविध वनस्पती किंवा जैविक घटकांशी संयोग करून शरीरास उपयुक्त अशा विशिष्ट संस्कारायुक्त पद्धतीने ही औषधे बनवल्यामुळे अमृततुल्य ठरतात. राहता राहिला जनसामान्यांमध्ये आढळणारा जो काही भीतिदायक संशय आहे, त्यास गल्लाभरू व्यापारी वृत्ती कारणीभूत आहे. ज्याद्वारे अशास्त्रीय अशुद्ध औषधे रुग्णाच्या आरोग्यास हानिकारक ठरत असतील तर दोष शास्त्राचा नसून समाजव्यवस्थेचा आहे. त्याकरिता सजक रुग्णांनी तज्ज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली औषध उपचार घ्यावे, तसेच जाता-येता औषधी- दुकानदाराच्या अथवा जाहिराती वाचून, ऐकीव माहितीच्या आधारे औषध घेऊ नयेत. शासन व्यवस्थेनेही या संदर्भात वेळोवेळी नियंत्रण ठेवावे.
अनुभवातून असे लक्षात येती की
जनसामान्यांमध्ये आढळणारे गैरसमज म्हणजे
०आयुर्वेद चिकित्सेने उशिरा आराम मिळतो.
०आयुर्वेदिक एक्स्पायरी डेट नसते.
०आयुर्वेद म्हणजे झाड-पाला व तो घेण्यास अत्यंत बेचव अशा काढयांचा मारा वगैरे वगैरे.
परंतु या ठिकाणी आपण तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा केली असता आपणास असे लक्षात येईल की वरच्या कोणत्याही गोष्टींना शास्त्रीय आधार नाही, म्हणून या क्षेत्रातील तज्ज्ञ वैद्यानेही आपली जबाबदारी ओळखून शास्त्र परिपूर्ण असा आयुर्वेद जनसामान्यांपर्यंत कसा पाझरेल यासाठी प्रयत्न करावे. आपण अमृततुल्य अशा आयुर्वेदास गैरसमजुतीतून विषवत ठरवत असू तर आपल्यासारखे अभागी आपणच.