आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Abhav Joshi's Artical On Blood Circulation Of Kideny

किडनीला रक्तपुरवठा करणा-या वाहिनीमध्ये अवरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किडनीची रचना आणि कार्य हे अत्यंत गुंतागुंतीचे आहे. रक्तातील निरुपयोगी,हानिकारक पदार्थ लघवीतून शरीराबाहेर टाकणे हे काम किडनी करीत असते. याशिवाय रक्ताच्या पेशी तयार होण्यासाठी आवश्यक असणारा घटक Erythropoietin किडनीमध्येच तयार होतो. कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन डी यांची रक्तातील पातळी सुरळीत ठेवण्यात किडनीचा महत्त्वाचा वाटा आहे. दोन्ही किडन्यांचे काम 10 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास माणसाच्या जिवाला धोका निर्माण होतो. कायमस्वरूपी किडनी निकामी होण्याची कारणे काय आहेत, याबाबत विचार करणे गरजेचे आहे.
भारतात किडनी फेल्युअर असलेल्या पेशंटचे प्रमाण किती आहे?
भारताच्या किडनी रजिस्ट्री 2011 अनुसार भारतात 12431 पेशंट हे डायलिसिस करून घेत आहेत. आणि 63,538 लोकांना किडनीचा कायमस्वरूपी आजार आहे. 12341 पेशंटपैकी 11041 पेशंट हिमोडायलिसिस करत आहेत व 1390 पेशंट हे Peritoneal Dialysis करीत आहेत.
कायमस्वरूपी किडनीचे रोग होण्याची कारणे काय आहेत.?
मधुमेह (डायबिटीस) हे सगळ्यात महत्त्वाचे कारण. अमेरिकेत आणि युरोपमध्येदेखील हे सगळ्यात वर असलेले कारण.
कुठल्या डायबिटीस रुग्णास किडनीचा आजार होऊ शकतो.?
रक्तातील साखरेचे प्रमाण नेहमीच जास्त असणे, नियमितपणे साखरेची तपासणी (उपाशीपोटी आणि जेवणानंतरची) न करणे, वाढलेला रक्तदाब, वारंवार लघवीचे इन्फेक्शन होणे, लघवीच्या पिशवीवर डायबिटीसचा प्रभाव असणे, कुटुंबातील इतर व्यक्ती, आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ, बहिणींना डायबिटीस आणि त्याचबरोबर किडनीचा आजार असल्यास, डोळ्याचे पडद्यावर डायबिटीसमुळे इजा झालेली असल्यास (Retinopathy).
ग्लोमेरूलर डिसीजेस - या रोगांमध्ये ग्लोमेरुल्स हा किडनीचा भाग गुंतलेला असतो. (Chronic Glomerulonephritis) याची लक्षणे कुठली आहेत.
पायावर, चेह-यावर सूज येणे, लघवीमध्ये जास्त प्रमाणावर प्रोटीन व लाल पेशी असणे, रक्तदाब वाढलेला असणे, लघवी येण्याचे प्रमाण कमी होणे हे भारतात डायबिटीसनंतर दुसरे महत्वाचे कारण आहे.
लघवीच्या मार्गातील अडथळा - याचे कारण मूतखडे, मूत्रपिंडाचा टी.बी., लघवीच्या नळीच्या बाहेरून काही कारणास्तव दाब असणे. मूत्राशयाचा कॅन्सर, मज्जारज्जूचा विकार (Meningomyelocoele) व त्यामुळे मूत्राशयावर असलेला मज्जातंतूंचा अभाव, किडनीचा भाग खाली येऊन अडकणे व त्यामुळे होणारा लघवीला अडथळा अशा प्रकारचे विविध कारणे असू शकतात.
कुठल्या बाबी लघवीतील अडथळ्याचा किडनीवर होणारा वाईट परिणाम ठरवतात?
लघवीच्या रस्त्यात पूर्ण अडथळा आणि किती दिवसांपासून अडथळा आहे. अडथळा लघवीच्या रस्त्यात कुठल्या पातळीवर आहे, अशा गोष्टी किडनीवर होणारा वाईट परिणाम ठरवतात.
विषारी द्रव्यांमुळे होणारा किडनीवर परिणाम
कुठली द्रव्ये किडनीला हानिकारक आहेत?
वेदनाशामक औषधी (NSAIDS) औषधी ज्यामध्ये शिसे, पारा, अर्सेनिक, कॅडमियम इत्यादी रासायनिके हे जास्त प्रमाणात व काही दिवसांचे वर घेतल्यास किडनीला इजा करतात.
किडनीचे आनुवंशिक रोग
ADPKD या रोगात किडनी आणि लिव्हरमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या गाठी, पोकळ्या तयार होतात. हा रोग असलेल्या 40-50 टक्के रुग्णांचीच किडनी वयाच्या 60-70 वर्षांनंतर निकामी होते. फ्रेबी डिसीज, ऑक्झॅलोसिस, सिस्टिनोसिस, अल्पोर्ट सिंड्रोम यासारखे विविध आनुवंशिक रोगांमध्ये किडनी निकामी होऊ शकते.
कॅन्सर : कुठल्या कॅन्सरमध्ये किडनी निकामी होऊ शकते?
किडनीचा कॅन्सर एक किंवा दोन्ही किडनींमध्ये असू शकतो. रक्तातील काही पेशींचा कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर, मूत्रवाहिनीचा कॅन्सर या आणि इतर विविध कॅन्सरमध्ये किडनी निकामी होऊ शकते.
रिफ्लक्स डिसीज
जन्मानंतर पहिल्या व दुस-या दशकात किडनी निकामी होण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. गर्भावस्थेत मूत्राशयाचा विकास परिपूर्ण न होणे हे यामागचे कारण आहे. या आजारात मूत्राशयातून लघवी वरती किडनीकडे जाणे.
उलट्या येणा-या लघवीचा दाब आणि वारंवार होणा-या लघवीच्या मार्गातील जंतुसंसर्ग या कारणांमुळे किडनी निकामी होते.
मूत्राशयाच्या खाली लघवीच्या मार्गातील पडदा गरोदर असताना याचे निदान सोनोग्राफीद्वारे होऊ शकते. यामध्ये अर्भकाच्या मूत्राशयाच्या खाली पडदा असल्यामुळे लघवीला पूर्ण अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे किडनी वेगाने निकामी होते. तीन प्रकारचे अडथळे यामध्ये असतात. यात लघवीचा प्रवाह चालू करून अडथळा दूर करणे हे महत्त्वाचे असते.
अमिलॉयडोसिस या आजारामध्येAmyloidनावाचा घटक जास्त प्रमाणात यकृताकडून तयार होतो आणि तो किडनीमध्ये जमा झाल्याने किडनी निकामी होते. TB, bronchiectasis इत्यादी आजारांमध्ये होण्याची संभावना असते.
किडनीला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिनीमध्ये अवरोध (Renal Artery Stenosis) रक्तवाहिनीमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त अवरोध असल्यास रक्ताच्या ऑक्सिजनच्या अभावाने किडनी निकामी होते. फील्ल्र२ नावाचा पदार्थ अशा किडनीकडून तयार केला जातो. त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे दुस-या किडनीला व इतर अवयवांना इजा होते.
किडनीच्या आजारांची कारणे
० चेह-यावर, पायावर सूज येणे.
० लघवीमध्ये प्रोटीन, तांबड्या पेशी जाणे
० लाल रंगाची लघवी होणे.
० रात्रीच्यावेळी जास्त लघवी होणे.
० मूतखडे लघवीतून जाणे.
० मळमळ, उलट्या होणे.
० संपूर्ण अंगावरती खाज सुटणे
० रक्ताच्या अभावामुळे थकवा, दम लागणे.
० हाडांचे, स्रायूंचे दुखणे.
० रक्तदाब वाढल्याने डोकेदुखी, छातीत दाब, दम लागणे.