आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयविकार आहे वा नाही, हे नीट समजू शकते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृदय सर्व अवयवांना रक्त पुरवठा करते, पण त्याला स्वत:ला सुद्धा ऑक्सिजन अत्यावश्यक असतो. हृदय स्वत:ला कॉरोनरी रक्तवाहिन्याद्वारे रक्तपुरवठा करते. (ऑक्सिजन) या रक्तवाहिन्या नाजूक असतात. पटकन ब्लॉक होतात, जर हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा खंडित झाला तर ते स्नायू मृत होतात, जर पूर्ण खंडित न होता कमी झाला तर ऑक्सिजनअभावी हृदयाला त्रास व्हायला लागतो व छातीत दुखायला लागते. हार्ट अटॅक आला तर 95 टक्क्यांहून अधिक वेळेस ईसीजीमध्ये बदल दिसतात.
हार्ट स्पेशालिस्ट ते ओळखू शकतात. कधी कधी छातीत दुखत नाही, पण ईसीजीमध्ये विशेष बदल दिसतातच असे नाही, अशावेळी त्या व्यक्तीला हार्ट विकार आहे अथवा नाही या साठी जी चाचणी केल्या जाते, त्याला स्ट्रेस टेस्ट म्हणतात. याचा हेतू असा की ज्या वेळी रुग्ण आराम करीत असेल किंवा एका जागेवर बसलेला अथवा उभा असतो. त्या वेळी हृदयाला जो रक्तपुरवठा होत असतो. तो पुरेसाही असू शकतो, पण ज्या वेळी तो हालचाल करतो, श्रम करतो तेव्हा हृदयाची रक्तपुरवठा गरज 3 ते 4 पट वाढू शकते. ती गरज पुरी होत नसल्यास रुग्ण अस्वस्थ होतो. छातीत दुखायला लागते, हृदय स्पंदन अनियमित होऊ शकतात व तो परिणाम ईसीजीमध्ये दिसू लागतो.
ताण-तणाव हा मानसिकही असू शकतो
स्ट्रेस टेस्ट करताना रुग्णाला शारीरिक तणाव घ्यावा लागतो, ठरावीक वेळ व्यायामही करावा लागतो. ईसीजीत तुलनात्मक बदल घडण्यासाठी स्ट्रेस टेस्ट मशीनचा उपयोगही होतो. यात प्रामुख्याने दोन भाग असतात. संगणक जास्त हालचाली या वेळा, रुग्णाच्या चालण्याचा वेग, याची संगणकात नोंद होते.
दुसरा प्रकार - ट्रेडमिल मशीन
जिममध्ये ज्यावर आपण चालतो किंवा पळतो, त्या पट्टा फिरणा-या मशीनसारखी. ट्रेडमिल ट्रेस टेस्टसाठी वापरण्यात येते. त्यावर रुग्ण चालतो. त्याच्या छातीवर ईसीजीच्या वायर लावलेल्या असतात. ज्या संगणकाला जोडलेल्या असतात. संगणकात ईसीजी रेकॉर्ड होत असतो. हळूहळू मशीनचा वेग वाढवण्यात येतो. साधारण 10 मिनिट रुग्ण चालतो. त्याआधी जर छातीत दुखले, संगणकात रेकॉर्ड होणा-या ईसीजीमध्ये काही दोष निर्माण झाला तर चाचणी थांबवण्यात येते. थोडक्यात आरामाच्या व ठरावीक व्यायामात ईसीजीत काय काय फरक पडतात यावर त्या व्यक्तीला हृदय विकार आहे वा नाही, हे नीट समजू शकते.
स्ट्रेस टेस्टचा उपयोग
छातीत दुखत असल्यास ईसीजी नॉर्मल किंवा त्यात विशेष दोष नसल्यास तरी छातीत खूपच वेदना होत असल्यास हृदय विकाराची शक्यता असेल तर रुग्णास विश्रांती द्यायची असते. त्याला आय.सी.यूत ठेवून काही दिवस लक्ष देऊन हार्ट अटॅक नाही, याची खात्री झाल्यानंतरही स्ट्रेस टेस्ट करता येते. अ‍ॅँजिओग्राफी करावी वा नाही, अशा वेळी स्ट्रेस टेस्ट करता येते, ती नॉर्मल असल्यास अ‍ॅँजिओग्राफी टाळता येते. हार्ट अटॅक आल्यानंतरही स्ट्रेस टेस्ट करूनच खात्री करावी व पेशंटला घरी पाठवावे. 4 ते 5 आठवड्यानंतर टु-डी इको, स्ट्रेस टेस्ट करणे जास्त योग्य. थोडक्यात तुमच्या हृदयात किती तीव्र स्वरूपाचा व्यायाम सहन करण्याची ताकद आहे, हे स्ट्रेस टेस्टमुळे चांगल्या प्रकारे समजते.