आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालहट्टावर प्रभावी होमिओपॅथी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या बालहट्ट ही दिवसेंदिवस रौद्र स्वरूप धारण करणारी एक ज्वलंत समस्या आहे. मुलांच्या सभोवतालची आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीतील बदलामुळे मुलांच्या हट्टी स्वभावाबद्दल काय करावे, याबाबत पालकांच्या मनातील गोंधळ अधिकच वाढतोय. त्यामुळे या समस्येमागची कारणे जाणून घेऊया.
समस्येमागची कारणे
1 सध्याच्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीपेक्षा लहान लहान कुटुंब होत आहेत. त्यात दोघेही पालक कमावते व व्यग्र असतात. त्यामुळे पाळणाघर किंवा जवळच्या नातेवाइकांकडे अथवा मुल एकटे राहत असल्यामुळे आपण मुलांसाठी वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मुलांवर मागेन ती खेळणी, गिफ्ट, खाऊ यांचा वर्षाव होतो.
2 आपले बालपण कष्टात गेले. मग आपल्या मुलांना तरी सर्व मिळायला पाहिजे. या भावनेतूनही बरेच पालक मुलांचे लाड करतात.
3 घरातील पहिले मूल लाडके. त्यातही मुलगा असेल तर लाड करणारे अनेक असतात. त्यामुळे मुलाला अजिबात रडवायचे नाही, म्हणून त्याच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट दिली जाते.
4 लहान-मोठ्या कुटुंबातील स्थानावर आर्थिक परिस्थितीमुळे, आपल्याकडे पैसे आहेत ना, मग नाही म्हणायचे नाही. त्यामुळे मुलांनी ब-याचदा न मागितलेल्या, त्यांना गरज नसलेल्याही गोष्टीही मिळत असतात. नवनवीन प्रकारची अत्याधुनिक खेळणी किंवा नव्या प्रकारातील कपडे सर्वात आधी आपल्याच मुलाकडे असावे, असा पालकांचाही अट्टहास असतो. म्हणूनच आजकाल ब-याच मुलांकडे स्टेशनरी वस्तू म्हणजे पेन्सिन, पेन, डबे, वॉटर बॅग, खोडरबर बहुसंख्य असतात.
5 लहान मुले टीव्हीवर दाखवल्या जाणा-या कार्टूनमुळे सर्वाधिक प्रभावित होतात. मुले जे कार्टून पाहतात. त्याप्रमाणेच त्यांच्या मानसिक विकासावरसुद्धा परिणाम होतो. वरील सर्व गोष्टींमुळे नेहमीच ‘पाहिजे ते मिळणारच’ म्हणून मुलांना ‘नकार’ पचवायला सहन होत नाही. किंबहुना एखाद्या गोष्टीसाठी वाट पाहणे किंवा ती गोष्ट कष्ट करून सहज मिळवणे याकरिता लागणारी संयमता व स्थिरता मुलांकडे कमी होत आहे.
मार्गदर्शन व उपचार
अशा मुलांमध्ये असंयम व अस्थिरता निर्माण होऊन अभ्यासावरही विपरीत परिणाम होतो. त्याचबरोबर मुले एखादी वस्तू न मिळाल्यास आक्रमक होतात. महागड्या वस्तूंची तोडफोड करणे, उलट उत्तर देणे, अभ्यासाकडे दुर्लक्ष व सर्वात शेवटी अधोगतीचे भवितव्य समोर येते. मुलांच्या अशा हट्टाला पालक नाही म्हणण्याचा प्रयत्न करतात; पण अशा वेळी मुले रौद्र रूप धारण करून रडून तगादा लावून पालकांचा जीव नकोसा करून सोडतात. एकदा का मुलांना ही युक्ती कळली की, मुले मुद्दामहून घरी पाहुण्यांच्या समोर लग्नात, समारंभात हट्ट करतात आणि चार-चौघांत कुणी नाव ठेवू नये म्हणून पालकही गुपचूप मुलांना हवे ते घेऊन देतात; पण हेच लहानपणीचे हट्ट मोठ्यापणी राक्षसीरूप धारण करतात. त्या वेळी पालकांना आपली चूक समजते; पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच मुलांना लहानपणापासूनच ‘नकार’ पचवायला शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांना सर्वप्रथम मुलाच्या बाळहट्टाला समजावून घ्यावे, कारण त्यांच्या भावना खूप नाजूक असतात. मुलांच्या या समस्येवर वेळीच मार्गदर्शन व उपचार न केल्यास ही समस्या मानसिक आजारांचे रूप धारण करू शकते.
अशा बालहट्टावर होमिओपॅथीमध्ये काही अत्यंत प्रभावी व गुणकारी औषधी आहेत. बेलाडोना, चामोमिला, कॅप्सिकम, मॉटकस टॅरेंट्युला, ट्युबरक्युलिनय फॉस्फरस व इतर औषधी ज्या होमिओपॅथी डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय घेऊ नये. आपल्या पाल्याला होमिओपॅथीच्या औषधांद्वारे एका फुलपाखरासारखे बालपण अनुभवण्याची संधी देऊन तर बघा. कारण बालपण निरागस असते.