आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतामध्ये साधारणपणे दहा टक्के स्त्रियांना स्तनांचा कर्करोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले घर, मूल समाधानी, आनंदी असावे, असे प्रत्येक स्त्रीला वाटते, पण हे स्वप्न साकारताना आजच्या स्त्रीला नाना कसरती कराव्या लागतात. नोकरी व घर यामध्ये तिचं भावविश्व दबून जातं. तिची घालमेल होते. भावनिक सुरक्षितता तिला अंतर्मुख करते. याचा परिणाम तिच्या आरोग्यावर निश्चितच होत जातो. एकदा बँकेत काम करणारी स्त्री अंगावर पांढरे जाण्याची तक्रार घेऊन आली.
० थकवा, कंबरदुखी, अनुत्साह, डोकेदुखी, मासिक पाळीत पोटदुखीचा त्रास, अनियमित मासिक पाळी, मलावरोध : (Constipation) स्राव झोंबणारा असल्याने असह्य आग, भूक न लागणे व मळमळ होणे ही तिची लक्षणे होती. या सर्व त्रासामुळे बँकेमध्ये, घरी सतत चिडचिड होत होती. याचा परिणाम कामावर आणि मनावर व्हायचा. टेन्शन, असह्य डोकेदुखी हा तिचा नेहमीचा प्रॉब्लेम होता. मी त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला; पण त्यांना मान्य नव्हता. मग होमिओपॅथिक औषधोपचार सुरू झाले. त्रास कमी होत गेला; परंतु पाहिजे तितकी सुधारणा जाणवली नाही. कारण हे होते की, त्या स्त्रीने वेळेवर औषध घेतलेच नाही. शिवाय धावपळही झाली. खाण्यातही खूप हेळसांड होती, हे चित्र आहे.
० अमेरिकेत आठ स्त्रियांपैकी एकीस स्तनांचा कर्करोग : आजच्या ‘करिअर वुमेनचं’ घराची जबाबदारी, मुलं-पती यांची आवराआवर, पाहुणे आणि स्वत:चे करिअर या सगळ्या रामरगाड्यात स्वत:कडेच, आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अशाच प्रकारचे दुर्लक्ष स्त्रीच्या आरोग्यावर किती हानिकारक परिणाम करते आहे. याचे अजून एक उदाहरण म्हणजे स्त्रियांना होणारा स्तनांचा कर्करोग. याबद्दल थोडक्यात अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेऊ. भारतामध्ये आयुष्यभरात सर्वसाधारणपत्रे 30 स्त्रियांपैकी 3 स्त्रिया याप्रमाणे स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण आहे. अमेरिकेमध्ये दर आठ स्त्रियांमध्ये एक, असे आहे. पाश्चिमात्त्यांचे अनुकरण हे राहणीमान, सुखसोयींबरोबरच तेथील रोगांनासुद्धा आमंत्रण देते आहे. स्तनांचा कर्करोग हा स्तनांच्या अनेक विकारांपैकी एक आहे. स्तनांच्या विकारांबाबत सर्वसाधारण स्त्रीला, किंवा तरुण वयात आलेल्या मुलीला खालीलपैकी एक वा अनेक प्रश्न पडतात.
1. माझ्या स्तनात गाठ आहे. ही गाठ कर्करोगाची असेल कां?
2. माझ्या स्तनातील गाठ काढली. ती कर्करोगाची नव्हती; परंतु पुढे मला कर्करोग होऊ शकतो का?
3. मला स्तनांचा कर्करोग आहे. माझ्या मुलीलाही तो होईल का?
4. स्तनातील गाठीचे कर्करोगाचे निदान झाले आहे, माझ्या कर्करोगाची पातळी कोणती? व कशाप्रकारचे उपचार करण्यात येतील?
5. माझ्या मैत्रिणीला स्तनांच्या कर्करोगाचे निदान झाले आहे, मला स्तनांतील कर्करोगाच्या गाठीचे निदान करण्याची गरज आहे का?
6. स्तनांच्या कर्करोगाची कारणे व लक्षणे कोणती?
ऋतू समाप्तीपूर्वी (मेनोपॉजपूर्वी) साधारणत: 70-80 टक्के स्तनांचे विकार कर्करोगाव्यतिरिक्त असतात. स्तनांमध्ये गाठ असणे म्हणजे कर्करोग असणे असे नाही, परंतु या गाठीचे योग्य निदान होणे व गरज असल्यास उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
० फ्रायब्रोसिस्टिक ब्रेस्ट डिसीज : अनेक स्त्रियांना स्तनांमध्ये अनेक छोट्या गाठी निर्माण होतात. या गाठींचा आकार व वेदना मासिक पाळीच्या वेळी वाढतात आणि पाळी संपल्यावर कमी होतात. यालाच ‘फ्रायब्रोसिस्टिक ब्रेस्ट डिसीज’ असे म्हणतात. या विकारासाठी होमिओपॅथिक उपचार विशेष लाभदायक ठरतात व हा त्रास कायमचा बरा होऊ शकतो. या विकाराकरिता शस्त्रक्रियेची गरज कदापिही भासत नाही. या उपचाराद्वारे मासिक पाळीदेखील नियमित होऊ लागते.
० स्तनांच्या कर्करोगाची प्रमुख कारणे
1. पहिले मुल उशिरा होणे. (वयाच्या 28 वर्षांनंतर)
2. एकही मूल न होणे.
3. मुलांना स्तनपान न करू देणे.
4. ऋतू समाप्तीनंतरची स्थूलता.
० स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे
1. स्तनांच्या कर्करोगाचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे वेदनाविरहित गाठ.
2. स्तनाग्र आत ओढले जाणे.
3. स्तनावरील त्वचेवर खळी पडणे.
4. रोगाचे प्रमाण वाढल्यास काखेत किंवा मानेत गाठी येणे आणि स्तनांवरील त्वचा संत्र्यासारखी जाड होणे किंवा स्तनांवरील गाठ फुटणे.
5. स्तनांबाहेर कर्करोगाचा फैलाव फुप्फुस, हाडे, यकृत किंवा मेंदूत झाल्यास निदान शक्य नसते आणि तेव्हा या परिस्थितीत चौथ्या अवस्थेत आहे, असे मानले जाते. त्यामुळे रुग्णांनी प्रथम स्तनांतील गाठीकडे दुर्लक्ष करू नये. योग्य ती काळजी घेऊन तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.
० स्तनांचा कर्करोग व आनुवंशिकता
जर कुटुंबातील आई, मावशी, आजी (आईची आई) अथवा बहिणीला वयाच्या 45-50 वर्षांच्या आधी स्तनांचा कर्करोग झाला असेल, तर अशा स्त्रीला किंवा तरुण मुलीला या रोगाचा धोका अधिक संभवतो; परंतु आजचे प्रमाण अधिक झपाट्याने वाढत आहे. सरासरी 30 स्त्रियांमध्ये 3 स्त्रियांना कर्करोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. यामुळे कर्करोगाने स्त्रियांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. यासाठी स्त्रियांनी, तरुण वयामध्ये आलेल्या तरुणींनी जागरूक होऊन यावर निर्बंध लावण्याची काळाची गरज आहे.
स्तन कर्करोगाचे निदान व होमिओपॅथिक उपचार
स्तन कर्करोगाचे निदान करण्यासाठी अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी, मेमोग्राफी आणि सूक्ष्मसुई परीक्षण या तीन पद्धती आहेत. स्तनांचा कर्करोग म्हटले किंवा निदान झाले तर सर्वप्रथम रुग्णांची, नातेवाइकांची मन:स्थिती ढासळून जाते आणि त्यामध्येही होमिओपॅथिक उपचार...? परंतु होमिओपॅथीमध्येसुद्धा यासाठी प्रभावी औषधोपचार आहेत. होमिओपॅथिक उपचाराने स्तनांचा कर्करोग झालेला रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. फक्त गरज आहे ती होमिओपॅथिक उपचारांवर विश्वास ठेवण्याची. होमिओपॅथिक उपचार हा रुग्णांचा शारीरिक, मानसिक, चेतनिक अभ्यास करून ठरवण्यात येतो. रुग्णांच्या सर्व अभ्यासावरून औषधाचे प्रमाण व मात्रा ठरवण्यात येते. होमिओपॅथी ही एक शास्त्रशुद्ध चिकित्सा पद्धत आहे. होमिओपॅथिक उपचाराने केवळ रोगच दूर होत नाही, तर मानवाच्या संपूर्ण शारीरिक विकृतीची चिकित्सा होते.