आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Shraddha Chandak Article About Anemia Disease, Divya Marathi

लोहतत्त्व कमतरतेमुळे होणारा पंडुरोग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंडुरोग (अनेमिया) म्हणजे काय?
वैद्यकीय क्षेत्रात अनेमियाच्या अनेक व्याख्या आहेत. परंतु सोप्या भाषेत सांगायचे तर अनेमिया म्हणजे रक्तातील लोहतत्त्वाचे (हिमोग्लोबीन) प्रमाण कमी होणे. जगातील 30 टक्के लोकांमध्ये अनेमिया आढळून येतो, म्हणजेच जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 1500 दशलक्ष लोक अनेमिक आहेत. याचे प्रमाण स्त्रियांमध्ये व लहान मुलांमध्ये अधिक आहे.

अनेमियाचे प्रकार / कारणे
1. पौष्टिक तत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारा अनेमिया (nutritional anemia) (अ) लोहतत्त्व कमतरतेमुळे होणारा अनेमिया (iron deficiency anemia) (ब) जीवनसत्त्व ब व फोलिक अ‍ॅसिड कमतरतेमुळे होणारा अनेमिया (megaloblastic anemia)
2. हाडामधील मूळ रक्तपेशींच्या अभावामुळे होणारा अनेमिया (aplastic anemia)
3. रक्तपेशींच्या विघटनामुळे होणारा अनेमिया (hemolytic anemia)
4. जुनाट आजारांमुळे होणारा अनेमिया (sewndary to chronic illness)
या सर्व प्रकारांमध्ये लोहतत्त्वाची कमतरता (iron deticiency) हे सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारा प्रकार आहे. निरीक्षणाअंती (national family health survey-nfhs) असे दिसून आले आहे की 6-35 महिने वयोगटात 74 टक्के बालकांमध्ये तर 10-19 वर्ष वयोगटातील 50 टक्के मुला-मुलींमध्ये लोहतत्त्वाची कमतरता आढळून येते.

लोहतत्त्व कमतरतेची कारणे
(1) आहारामध्ये लोहयुक्त खाद्यपदार्थाची कमतरता
समाजातील सधन वर्गामध्ये बदलती जीवनशैली वाढते. junk food प्रमाण, पौष्टिक व सात्त्विक आहाराचा अभाव, जेवणाच्या अनियमित वेळा इत्यादी कारणांमुळे याचे प्रमाण अधिक दिसून येते. गरीब वर्गामध्ये पौष्टिक आहाराचा अभाव, निरक्षरता इत्यादी कारणे आहेत. 2. चहा, कॉफी, शीतपेयांसारख्या उत्तेजक पेयांचे अधिक सेवन केल्यामुळे शरीरात लोह शोषण (iron absorption) कमी होते. (3) पोटामध्ये होणारे जंत (hookworn intestation giardiasis) (4) शरीरात कळत नकळत होणारा रक्तस्राव उदा. मूळव्याध, जठरामध्ये व्रण, स्त्रियांमध्ये मासिकपाळीत होणारा अतिरिक्त रक्तस्राव इत्यादी. (5) यकृत/मूत्रपिंड या अवयवांच्या दीर्घ आजाराने पीडित व्यक्तींमध्ये दिसणारा अनेमिया. (sewndary to chronic illness)

अनेमियाची लक्षणे
भूक न लागणे, चिडचिडेपणा, शरीर फिके पडणे, लवकर येणारा थकवा, छातीत धडधड होणे, दम लागणे, हातापायांच्या नखांमध्ये होणारा विशिष्ट प्रकारचा बदल (koilonychia, p platynychia) plca - म्हणजेच अयोग्य प्रकारे खाणे, उदा. माती, चिखल, बर्फ, खडू, पेन्सिल, वॉलपेन्ट इत्यादी. 70-80 टक्के लोकांमध्ये हे लक्षण दिसून येते. मुख्यत्वे लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसते. शाळेत जाणार्‍या मुलांमध्ये डोके दुखणे, अभ्यासात लक्ष न लागणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, वारंवार आजारी पडणे, शारीरिक व बौद्धिक वाढ नीट न होणे.

अनेमियाचे निदान
अनेमियाचे निदान हे clinical असून त्याकरिता काही रक्त तपासण्या आवश्यक (1) सी. बी. सी. (complete blood count) यामध्ये रक्तातील लोहतत्त्वाचे प्रमाण ((hb)), लालरक्तपेशींची संख्या (rbc) आणि हिमॅटोक्रिट हे कमी झालेले आढळते. सर्वसाधारणत : पौढ पुरुषांमध्ये लोहतत्त्वाचे प्रमाण 1 13-17 gmlde तर स्त्रियांमध्ये 12 -15 gmlde असणे जरुरी असते. गर्भवती स्त्रियांमध्ये हे प्रमाण 11-14 gmlde, शाळकरी मुलांमध्ये 6-12 वर्षे हे प्रमाण 11.5-15.5 gmlde,6 महिने- 6 वर्षे या वयोगटामध्ये 11-14 gmlde इतके प्रमाण असणे गरजेचे असते. जर हे प्रमाण यापेक्षा कमी असेल तर त्या व्यक्तीस अनेमिया असतो. (2) serum iron, serum ferritin हया घटकांचे रक्तातील प्रमाण कमी होते. total jron binding capacity (tlbc) वाढलेली असते. (3) काही रुग्णांमध्ये हाडांतील मूळ रक्तपेशींची तपासणी (bone marrow)आवश्यक असते.

उपचार
गैरसमजाप्रमाणे फक्त ‘आयर्न टॉनिक’ सेवन हा रामबाण उपाय नसून वेळीच योग्य उपचार गरजेचे आहे.

आहार
(1) सात्त्विक, पौष्टिक,लोह व जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा नियमित आहारात समावेश असावा. उदा. हिरव्या पालेभाज्या, अंडी, मांस, गूळ, शेंगदाणा, खजूर इत्यादीचा आहारात समावेश. शक्य असल्यास जेवण लोखंडाच्या कढईत बनवणे.गर्भवती स्त्रिया व लहान मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष पुरवणे, आहाराच्या सुनियोजित वेळा पाळणे आदी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. (2) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे लोह आणि जीवनसत्त्व (iron and multivitamine) औषधीचे योग्य प्रमाणात सेवन करणे. (3) घरातील प्रत्येक व्यक्तीने वर्षातून दोन वेळा म्हणजेच प्रत्येकी 6 महिन्यांनी जंताचे औषध घेणे.

(rejular deworrnig) (4) अनेमियाला कारणीभूत असलेल्या व्याधींवर वेळीच उपचार करणे. (5) गर्भवती व स्तनपान करणार्‍या स्त्रियांनी नियमित लोहाच्या व फोलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या घेणे. (6) पहिले सहा महिने बाळाला फक्त आईचेच दूध पाजणे. (exclusive breast feeding) (7) लहान मुलांना गरजेप्रमाणे लोह व जीवनसत्त्वाचे औषध देणे.

उपचार करूनही न बरा होणार्‍या अनेमियाची कारणे
(1) वेळेवर व नियमितपणे औषध न घेणे.
(2) औषधाचा अपुरा डोस. (3) रक्तस्राव (4) जीवनसत्त्व ब व फोलिक अ‍ॅसिडची कमतरता. (5) जठर व आतड्यांचा जुनाट आजार (malabsorption) (6) जंताचा प्रादुर्भाव. (7) कर्करोग (8) चुकीचे निदान उदा. thalassemia minor.

लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे मुद्दे
(1) लोहतत्त्व कमतरतेमुळे होणारा पंडुरोग मोठ्या प्रमाणात आढळणारा आजार असून योग्य निदान व उपचाराने पूर्णपणे बरा केला जाऊ शकतो. (2) लोहतत्त्व कमतरतेमुळे लहान मुलांची शारीरिक व मानसिक वाढ खुंटते. (3) अपुरा लोहयुक्त आहार हे याचे महत्त्वाचे कारण होय. (4) नियमित लोह व जीवनसत्त्वाचे योग्य सेवन याने याचा उपचार केला जाऊ शकतो.
(drshraddhachandak@gmail.com)