आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्वचेचा चिवट रोग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘स्कीन इज ए मिरर ऑफ हेल्थ’ अर्थात त्वचा ही निरोगीपणाचा आरसा आहे. शरीरातील प्रत्येक संस्थेचे त्वचेशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नाते जोडले गेलेले आहे. शरीरातील कुठल्याही संस्थेवर होणारा परिणाम त्वचेमध्ये बदल घडवून आणणारा असतो. त्यामुळे त्वचा जर निरोगी, नितळ असेल तर शरीर पण निरोगी आहे, असे समजण्यास हरकत नाही. भारतीय सौंदर्याची प्रशंसा आता तर, जागतिक पातळीवर होऊ लागलेली आहे. पण अशा या सुंदर, स्वच्छ त्वचेवर, एखादा डाग असला तर? चंद्राच्या सुंदरतेला ग्रहणच! असाच एक त्वचेचा व्याधी आहे सोरायसिस हा व्याधी रुग्णाचे आयुष्य जरी नष्ट करत नसला, तरी रुग्णाचा जीवनविषयीचा आनंद, उत्साह मात्र नष्ट करतो.

दोषात असलेल्या विषमावस्थेमुळे होतो सोरायसिस : सोरायसिस हा त्वचेचा अत्यंत भयानक रोग असून, चिकित्साशास्त्रात याला अत्यंत ‘जिद्दी’ रोग मानतात. कारण याचा परिणाम बर्‍याच वर्षांपर्यंत राहतो. आधुनिक शास्त्रज्ञांना अजूनपर्यंत याचे कारण कळले नाही. परंतु आयुर्वेदानुसार दोषात असलेल्या विषमावस्थेमुळे असे होते. सोरायसिस एक प्रकारचा जीर्ण होणारा त्वचारोग आहे. या रोगात त्वचेवर सूज येते आणि लालसर रंगाचे छोटे-मोठे स्केल्स (पापुद्रे) तयार होतात. या स्केल्स अभ्रकाच्या पत्यांसारख्या निघत राहतात. यात शरीरावर पिटिका उत्पन्न होतात. या पिटिका गोल, लांब रेषेसारख्या,

चपट्या अशा भिन्न-भिन्न आकाराच्या असतात. याच्यावरील पांढरे शल्क काढून टाकले तर रक्ताचे थेंब पिटिकेवर दिसून येतात. हेच या रोगाचे मुख्य लक्षण होय. या व्याधींमध्ये पारिवारिक इतिवृत्ती मिळते. गर्भावस्थेत मात्र, हा व्यवस्थित होऊन जातो. या रोगामुळे मनुष्याला मृत्यू तर येत नाही. पण जीवनाविषयी उत्साह, जगण्याची उमेद नष्ट होते. चिकित्साशास्त्रात या रोगावर कुठलेही स्थायी औषध नाही. परंतु, आयुर्वेद चिकित्सेने मात्र सोरायसिसने ग्रस्त असलेल्या रुग्णासाठी आशेचा एक किरण दाखवला आहे.

उत्तेजक साबणाच्या प्रयोगाने; स्वस्त रंगाचे कपडे परिधान केल्याने, विषाक्त रंगाचा त्वचेवर प्रयोग केल्याने, घाणेरडे वस्त्र घातल्याने, शिळे अन्न खाल्ल्याने, तेलकट, मसालेदार पदार्थांचे अतिप्रमाणात सेवनाचे कारण :

कारणे : - साधारणत: उत्तेजक साबणाच्या प्रयोगाने; स्वस्त रंगाचे कपडे परिधान केल्याने, विषाक्त रंगाचा त्वचेवर प्रयोग केल्याने, घाणेरडे वस्त्र घातल्याने, शिळे अन्न खाल्ल्याने, तेलकट, मसालेदार पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन, बद्धकोष्ठ व खूप बंदिस्त, दमट वातावरण राहिल्याने हा रोग होऊ शकतो. यात दूषित व विषाक्त तत्त्वापासून दूर राहायला हवे.

त्वचा रोगाचे आयुर्वेदात वर्णन : सोरायसिसला ‘किटिभ कुष्ठ’ असे म्हणतात. आयुर्वेदिकसंहितात 18 प्रकारचे कुष्ठांचे (त्वचा रोगाचे) वर्णन आहे. 7 महाकुष्ठ आणि 11 क्षुद्रकुष्ठ. किटिभ कुष्ठ किंवा सोरायसिसचे वर्णन क्षुद्रकुष्ठाच्या अंतर्गत येते. कुष्ठ विरुद्ध आहार-विहार, दूध-मासोळीचे एकाच वेळी सेवन इत्यादी.

आयुर्वेदशास्त्रात रोगोत्पतीचे मुख्य कारण शरीर दोषांचे असंतुलन मानले गेले आहे. तसे तर ही व्याधी शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकते. परंतु, मुख्यत: गुडघ्यांच्या समोरील भाग, छाती व डोके यावर ही व्याधी होते. हिवाळ्याचे दिवस सोरायसिसच्या वाढीला अनुकूल असतात.

रोग्यांचा आहार : हा रोग पित्त तथा वात दोष वाढल्याने उत्पन्न होतो. तेव्हा रोग्याचा आहार पूर्णत: क्षारप्रधान असणे आवश्यक आहे. लिंबू, संत्रा, मोसंबी, काकडी, गाजर, टोमॅटो इत्यादी फळे, पालक, मेथी, दूध, भोपळा, कोथिंबीर इ. हिरव्या भाज्या, अंकुरित धान्य, मूग ओलं खोबरं, मधू, पिठाची पोळी इत्यादी रोग्याला उचित प्रमाणात द्यावे. याशिवाय गहू, ज्वारीचा रस सकाळी घ्यावा. साधा व सुपाच्य आहार घ्यावा. वातुळ पदार्थ चणा डाळ, केळ, शेंगदाणे, चिंच, मसाले, आंबवलेले पदार्थ खाऊ नये.

विहार : उन्हात फिरताना योग्य ती काळजी घ्यावी. अति थंड व अति गरम वातावरणात राहू नये. मलमूत्र इत्यादी वेगांना अडवू नये. भोजनानंतर लगेच व्यायाम करणे, सतत उन्हात भटकणे, अतिसंताप, नवीन अन्न, दही, लवण, मासे यांचे अत्याधिक सेवन, गूळ शेंगदाणा, तीळ, उडीद यांचे अत्याधिक मात्रेत सेवन त्वचा रोगाला आमंत्रण देते. वरील सर्व गोष्टी त्वचा, लसिका, रक्त व मांस धातूमध्ये दोष निर्माण करतात व या कारणानुसार विविध प्रकारचे त्वचारोग निर्माण होतात.

सोरायसिसवर चिकित्सा : त्वचा रोगाने पीडित रुग्णांनी वर सांगितल्याप्रमाणे आहार विहाराचे बंधन पाळावे. चिकित्सा दोन प्रकारे करण्यात येते. - स्थानिक

- औषधी चिकित्सा. सोरायसिसच्या रुग्णांमध्ये वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण (जलौकावरण) केल्याने चांगला परिणाम दिसून येतो. औषध चिकित्सा सोरायसिस या व्याधीवर अनेक शोध सुरू आहेत. नवीन आलेल्या काही औषधांच्या वापराने उत्तम वा चांगला परिणाम दिसून आला आहे.

या औषधांचा वापर करा :
सोरायसिस पीडित व्यक्तीने सर्वांगास स्नानापूर्वी चांगली मालिश जरूर करावी. यामुळे त्वचा कोरडी होणार नाही यासाठी ब्रह्मकुमारी तेलाची मालिश करावी.

संयमपूर्वक औषधोपचार करावा. 3 ते 4 महिने तरी औषध घेणे गरजेचे असते. आजार पूर्ण बरा झाल्यानंतरदेखील आजार पुन्हा होऊ नये म्हणून 2-3 महिन्यांच्या अंतराने 1 आठवडा औषधाचे सेवन करावे.