आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लड प्लाझ्मा म्हणजे काय ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सर्वात दुर्मिळ वस्तू म्हणजे रक्त. रक्त फार काळ साठवूनही ठेवता येत नाही आणि त्याची कमतरता म्हणजे थेट प्राणाशीच गाठ. रक्ताला पर्याय शोधण्याचे प्रयत्न जगभर सर्वत्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, पण त्याला पूर्णपणे यश आलेले नाही. रक्तातील महत्त्वाचे घटक वेगळे काढून ते टिकवून त्याद्वारे रुग्णांना जीवनदान देण्याचे प्रयत्न मात्र चालू आहेत. त्यात यशही आलेले आहे. ब्लड प्लाझ्मा हा त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याद्वारे अनेकांना आपले प्राण परत मिळालेले आहेत आणि असे ब्लड प्लाझ्मा युनिट ठिकठिकाणी स्थापन केले जात आहेत.
ब्लड प्लाझ्मा म्हणजे काय ? -

ब्लड प्लाझ्मा म्हणजे रक्तातील असा द्रव पदार्थ ज्यात रक्तपेशी आणि माणसाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असे निरनिराळे घटक असतात. रक्तातील पिवळ्या रंगाचा हा घटक सर्वात महत्त्वाचा आणि रक्तातील सर्वात जास्त म्हणजे सुमारे 55 टक्के इतका असतो. माणसाच्या जिवंत राहण्यात आणि रुग्णाला वाचवण्यात याचा वाटा सिंहाचा असतो. बर्‍याच वेळ प्लाझ्मामध्ये अशुद्ध घटकही असतात. प्लाझ्मावर प्रक्रिया करून हे अशुद्ध घटक पूर्णपणे काढून टाकले जातात. त्यानंतर प्लाझ्मा साठवले जातात. प्लाझ्माचा उपयोग ग्लुकोज, अ‍ॅमिनो अ‍ॅसिड, हार्मोन्स, कार्बनडाय ऑक्साइड आणि ऑक्सिजन इत्यादी घटक साठवण्यासाठी आणि वाहून नेण्यासाठी होतो. रक्ताच्या एकेका युनिटमधून प्लाझ्मा वेगळे काढतात आणि शीत करून प्रक्रियेद्वारे ते गोठवले जातात.ज्या दिवशी हे प्लाझ्मा रक्तातून वेगळे काढले जातात. त्या दिवसापासून एक वर्षापर्यंत ते साठवले जातात. त्यातील घटक पुन: वेगळे काढून या प्लाझ्माचे आयुष्य वाढवता येते.

प्लाझ्माचा उपयोग-
दुसर्‍या महायुद्धाच्या काळात सर्वप्रथम (सुष्टक) प्लाझ्माचा उपयोग करण्यात आला. अमेरिका या युद्धात प्रत्यक्ष उतरण्याआधी द्रवरूप प्लाझ्मा व थेट रक्तच रुग्णांसाठी वापरण्यात येत असे. याच युद्धादरम्यान ब्लड फोर ब्रिटन या उपक्रमांतर्गत न्यूयार्कमध्ये एक महाकाय प्रकल्प उभारण्यात आला. शास्त्रज्ञांनी जिवापाड मेहनत घेऊन रक्तातून प्लाझ्मा वेगळे काढण्याचे तंत्र शोधून काढले. न्यूयार्कमध्ये मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा ब्रिटनमध्ये पाठवण्यात आले. यामुळे रक्त खराब होण्याची शक्यता तर टळलीच, पण इतक्या लांबच्या प्रवासात बाटल्या तुटण्या फुटण्याची शक्यताही संपुष्टात आली.

रुग्णाला वापरण्यासाठी केवळ तीन मिनिटांत तयार करण्यात येणारे व सुमारे चार तास फ्रेश राहणारे हे प्लाझ्मा हजारो सैनिकांसाठी जीवनदायी ठरेल.

कोरीयन युद्धातही हे वापरण्यात आले. प्रथम केवळ सैनिकांसाठी आणि युद्ध काळातच वापरले गेलेले हे प्लाझ्मा आता जागतिक निकड बनली आहे. प्लाझ्मा तयार करण्याच्या तंत्रज्ञानातही मोठी प्रगती झाली आहे. आज त्याचा खर्च अधिक असला तरी भविष्यात तो कमी होण्याची शक्यता आहे.