आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Niranjan Chavan About Joint Pain, Heath, Divya Marathi

आर्थ्रायटिस सांध्याची सूज; आर्थ्रायटिसचे निदान वेळीच हवे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्थ्रायटिस हा मुळात एक ग्रीक शब्द आहे. आर्थ्रोस म्हणजे सांधा आणि आयटीस म्हणजे सूज. थोडक्यात सांध्यांचा असा आजार ज्यात एक किंवा एकापेक्षा अधिक सांधे वेदनाग्रस्त होतात व त्यांना सूज येते.

आर्थ्रायटिसचे अनेक प्रकार
जसे ऑस्टिओ आर्थ्रायटिस (डीजेनेरेटिव्ह जॉइंट डिसीज), संधिवात, गाऊट, सोरायसीसमुळे होणार आर्थ्रायटिस वगैरे त्यात ऑरिस्टो-आर्थ्रायटिस हा प्रकार सर्वात जास्त. आर्थ्रायटिस हे जगभरात वृद्धापकाळातील अधुपणाचे व अपंगत्वाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. वारंवार दवाखाना दौरे, रोजच्या जीवनातील कार्यक्षमता कमी होणे, सतत वेदनाशामक औषधी घेणे, वगैरे हे आर्थ्रायटिसने त्रस्त रुग्णाची सामान्य वैशिष्ट्ये आहेत. शरीरश्रम कमी होणे, त्यामुळे वजन वाढणे, मधुमेह होणे, पुढे हृदयरोग होणे, परिणामी रुग्णांचे नैराश्यग्रस्त होणे ही आर्थ्रायटिसची अत्यंत वाईट परिणामे आहेत. म्हणूनच आर्थ्राटिसचे योग्य ते निदान व वेळीच उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत.

आर्थ्रायटिसचे निदान
डॉक्टरांकडून योग्य त्या वैद्यकीय चाचण्या करवून घेतल्यास आर्थ्रायटिसचे निदान करता येते. त्यासाठी काही रक्त - लघवीच्या तपासण्या आणि काही क्ष-किरणांच्या (एक्स-रे) तपासण्यांचा आधार घ्यावा लागतो. काही रुग्णांमध्ये संदेह असल्यास त्यांना संधिवाताचे निदान करण्यासाठी महत्त्वाच्या अशा आर. ए. फॅक्टर, ए.एस.ओ., अ‍ॅँटी सी.सी.पी. वगैरे चाचण्या कराव्या लागू शकतात.

वेदना हे अतिसामान्य लक्षण आहे
पण आर्थ्रायटिसच्या प्रकारांनुसार वेदनादेखील भिन्न प्रकारच्या असतात. संधिवातामध्ये सकाळच्या वेळी थंड - दमट वातावरणात जास्त वेदना होतात. लहान सांध्यांच्या वेदना जास्त होतात. दीर्घ काळासाठी वेदना होतात, वगैरे. ऑरिस्टो - आर्थ्रायटिसमध्ये कुठल्याही प्रकारच्या श्रमानंतर किंवा व्यायामानंतर सांधे जास्त दुखतात. ऑरीस्टो - आर्थ्रायटीस हा मुख्यत: उतरत्या वयाचा आजार आहे. तर संधिवात आणि गाऊटमुळे होणार्‍या आर्थ्रायटिसला वयाची मर्यादा नसते. तसेच जिथे इतर प्रकारच्या आर्थ्रायटिसमध्ये कधी कधी हलका ताप असतो तिथे जंतूसंसर्ग झाल्यामुळे होणार्‍या आर्थ्रायटिसमध्ये ताप जास्त प्रमाणात आणि जास्त कालावधीसाठी असतो. तरुणांमध्ये दिसणारा सिरो निगेटिव्ह स्पोंडायलो आर्थ्रापथी हा एक प्रकारचा महत्त्वाचा आर्थ्रायटिस आहे. (या प्रकारात सांध्यांसोबत पाठीच्या मणक्यांची सूज होऊन ते हळूहळू जुळून जातात. अशा प्रकारे आर्थ्रायटिसचे प्रकार भिन्न आहेत. पण सगळ्यांचे समान लक्षण मात्र वेदना हेच आहे. म्हणूनच आर्थ्रायटिसच्या प्रकारांचे योग्य ते निदान होणे महत्त्वाचे आहे. निदान झाल्यास योग्य ती उपचार पद्धती असणेदेखील रुग्णांना फायदेशीर ठरू शकते.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, उपचारपद्धतीत मानसिकता सकारात्मक असेल तर लवकर बरे व्हाल
(dr.niranjandc@gmail.com)