आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.bharati Patil About Childless Parent, Divya Marathi

मला बाळ हवंय! वंध्यत्वावर आयुर्वेदिक उपचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याला कोणीतरी आई म्हणून हाक मारावी आणि आपण कोणाला तरी बाळ म्हणून म्हणावं, ही प्रत्येक स्त्रीची अगदी उपजत आकांक्षा असते. हे स्वप्न जर साकार झालं नाही, घरात पाळणा हलला नाही किंवा लग्न होऊन बराच काळ झाला तरी मुलं होत नसतील तर वंध्यत्वाचा शिक्का बसतो.

मुल होण्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असते : मुल न होणं शारीरिक आजारापेक्षा एक मानसिक व सामाजिक आजार बनला आहे. माणूस कोणी सांगेल तेथे, सापडेल तिथे, दारोदार गावोगाव मुल होण्याच्या प्रयत्नात फिरत असतो.

100 जोडप्यांपैकी सुमारे 40 ते 45 जोडप्यात आढळतो पुरुषांमध्ये दोष : मूल न होणार्‍या 100 जोडप्यांपैकी सुमारे 40 ते 45 जोडप्यांमध्ये पुरुषांमध्ये दोष असतो. यापैकी फार थोडे पुरुष स्वत:हून डॉक्टरांकडे येतात. वंध्यत्वासाठी स्त्री आणि पुरुष यात जी कारणे आढळतात, ती विविध तपासणींद्वारे शोधून योग्य त्या वेळी योग्य चिकित्सा करणे गरजेचे असते. आयुर्वेदात वंध्यत्वावर अतिसूक्ष्म विचार केलेला आढळतो. विविध कारणानुरूप विशेष चिकित्सा उपलब्ध आहे.

या सर्व सबळ कारणांवर आयुर्वेदात विशेष चिकित्सा आहे. यात पंचकर्म (वंध्यत्वासाठी वापरण्यात आलेली विशेष औषधीयुक्त चिकित्सा) उत्तरबासी- स्त्री बीज योग्यवेळी तयार न होणे, न फुटणे, वारंवार गर्भपातामुळे गर्भाशय कमकुवत होणे, गर्भनलिका कोणत्याही कारणांनी बंद असणे आणि इतरही कारणांसाठी ही चिकित्सा अतिउपयोगी असते त्यामुळे इच्छित यश मिळालेले आपण बघतो. वरील पंचकर्म उत्तरबासी आणि इतर काही चिकित्सेसोबत पोटातून प्रभावी औषध घेण्यास आपणास निश्चितच फायदा होतो; पण त्यासाठी हवे असते अचूक निष्णांत डॉक्टरांचे मार्गदर्शन.

जसे वंध्यत्वातील बर्‍याच कारणांपैकी काही महत्त्वाची कारणे पुढीलप्रमाणे
> अनियमित मासिक पाळी
>मासिक पाळीत कमी प्रमाणात रक्तस्राव होणे.
>स्त्रियांमध्ये स्त्री बीज तयार न होणे.
>गर्भनलिका बंद असणे.
>गर्भनलिका कमजोर असणे.
>योनीमधील स्त्रावातील बदल.
>गर्भाशयातील स्त्रावातील बदल.
>गर्भाशयातील दोष.
>मानसिक कारण.
>पुरुष वंध्यत्वाची कारणे (शुक्रजंतू कमी असणे, शुक्रजंतू नसणे)
>कारण न कळलेले वंध्यत्व (निदान न झालेले)
(patilbhatati2601@gmail.com)