आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्र उत्कर्षाचा अणुस्पर्श!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 ऑगस्ट 1954 हा भारताच्या अणुऊर्जा विभागाचा स्थापना दिवस. भारताचे अणुजनक म्हणून ओळखले गेलेले डॉ. होमी भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या अणू संशोधनकार्याने पुढील सहा दशकांत जीवनाच्या अनेक क्षेत्रांत क्रांतिकारी बदल घडवून आणले. अणुस्फोट आणि अणुऊर्जा या जनसामान्यांना ठाऊक असलेल्या उद्दिष्टांपलीकडे जाऊन राष्ट्र उत्कर्षात वेळोवेळी मोलाचा वाटा उचलला. अणू विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त मुंबई येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या आजवरच्या सर्वस्पर्शी योगदानावर प्रकाशझोत टाकणारा हा विशेष लेख...

डॉ. हेन्री बकरेल नावाचे फ्रेंच वैज्ञानिक आपल्या प्रयोगशाळेत विविध धातूंपासून निर्माण होणार्‍या
क्ष- किरणांचा अभ्यास करत होते. युरेनियम हा जड धातू त्यांनी संशोधनासाठी निवडला होता. प्रयोग संपवून ते नित्यकर्मासाठी बाहेर पडले. दुसर्‍या दिवशी प्रयोगशाळेत येऊन पाहतात, तर काही फोटोग्राफिक प्लेट्स काळ्या पडलेल्या. झाल्या असतील खराब, या विचाराने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नंतरच्या दिवशीही नेमके असेच घडले. काचेच्या पात्रात ठेवलेल्या युरेनियम शेजारच्या प्लेट्स काहीही प्रक्रिया न करता काळ्या पडल्या होत्या...

बकरेल यांनी धातूच्या पात्रात युरेनियम ठेवून निरीक्षण केले. काहीही प्रक्रिया न करता आसपासच्या प्लेट्स काळ्या पडलेल्या आढळल्या. तेव्हा ‘युरेनियममधून निघणारे किरण काच, धातू अशा पदार्थांतून आरपार जातात’ या निष्कर्षाप्रत बकरेल आले. युरेनियमची निरनिराळी संयुगे, तसेच इतर काही धातू आणि त्यांची संयुगे यांवर प्रयोग करून किरणोत्सारी (Radioactive) पदार्थांवर त्यांनी 1896मध्ये शोधनिबंध प्रसिद्ध केले. हेच शास्त्र अ‍ॅटोमिक सायन्स म्हणजेच, परमाणू विज्ञान म्हणून ओळखले जाऊ लागले.

अणू तंत्राचा वापर सुरुवातीला विध्वंसक कामासाठीच झाला. तथापि समाज कल्याणकारी कामाप्रीत्यर्थ ही ऊर्जा लाभदायक ठरू शकते, हा विचार दृढ होत गेला आणि शांततामय कामांसाठी तिचा वापर करण्याच्या तंत्रांवर संशोधन चालू झालं. या ऊर्जेतून विद्युतनिर्मिती शक्य झाली. त्यासाठी अणुभट्ट्या उभारण्यात आल्या. 1942मध्ये फर्मी या वैज्ञानिकांनी अणुभट्टीचं तंत्र विकसित केलं आणि 1954मध्ये अमेरिकेत पहिली अणुभट्टी (Reactor) कार्यान्वित झाली. त्याच सुमारास भारतात अणू विभागाची स्थापना झाली. ‘अ‍ॅटोमिक एनर्जी फॉर पिसफुल युजेस’ हे ब्रीद मनी ठेवून डॉ. होमी भाभा संस्थेचे पहिले अध्यक्ष झाले. भारतात पहिली अणुभट्टी ‘अप्सरा’ 1956मध्ये उभारण्यात आली. परंतु, अणू म्हटला की अणुस्फोट किंवा अणुविद्युतनिर्मिती, या दोनच गोष्टी सामान्य जनांच्या डोळ्यांसमोर येतात. तथापि आरोग्य, औषधं, उद्योग, अभियांत्रिकी, कृषी, अन्नसुरक्षा असे अणूचे अनेक समाज कल्याणकारी उपयोग आहेत. त्यास्तव मुख्यत: एकस्थांचा (आयसोटोप्स) वापर केला जातो. मुंबईच्या भाभा परमाणू संशोधन केंद्राने (बीएआरसी) आजवर अशा अनेक जनोपयोगी आयसोटोप्सची निर्मिती केली आहे.

अभियांत्रिकी शाखा
सोडियम-24, ब्रोमियम-82 अशा आयसोटोप्सचा वापर करून पाइपमधील पाणी गळती तथा धरणातील गळती शोधून काढली जाते. हे आयसोटोप्स पाइपमधील द्रवात सोडले जातात. जिथे लिकेज असते तिथून किरणोत्सार बाहेर पडतात आणि गळतीचे नेमके स्थान समजते. भूगर्भातील पाण्याचे प्रवाह शोधण्यासाठीही अशाच तंत्राचा वापर केला जातो. याला ट्रेसिंग म्हणतात. वातावरणातील हवेच्या हालचाली जाणून घेण्यासाठी वातावरणातील रेडॉन हाच रेडिओट्रेसर म्हणून वापरला जातो. (अंटार्क्टिका मोहिमेत भारत ते अंटार्क्टिकादरम्यान वातावरणीय रेडॉन मापन करून आम्ही वातावरणाचा अभ्यास केला होता.) सागर बंदरात भरती-ओहोटी दरम्यान जमा होणारा गाळ तथा रेती ही वाहतुकीसाठी मोठीच समस्या असते. तिचे आकलन व्हावे म्हणून स्कँडियम-46 किरणोत्साराचा वापर केला जातो. यंत्रशास्त्रात पत्र्याची जाडी मोजणे, यंत्रभागांची झीज मोजणे, ओतकामाचे परीक्षण करणे यासाठी कोबाल्ट-60चे एकस्थ वापरले जातात.

पुढील स्लाइडमध्ये, आरोग्यशास्त्र