आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Amol Devare About Ebola Virus, Marathi Article

उत्तम प्रतिकारशक्तीने टाळा ‘इबोला’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या दहा वर्षांपासून वचिार करत असे आढळून आले आहे की, विशिष्ट कालखंडाने वारंवार नवनवीन विषाणूजन्य आजार उद‌्भवत आहेत. इबोला या विषाणूजन्य (viral) आजाराने सध्या धुमाकूळ घातला आहे. आफ्रिकन देशात आढळणाऱ्या ह्या आजाराने आतापर्यंत हजाराच्या वर लोकाचा बळी गेलेला आहे. डब्ल्यूएचअाे ने जागितक आणीबाणी घोिषत करून यावर प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न चालू आहे. या आजाराच्या प्रादुर्भावाने ग्रस्त रुग्णाचा शेवट मृत्यूतच होत आहे.

भारतात गेली दहा वर्षांचा वचिार केला असता बर्ड फ्लू, चिकुनगुनिया, अॅंथ्रेक्स, स्वाइन फ्लू, डेंग्यू असे व इतर संसर्गजन्य व विषाणूजन्य आजार वाढत आहे. काही आजारांवर उपचार काय करावे ? यावरही मतभनि्नता आढळून आली. विषाणूंवर निरनिराळ्या लसींचे संशोधन झाले आहे. मात्र परत तोच प्रश्न येतो. अाजारावर लसीकरण करावे ? अशा परििस्थतीत आयुर्वेदाचा काय वचिार आहे ? की आयुर्वेदात याचे वर्णनच नाही? जरीही वरील सर्व नावाने त्या आजारांचे वर्णन नसले तरीही त्या आजारांची लक्षणे व ती होऊ नयेत यासाठी आयुर्वेदात संदर्भ आढळतात. - prevention is bettor than cure हे वाक्य आपण ऐकलेले असेल पण या सर्व आजारांच्या अनुषंगाने prevention is the only care हेच महत्त्वाचे ठरते. आयुर्वेदात रोगप्रतिकारशक्ती उत्तम असणे याला महत्त्व टिले आहे. एकाच घरातील पाच सदस्यांना चिकुनगुनिया होऊनही सहाव्या व्यक्तीला होत नाही किंवा दौर्बल्य असलेल्यांना विषाणूजन्य आजार लवकर होतात.

सियाचिनमध्ये जवान उणे वीस अंश तापमानात आॅक्सिजन व पाण्याच्या कमतरतेत थंडीत टिकून राहतात. तर इथे नुसती ढगाळ हवा सुरू झाली की सर्दी होते ही काही प्रतिकारशक्तीशी निगडित उदाहरणे देता येतील. शरीरात रोग प्रतिकारशक्ती (defence mechanism) उत्तम असेल तर अशा विषाणूजन्य आजाराला तोंड देता येईल. आयुर्वेदात पंचकर्म व रसायन चििकत्सा या आजारांना टाळण्यासाठी महत्त्वाची चिकित्सा आढळते. पंचकर्माने वारंवार शरीरशुद्धी केल्यास शरीरातील दूषित व विषारी (toxic) घटक शरीराबाहेर टाकले जातात. त्यानंतर रसायन चिकित्सा घेतली असता सप्तधातूंचे वर्धन हाऊन रोगप्रतिकार शक्ती उत्तम आहे.

गरम, शिजवलेले अन्न खावे
>आहारात दूध, तूप, लोणी, खारीक, गोडंबी, बदाम, फुले इत्यादीचा वापर नित्य करावा.
>पिझ्झा, बर्गर, चायनीज, नुडल्स, जास्त मसाला, शिळे मास, शिळे अन्न, रात्री उशिरा आहार याने रोगप्रतिकार शक्ती मंदावते. ताजे, स्वच्छ, गरम, शिजवलेले अन्न खावे.
>रोज सकाळी १० सूर्य नमस्कार काढावेत.
> शेवटी या निमित्ताने एवढे सांगावेसे वाटते. पाऊस पडणे हे जरी आपल्या हातात नाही, मात्र आपण छत्री सोबत बाळगू शकतो.
> पृथ्वीचे दिवसेंदिवस प्रदूषित होणारे पर्यावरण व त्यामुळे उत्पन्न होणारे विषाणू हे जरी आपण रोखू शकतो आणि रोग प्रतिकारशक्ती उत्तम राखून आजार टाळू शकतो.

>रोगप्रतिकार शक्ती ही स्वच्छता, निरोगी टिनचर्या, सकस आहार, व्यायाम, नटि्रा, ब्रह्मचर्य, खंबीर व प्रसन्न मन:स्थिती, पौष्टिक औषधीवर अवलंबून असते. आयुर्वेदात आवळा, गुळवेल, ज्येष्ठमध, ब्राम्ही, ित्रफळा, गोक्षूर, हळद, बला, जीवनीयगठा. च्यवनप्राश, ब्राम्हरसायन, सुवर्ण इत्यादीचा वापर रसायन म्हणून केला जातो. १२ वर्षांपर्यंतच्या मुलात सुवर्णप्राशन संस्कारानंतर रोगप्रतिकार शक्ती वाढून होणारे आजार टाळता येतात.