आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोगांच्या विविध छटांची प्रतिमा दिसते प्रथम त्वचेवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व त्वचारोग हे मानवी शरीरातील अंतर्गत तणावाचे, कार्याचे व रोगाचे पर्यावर्तक असतात, म्हणूनच त्वचेला पारदर्शक आरसा म्हटले जाते. कारण रोगांच्या विविध छटांची प्रतिमा ही सर्वप्रथम त्वचेवर दिसून येत असते. त्वचा ही शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. त्वचा ही पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक असून, शरीराची संरक्षण भिंत अशीच त्वचेची ओळख म्हणता येईल.
वातावरणातील बदलणारे तापमान, आर्द्रता, जीवाणू, विषाणू, बुरशी व किरणोत्सर्गापासून शरीराचा बचाव करण्याचे मुख्य कार्य त्वचाच पार पाडत असते. त्वचेला निसर्गाने प्रत्येक मनुष्यास दिलेला नैसर्गिक पोशाख जरी म्हटले तरी प्रत्येकाच्या त्वचेत बराच फरक असतो. कुणाची त्वचा काळी, कुणाची गोरी, खरबरीत, गुळगुळीत किंवा तेलकट असते. देश, प्रांत, वातावरण यानुसार त्वचेचा रंग बदललेला दिसून येतो. एखाद्याची सुंदर त्वचा व कांती जशी इतरांना आकर्षित करते त्याप्रमाणे त्वचारोग झालेला मनुष्य मात्र एकटा पडतो. कारण त्वचारोगाविषयी समाजमनात आजही अनेक गैरसमज आहेत.
संपूर्ण शरीराचे फक्त एक बाह्य आवरण दिसत असलेली त्वचा ही प्रत्यक्षात 3 आवरणात विभागली आहे. - 1) बाह्य आवरण, 2) आंतरत्वचा, 3) चरबीचा थर
निरोगी त्वचा ही मृदू, पातळ व तेजस्वी दिसते. तिच्यावर आलेले लव व केससुद्धा पातळ आणि विरळ असतात. त्वचेवर अनेक सूक्ष्म जंतू वास करत असतात. मात्र, त्यामुळे नेहमीच त्वचेचे विकार उद्भवत नसतात. कारण साधारणत: त्वचेची नैसर्गिक प्रतिकारशक्ती काळानुरूप त्वचेचा बदलणारा स्तर त्वचेतून वेळोवेळी स्निग्धांश पाझरणे यासोबतच काही द्रव्य हे सूक्ष्म जीवाणूंपासून त्वचेचे रक्षण करत असतात. त्वचारोग म्हटले की, जीवनभरासाठी हा रोग जडला असा सर्वसाधारण समज आहे. अशा रुग्णांना बाह्य उपचार आणि प्रभावी औषधे काही काळासाठी आराम देत असली तरी कालांतराने त्वचेचा हा त्रास पुन्हा पुन्हा उद्भवत असतो.
त्वचेचा रोगी हा अनेक उपचार घेऊन कंटाळलेला असतो हा अतितीव्र औषधोपचारामुळे त्वचेच्या रोगासोबतच त्याला इतर त्रासदेखील सहन करावे लागत असतात.