आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकांडे शिलेदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी एक शिक्षक म्हणून, माझ्या कामाचा किंवा आवडीचा विषय म्हणून शिक्षणव्यवस्थेकडे बघते, शिक्षणपद्धतीचा विचार करते, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे कोणत्याही देशाची प्रगती त्या देशातील शिक्षणपद्धती किती गतिमान (Dynamic) आहे यावर अवलंबून असते. आणि या गतिमान शिक्षणाची उंची त्याच्याशी संबंधित असणाऱ्या शिक्षकांच्या विचारशक्तीवर व कृतिशक्तीवर अवलंबून असते. म्हणूनच इथे शिक्षकांचे बल वाढविण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणारे प्रभावी उपक्रम राबवले गेले पाहिजेत.

नुकतीच एक बातमी वाचनात आली, एका महाविद्यालयात मुलींच्या NCCची जबाबदारी स्वीकारण्यासाठी महिला प्राध्यापक नाहीत; म्हणून तेथे मुलींना NCC विषय देण्यासाठी महाविद्यालयाने नकार दिला. बातमीचा विषय संवेदनशील होता. एकीकडे आम्ही मुलींना शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सल्ले देतो आणि त्यांना त्या दृष्टीने सक्षम करणारा अभ्यासक्रम शिकवू शकत नाही. हा विरोधाभास का?

अनेक विद्यािर्थभिमुख उपक्रम, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त घेतले जाणारे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांनाच नाही तर त्या उपक्रमांमधील शिक्षकांनाही खूप आनंद देणारे असतात. आत्मवशि्वास वाढवणारे असतात. पण ितथेच समस्या सुरू होते. या उपक्रमांमधून आलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा आत्मवशि्वास त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या इतरांना, त्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या इतर शिक्षकांनाही नकाेसा वाटतो. नाटकात काम करणारी मुलं फारच आगाऊ असतात, इतर मुलांनाही ती बिघडवतात असे अनेक प्रवाद उपक्रम न आवडणाऱ्या व फक्त अभ्यासक्रम शिकवण्याशी बांधिलकी ठेवणाऱ्या शिक्षकांमध्ये असतात. याच प्रवृत्तीतून तयार होतो त्या संस्थेतील विविध उपक्रम राबवणारे शिक्षक विरुद्ध इतर शिक्षक असा संघर्ष. हा विरोधी गट उपक्रमशील शिक्षकांचा C.R (Confidential Report) बिघडवण्याच्या थरापर्यंत जाऊ शकतो. उपक्रमशील शिक्षकांना कायम सहकार्य करणाऱ्या व्यवस्थापनावर दबावही असे गट अाणू शकतात. उपक्रमशील शिक्षक या सर्व वृत्ती-प्रवृत्तींशी एकांड्या शिलेदारासारखे लढत असतात. पण उपक्रमात भाग घेणारे विद्यार्थी त्या गाेष्टी बघत असतात. त्यातले काही जे शिक्षक होतात तेव्हा अापण भले अापले काम भले या भूमिकेत शिरतात. सरसकट असे होते असे नाही मी म्हणत, पण हे प्रमाण शैक्षणिक क्षेत्रात दिसते आहे. याउलट अनुभव, जे विद्यार्थी ऑद्योगिक क्षेत्रात जातात व ितथल्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन ते आपल्या आत्मवशि्वासाचा सदुपयोग करतात. ही परिस्थिती असतानाही, आजही अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. कारण दविसेंदविस ज्ञानाचा विस्फोट झाल्याने दर दोन वर्षांनी,आज शिकलेले कालबाह्य ठरणार असेल तर काही दविसांनी पदवी प्रमाणपत्रावर एक्स्पायरी डेटसुद्घा येईल, काय सांगावे? तरीही असे खूप विद्यार्थी माझ्या वाट्याला या उपक्रमांमधून आलेत, ज्यांनी आपला आत्मवशि्वास, अापले मनोबल, िजद्द दाखवत विविध क्षेत्रांत महाविद्यालयाचे, स्वत:चे, संस्थेचे नाव उंचावले. अगदी TV-9चा Production head म्हणून काम करणारा विशाल पाटील, सध्या कन्नड तालुक्यात DySP प्रीतम यावलकर, विप्रोमधली माधुरी पाटील, स्वयंउद्योजक अश्विनी चोरडिया, शैक्षणिक क्षेत्रात स्वाती मेटकर, सुनील पाटील, विवेक यावलकर, राज्य नाट्य स्पर्धेत महाराष्ट्र राज्यासाठी समन्वयक म्हणून काम बघणारा समीर तडवी, HDFCमध्ये रोहित िमश्रा, अॅक्सिस बँकेत अाकांक्षा ग्रोव्हर, पटनीत सीनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर रूपक नाईक, प्लेसमेंट क्षेत्रात िस्थरावलेला सोहन बहाद्दरपूरकर, असे कितीतरी अाठ‌वतात. अधूनमधून भेटतातही. बळ देतात पुन्हा नव्या उमेदीने काम करण्याचे. एक काळ होता की जो आत्मवशि्वास मी त्यांच्याकडे परावर्तित करण्याचा प्रयत्न करायचे, जी िजद्द, मनोबल त्यांना माझ्याकडून अपेक्षित असायचे, त्याची परतफेड करून जातात. त्यांनाही, मलाही कळत नक‌ळत. ही देवाणघेवाण खरंच आनंददायी असते. उमेद देणारी. उमेद वाढवणारी असते.

shamasubodh@yahoo.com.