आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरुवातीपासूनच आहारदक्षता आवश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आहारगाथा’च्या आतापर्यंतच्या लेखांमध्ये आपण मोठ्यांचा आहार, विशिष्ट ऋतूंमधला आहार याविषयी जाणून घेतलं. आजच्या बालकदिनानिमित्त बालकांच्या आहाराविषयी.

घरात लहान मूल असल्यास साहजिकच आपण पाहुणे म्हणून त्या घरी जाताना आवर्जून काही तरी खाऊ घेऊन जात असतो. घरी पाहुणे आले की, लहान मुलांच्या हातात काही तरी खाऊ किंवा पैसे देण्याची प्रथा आहे. हल्ली मोठ्या शहरांमधून लहान मुलं जास्त खेळताना दिसत नाहीत. एक तर खेळण्यासाठी त्यांना शिकवण्यांमधून वेळ मिळत नाही किंवा वेळ असेल तर मैदानी खेळ खेळण्याची त्यांची इच्छा नसते. यामुळे मुलांचे बैठ्या खेळाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सर्वसाधारणपणे मुले तीन-चार तास टीव्ही, व्हिडिओ गेम्स किंवा मोबाइलवर गेम्स खेळताना आढळून येतात. असे बैठे खेळ खेळत असताना मुले काही ना काही चटपटीत खात असतात. या खाण्यामध्ये कॅडबरी चॉकलेट्स, आलू चिप्स, शीतपेये यांचे प्रमाण अधिक असते. मुलांच्या अशा जीवनशैलीच्या परिणामी मुलांमध्ये ब-याच आजाराचे प्रमाण बळावते. याचे कारण ब-याच वेळा पालक असतात. ब-याच वेळा पालक मुलांचे अति लाड करतात. पालकांच्या मनात संवेदनात्मक भावना अशी असते, की आम्हाला लहानपणी नाही मिळालं म्हणून आमच्या मुलांसोबत असे आम्ही होऊ देणार नाही. या भावनेच्या आहारी जाऊन मुलांना नवनवीन पदार्थ खाऊ घातले जातात. मोठ्ठी कॅडबरी किंवा पिझ्झा अशी अामिषे मुलांना दाखवून आपण त्यांना अनारोग्यकारक खाण्याच्या सवयीच लावतो. मुलांना जर दीर्घायुषी बनवायचे असेल तर लहानपणापासूनच त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हवाबंद पािकटातील वस्तू, शीतपेये, गोड पदार्थ, पिष्टमय पदार्थ, तळीव पदार्थ व बेकरीमधील पदार्थ खाण्यावर संपूर्ण नियंत्रण असणे आवश्यक आहे. अलीकडील काळात मुलांची जीवनशैली बघता त्यांचा आहार व खाण्याच्या सवयी याकडे विशेष लक्ष देण्याची वेळ आली आहे. मुलांच्या चुकीच्या आहारामुळे लहान मुलांमध्ये स्थूलता, मधुमेह, हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. मुलींमध्ये अति लवकर मािसक पाळी येणे, चेह-यावर अनावश्यक केस येणे किंवा पाळीमध्ये त्रास होणे, चेह-यावर, पाठीवर मुरमासारखे फोड येणे, असे अाजार वाढत चालले आहेत. लहान व तरुण मुलांचीसुद्धा हाडांची ठिसूळता पाहण्याची वेळ आली आहे. तरुण मुलांमध्ये दातांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. म्हणजे जे अाजार वयाच्या चाळिशी किंवा साठीमध्ये होणे अपेक्षित आहे, ते आजार लहान मुलांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहेत व त्याचे मुख्य कारण चुकीची जीवनशैली व आहार हेच आहे.

अशा प्रकारचे आजार टाळण्यासाठी व मुलांनी आरोग्यसंपन्न राहण्यासाठी मुलांनी, पालकांनी व शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विशेषतः मुले खूप लहान असताना पालकांनी स्वत:वर काही बंधने घालणे आवश्यक आहे.
sangitahdesh@rediffmail.com