आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षातून एकवेळा तपासणी हवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या धकाधक्कीच्या काळामध्ये दिवसेंदिवस किडनीच्या आजारांमध्ये विलक्षणीय वाढ होत आहे. त्याकरिता हा एक समाज प्रबोधनपर थोडक्यात माहिती देण्याचा उद्देश.
किडनीच्या आजारामध्ये किडनी फेल्युअर, नेफ्रोटीक, सिंड्रोम, पायलीओने फ्रायटीस, पाॅलिसिटिक किडनी, वेगवेगळ्या प्रकारचे किडनीस्टोन, स्ट्रिक्चर आॅफ युरेथ्रा आिण बरेच आजार जे किडनीला बाधक ठरून किडनीला काम करण्यास अडथळा निर्माण करतात. त्यासाठी डायलिसीससारखे उपचार किडनी फेल्युअरसाठी केले जातात व ते रुग्ण दिवसेंदिवस त्या खर्चामुळे जास्तच त्रस्त होत असतात आिण पैसा भरपूर खर्च होतो. म्हणून किडनीचा आजार होऊ नये. यासाठी थोडीशी जागरूकता ठेवून आपण आपल्या जीवनशैलीत काही बाबींचा अंतर्भाव करावा.
जसे की, १. पाणी भरपूर प्यावे २. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही पेनकिलर अथवा नेफ्रोटाॅक्सिक औषध सेवन करू नये. ३. अंगावर हातापायावर सूज, सकाळी चेहऱ्यावर सूज येते. असे असेल तर त्वरित आपल्या डाॅक्टरांच्या निदर्शनास आणूण द्यावे हे बरेच. ४. किडनीस्टोन असेल तर जास्त दिवस न थांबता त्वरित योग्य तो उपचार करून त्याचा किडनीला होणारा अडथळा थांबवावा. ५. आपल्या रुटीन चेकअपमध्ये किडनीच्या महत्त्वाच्या तपासण्या वर्षातून एकवेळा करून द्याव्या.

तपासणीमध्ये : १. रुटीन चेकअप युरीनसाठी २. सोनोग्राफी ३. सेरम क्रिएटीनाईन व ब्लड युरिया ह्या. प्रथम दर्शनी तपासण्या करून या आजारांच्या रुग्णांचे निदान.

किडनीच्या आजाराची प्रमुख लक्षणे

होमिओपॅथिक उपचार
>प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, या म्हणीप्रमाणे आजाराच्या उपचारापेक्षा आजार होणारच नाही. ह्याची काळजी घेणे हे कधीही चांगलेच पण काही कारणामुळे आपण आजारांना बळी पडत असतो व नंतर योग्य उपचार करावयचा असतो.

>होमिओपॅथी उपचार प्रणालीमध्ये रुग्णांची सर्व केस हिस्टरी डाॅक्टर घेत असतात. त्यावर अभ्यास करून औषधी किडनीचे काम पूर्ववत सुरू करून डायलिसीससारखा उपचार हळूहळू बंद होऊ शकतो. रुग्णाची किडनी नैसर्गीक पद्धतीने काम करून रुग्ण पूर्णपणे बरा होतो. त्याची बरेचशी उदाहरणे आहेत.

> होमिओपॅथीमध्ये उपचार करताना आजार का झाला? त्याचे कारण मानसिक आहे की शारीरिक, आनुवंशिक कुठल्या प्रकारचे आहे. ते शोधून त्यावर उपचार केले जातात. त्यामधून शक्यतो वर पूर्णपणे रुग्ण बरा होतो व या औषधांचा खर्च सहज परवडणारा असतो. आिण औषधांचे दुष्परिणाम होत नाहीत. म्हणून ही उपचारपद्धतीचा अवलंब केल्यास आपण रुग्णांची भविष्यातील होणारी शारीरिक, मानसिक व आर्थिक हानी टाळू शकतो.

> होमिओपॅथीचा उपचार करताना औषधे ठरलेली नसतात. त्यामुळे औषधांचा नावाचा उल्लेख करणे योग्य ठरणार नाही. कारण प्रत्येक आजाराचे व प्रत्येक रुग्णाचे औषध हे वेगवेगळ्या प्रकारचे निवडल्या जाऊ शकते. त्यामुळे ठराविक असे काही नसते. ते योग्य प्रकारे केस िहस्टरी घेऊनच औषध दिल्या जाते.