आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाडे कमजोर करणारा आजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यात हाडातील कॅल्शियमची मात्रा कमी होउन हाडातील समर्थन संरचना कमकुवत होऊन हाड मोडणे (फ्रॅक्चर)ची शक्यता वाढते. अशा फ्रॅक्चरला “फ्रॅजिलीटी फ्रॅक्चर” असे म्हणतात.
अ) ऑस्टिओपोरोसिसची कारणे - ऑस्टिओपोरोसिस हे पन्नाशीच्या साधारण ५० % महिला २५ % पुरुषांमध्ये दिसतो. साधारणत हाडांची घनता (डेंसिटी) ही वयाच्या ३० पर्यंत जास्त असते. तिची हळूहळू घसरण व्हायला सुरुवात होते. त्यातच घनता कमी करण्यास आणि ठिसूळता वाढवण्यात ज्या गोष्टी कारणीभूत ठरतात त्यामध्ये समावेश आहे.
Á आहारात कॅल्शियमची कमतरता Á जीवनसत्त्व ‘ड’ ची कमतरता Á व्यायामाचा अभाव Á लठ्ठपणा Á मद्यपान करणे Á सिगारेट, बिडी, तंबाखू, गुटखा सेवन Á दीर्घकाळ स्टेरॉइडचे सेवन Á संधिवात Á थायरॉइडचे आजार Á पॅरा-थायरॉइडचे आजार वगैरे. या सर्वांसोबत कमी वयात मासिक पाळी बंद होणे किंवा गर्भपिशवी काढल्यामुळे होणाऱ्या संप्रेरक बदलांमुळे देखील ऑस्टिओपोरोसिस लवकर निर्माण होते.
ब) लक्षणे - शुल्लक कारणाने झालेले फ्रॅक्चर हे ऑस्टिओपोरोसिसचे मोठे लक्षण. सर्वत्र अंगदुखी, पाठदुखी, लवकर थकवा येणे, मणक्यांना समोर वाक (कुबड) येणे, वगैरे हे त्याची लक्षणे आहेत.
निदान : १. रुग्णाला होणारा त्रास व लक्षणे हे निदान करण्यात मदत करतात. त्या व्यतिरिक्त ठिसूळता तपासणी (बोन मिनेरल डेंसिटी-बी.एम.डी.), एक्स-रे, डेक्सा स्कॅन, क्यू-सी.टी. स्कॅन, वगैरे सारख्या तपासण्या निदानात मदत करतात. या व्यतिरिक्त त्रास असल्यास थायरॉइड वा इतर ग्रंथींच्या तपासण्या निदान आणि उपचारास मदत करतात.
ड) अाॅस्टिअाेपोरोसिस टाळणे आणि उपचार :-

१. योग्य आहार - > आहारात कॅल्शियम, पोटॅशियम, जीवनसत्व ‘क’ वगैरेच्या अाॅस्टिअाेपोरोसिस होतो. > म्हणून दूध, दही, ताक, लोणी, चीझ, इ. डेअरीचे पदार्थ योग्य कॅल्शियम पुरवतात. > ताजे फळ आणि भाज्या चांगले सोर्स. > धान्य, दाणे-बेदाणे हे चांगले सोर्स. > नाचणी, रागी, सोयाबीन हे चांगले. > अंडी, मासे, मांसाहार कॅल्शियम सोबत इतर खनिज पुरवतात.

२) मद्यपान, सिगारेट, बिडी, गुटखा, तंबाखू टाळणे : यातील रसायने कॅल्शियम हाडातून काढतात आणि आहारातील कॅल्शियम आणि खनिजे हाडांपर्यंत पोहाेचू देत नाहीत. ३) नियमित व्यायाम: रोज नियमित व्यायाम महत्त्वाचा यामुळे हाडांचा रक्तपुरवठा योग्य राहतो व आहारातले घेतलेले कॅल्शियम योग्यरीतीने हाडांपर्यंत पोहोचते होते. रोज ३०-४० मिनिटे चालणे हा एक चांगला आणि सोपा व्यायाम आहे.

नियमित सूर्यप्रकाश - दररोज केवळ १० मिनिटे सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश मिळणे महत्त्वाचा. सूर्यप्रकाश शरीरावर पडल्यास शरीरात जीवनसत्त्व ‘ड’ तयार होण्यास उपयुक्त ठरते. हे जीवनसत्त्व ‘ड’ आहारातले आणि रक्तातले कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचते करण्यास गरजेचे असते.

५) औषधी : योग्य प्रमाण असलेली कॅल्शियमची औषधी घेणे हे अाॅस्टिअाेपोरोसीस असल्यास लाभदायक. जीवनसत्त्व ‘ड’ची औषधीदेखील योग्य प्रमाणात घेऊ शकता. हाडातील कॅल्शियम टिकून ठेवण्यास अॅंटी-रिपोर्टटिव्ह औषधी उपयुक्त असतात. ही औषधी साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक असे द्यावे लागतात. थायरॉइड किंवा दुसरे कुठले संप्रेरकांचे असमतोल सुधारण्याची औषधीदेखील महत्त्वाची ठरू शकतात.

इ) ऑस्टिओपोरोसिसमुळे होणारे फ्रॅक्चर कसे टाळावेत? : घरातील राहणी आणि वातावरण असे ठेवावे, ज्यामुळे तोल जाऊन पडणे आणि फ्रॅक्चर होणे टाळल्या जाईल.
-१. घरात दिवसा-रात्री योग्य प्रकाश रचना ठेवावी.
-२. जमिनीवर पसारा करणे आणि दाराला उंबरठा ठेवणे टाळणे. यामुळे पाय अडकून पडायची शक्यता वाढते.
-३. घरात कुठेही वर-खाली (पायऱ्या) नकोत. असल्यास आधारासाठी रॅलिंग बसवून घेणे गरजेचे. -४. घरात कार्पेट अंथरणे टाळणे. असल्यास त्याचे कोपरे पायात अडकू नये याची काळजी घेणे गरजेचे.
-५. बाथरूम आणि संडास घरात पाय निसटणारी फरशी बसवणे टाळा आणि असल्यास अँटी-स्कीड मॅट अंथरून घ्या.
-६. बाथरूम आणि संडासात पकडण्यासाठी भिंतींना रेलिंग बसवून घेणे महत्त्वाचे.
-७. घरात पायऱ्या असल्यास, पाय न सटकण्यासाठी भिंतींना रेलिंग बसवून घेणे महत्त्वाचे.
-८. घरात कुठेही हालचालीच्या वाटेत तयार किंवा पाय अकडून पडण्याची शक्यता असलेल्या गोष्टी असू नयेत.
-९. प्रौढ व्यक्तीने घरातदेखील हालचाली करताना हातात काठीचा आधार ठेवावा.

dr.niranjandc@gmail.com