आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Sangita Deshpande Article About Healthy Skin

नितळ निरोगी त्वचेसाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर दिसणे हे सर्वांचे स्वप्न असते व हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. मात्र, हे करत असताना प्रत्येक जण बाह्य सौंदर्यास प्राधान्य देतो. आपले सौंदर्य प्रामुख्याने आपल्या त्वचेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते व त्वचेची गुणवत्ता सर्वस्वी आपल्या आरोग्यावर अवलंबून असते.

बर्‍याच व्याधींचे परिणाम स्पष्टपणे त्वचेवर दिसून येतात. यामध्ये पोषक मूल्यांची कमतरता (Nutritional deficiency), मानसिक ताणतणाव, यापासून संप्रेरक ग्रंथीच्या विकृतीपर्यंतचे आजार यांचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. प्रत्येकाला आपली त्वचा तुकतुकीत, पातळ, मुलायम हवी असते. त्यासोबत त्वचा सतेज असण्याची सर्वांची इच्छा असते. अशी त्वचा असण्यासाठी त्वचेच्या काळजीसोबतच त्वचेसाठी पोषक असा आपला आहार असणे गरजेचे असते.
त्वचेवर आवश्यक पोषक मूल्यांचा अत्यधिक परिणाम असतो. यामध्ये प्रामुख्याने जीवनसत्त्व अ, क, B2, B1, B6, व B12 यांचा समावेश आहे. बर्‍याचशा अ‍ॅलर्जिक अवस्थांचे पण त्वचेवर परिणाम दिसतात. लोह, ताम्र यांच्या न्यूनत्वाचे परिणाम त्वचेवर दिसून येतात. यासाठी आपला आहार खनिज व जीवनसत्त्वयुक्त असणे गरजेचे आहे.

आयुर्वेदाने विरुद्धान्नाचा (incompatible food) विशेषत्वाने त्वचेवर परिणाम होतो हे नमूद केले आहे. विरुद्ध अन्नाने विविध प्रकारचे त्वचारोग निर्माण होतात. यामध्ये त्वचेवर वैवर्ण्य (discolouration), त्वचा फुटणे, खाज येणे व त्वचा निस्तेज होते. विरुद्ध अन्न सातत्याने सेवन केल्यास त्वचेवर सुरकुत्या पडणे व त्वचा काळवंडणे अशीही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते.

बर्‍याच वेळा खूप भाज्या, खूप फळे, पोटभर दूध, विविध (food supplements) यांच्या सातत्याने त्वचा सतेज राहील असेही नाही. यासाठी सर्वात महत्त्वाचे आपले पचन व्यवस्थित असणे आवश्यक आहे. अत्यधिक साखरेचे व स्निग्ध पदार्थांचे सेवन, दुग्धजन्य पदार्थांचे अत्यधिक सेवन, आरामदायी जीवनशैली याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो. या गोष्टी सातत्याने सेवन केल्यास त्वचा काळवंडू शकते. त्यालाच (achynthosis) अकिंथोसिस म्हणतात.
ज्या लोकांना आपली त्वचा नितळ हवी असते, त्यांनी योग्य आहाराबरोबर धावणे, नाचणे, मैदानी खेळ खेळणे यासारखे व्यायाम सातत्याने करणे गरजेचे असते. याबरोबरच पाण्याचे प्रमाण यथायोग्य ठेवणेसुद्धा आवश्यक आहे. हवामानानुसार व ऋतूनुसार पाणी पिण्याच्या प्रमाणात बदल करावे.

अगोदर वर्णन केल्याप्रमाणे आपले पचन, आपला अग्नी यांची विशेषत्वाने काळजी घ्यावी लागते. त्वचेच्या समस्या सोडवताना फक्त वरवर औषधी किंवा सौंदर्य प्रसाधने वापरण्यापेक्षा आपला आहार, अग्नी व पचन यांची काळजी घेतल्यास बर्‍याच समस्या सुटतात. याची उपाययोजना करताना वारंवार जेवणे, भूक नसताना खाणे, पिष्टमय पदार्थ, अति गोड पदार्थ, साखर व गुळाचे अत्यधिक सेवन टाळावे. यासोबतच वारंवार हवाबंद पदार्थांचे सेवन, अत्यधिक मसाले, रसायनयुक्त आहार, कृत्रिम रंग व सुगंधी द्रव्ये असणारे पदार्थ टाळावेत.

बर्‍याच वेळा वयात येताना मुलींना चेहर्‍यावर फोड येणे, त्वचेवर अनावश्यक केस येणे अशा तक्रारी उद्््भवतात. अशाकरिता वरवर उपाय करणारी, परंतु घातक असलेली सौंदर्य प्रसाधने न वापरता योग्य सल्ला घेऊन चिकित्सा करावी. मुलींमध्ये चेहर्‍याच्या त्वचेच्या समस्या या बर्‍याच वेळा PCOD (पॉली सिस्टिक ओव्हराइन डिसीज)मुळे होतात. अशा वेळी PCODची चिकित्सा केल्यास या तक्रारी दूर होतात. सध्या यासाठी अत्यंत शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहेत. या आजारात तेलकट पदार्थांचे प्रमाण, तळीव पदार्थ यांच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे लागते. खूप प्रखर सूर्यप्रकाश टाळावा. बर्‍याच मुली किंवा स्त्रिया बिलकुलच सूर्यप्रकाश घेत नाहीत, त्यांनाही इतर आजार होण्याची शक्यता असते.
थोडक्यात सांगायचे झाल्यास सुंदर व नितळ त्वचेसाठी संतुलित आहार, पुरेसे पाण्याचे सेवन, आवश्यक तेवढी निद्रा, साधा आहार, व यथायोग्य व्यायाम या गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

सुंदर दिसणे हे सर्वांचे स्वप्न असते व हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. मात्र, हे करत असताना प्रत्येक जण बाह्य सौंदर्यास प्राधान्य देतो. आपले सौंदर्य प्रामुख्याने आपल्या त्वचेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते व त्वचेची गुणवत्ता सर्वस्वी आपल्या आरोग्यावर अवलंबून असते.

बर्‍याच व्याधींचे परिणाम स्पष्टपणे त्वचेवर दिसून येतात. यामध्ये पोषक मूल्यांची कमतरता (Nutritional deficiency), मानसिक ताणतणाव, यापासून संप्रेरक ग्रंथीच्या विकृतीपर्यंतचे आजार यांचा परिणाम त्वचेवर दिसून येतो. प्रत्येकाला आपली त्वचा तुकतुकीत, पातळ, मुलायम हवी असते. त्यासोबत त्वचा सतेज असण्याची सर्वांची इच्छा असते. अशी त्वचा असण्यासाठी त्वचेच्या काळजीसोबतच त्वचेसाठी पोषक असा आपला आहार असणे गरजेचे असते.
त्वचेवर आवश्यक पोषक मूल्यांचा अत्यधिक परिणाम असतो. यामध्ये प्रामुख्याने जीवनसत्त्व अ, क, B2, B1, B6, व B12 यांचा समावेश आहे. बर्‍याचशा अ‍ॅलर्जिक अवस्थांचे पण त्वचेवर परिणाम दिसतात. लोह, ताम्र यांच्या न्यूनत्वाचे परिणाम त्वचेवर दिसून येतात. यासाठी आपला आहार खनिज व जीवनसत्त्वयुक्त असणे गरजेचे आहे.

आयुर्वेदाने विरुद्धान्नाचा (incompatible food) विशेषत्वाने त्वचेवर परिणाम होतो हे नमूद केले आहे. विरुद्ध अन्नाने विविध प्रकारचे त्वचारोग निर्माण होतात. यामध्ये त्वचेवर वैवर्ण्य (discolouration), त्वचा फुटणे, खाज येणे व त्वचा निस्तेज होते. विरुद्ध अन्न सातत्याने सेवन केल्यास त्वचेवर सुरकुत्या पडणे व त्वचा काळवंडणे अशीही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते.
बर्‍याच वेळा खूप भाज्या, खूप फळे, पोटभर दूध, विविध (food supplements) यांच्या सातत्याने त्वचा सतेज राहील असेही नाही. यासाठी सर्वात महत्त्वाचे आपले पचन व्यवस्थित असणे आवश्यक आहे. अत्यधिक साखरेचे व स्निग्ध पदार्थांचे सेवन, दुग्धजन्य पदार्थांचे अत्यधिक सेवन, आरामदायी जीवनशैली याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो. या गोष्टी सातत्याने सेवन केल्यास त्वचा काळवंडू शकते. त्यालाच (achynthosis) अकिंथोसिस म्हणतात.
ज्या लोकांना आपली त्वचा नितळ हवी असते, त्यांनी योग्य आहाराबरोबर धावणे, नाचणे, मैदानी खेळ खेळणे यासारखे व्यायाम सातत्याने करणे गरजेचे असते. याबरोबरच पाण्याचे प्रमाण यथायोग्य ठेवणेसुद्धा आवश्यक आहे. हवामानानुसार व ऋतूनुसार पाणी पिण्याच्या प्रमाणात बदल करावे.

अगोदर वर्णन केल्याप्रमाणे आपले पचन, आपला अग्नी यांची विशेषत्वाने काळजी घ्यावी लागते. त्वचेच्या समस्या सोडवताना फक्त वरवर औषधी किंवा सौंदर्य प्रसाधने वापरण्यापेक्षा आपला आहार, अग्नी व पचन यांची काळजी घेतल्यास बर्‍याच समस्या सुटतात. याची उपाययोजना करताना वारंवार जेवणे, भूक नसताना खाणे, पिष्टमय पदार्थ, अति गोड पदार्थ, साखर व गुळाचे अत्यधिक सेवन टाळावे. यासोबतच वारंवार हवाबंद पदार्थांचे सेवन, अत्यधिक मसाले, रसायनयुक्त आहार, कृत्रिम रंग व सुगंधी द्रव्ये असणारे पदार्थ टाळावेत.

बर्‍याच वेळा वयात येताना मुलींना चेहर्‍यावर फोड येणे, त्वचेवर अनावश्यक केस येणे अशा तक्रारी उद्भवतात. अशाकरिता वरवर उपाय करणारी, परंतु घातक असलेली सौंदर्य प्रसाधने न वापरता योग्य सल्ला घेऊन चिकित्सा करावी. मुलींमध्ये चेहर्‍याच्या त्वचेच्या समस्या या बर्‍याच वेळा PCOD (पॉली सिस्टिक ओव्हराइन डिसीज)मुळे होतात. अशा वेळी PCODची चिकित्सा केल्यास या तक्रारी दूर होतात. सध्या यासाठी अत्यंत शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहेत. या आजारात तेलकट पदार्थांचे प्रमाण, तळीव पदार्थ यांच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे लागते. खूप प्रखर सूर्यप्रकाश टाळावा. बर्‍याच मुली किंवा स्त्रिया बिलकुलच सूर्यप्रकाश घेत नाहीत, त्यांनाही इतर आजार होण्याची शक्यता असते.

थोडक्यात सांगायचे झाल्यास सुंदर व नितळ त्वचेसाठी संतुलित आहार, पुरेसे पाण्याचे सेवन, आवश्यक तेवढी निद्रा, साधा आहार, व यथायोग्य व्यायाम या गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे.

डॉ. संगीता देशपांडे, औरंगाबाद
sangitahdesh@rediffmail.com